Government Schemes for Farmers in marathi : शेतकऱ्यांसाठी 3 खास सरकारी योजना

आर्थिक मदत, पीक विमा आणि 3000 पेन्शनचा लाभ

नवी दिल्ली : Government Schemes for Farmers in marathi : राज्य आणि केंद्र सरकार मिळून देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध जनकल्याणकारी योजना चालवत असते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा उद्देश असतो. त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मदत केली जाते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान फसल बीमा योजना सुरू करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना या योजनेच्या माध्यमातून 60 वर्षे पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याला 3 हजार रुपये पेन्शन दिली जाते. या संपूर्ण तिन्ही योजनेची सविस्तर माहिती आपण खाली पाहूया.. अशा तीन योजना शेतकऱ्यांसाठी खास आहेत. याचा लाभ घेऊन शेतकरी आपला फायदा करून घेऊ शकतात.

Ghar Soaps De-Tan Face Wash खरेदी करा 249 रुपयात

पीएम किसान सन्मान योजना

PM Kisan Yojana : केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येते. ही मदत प्रत्येक चार महिन्याला 2-2 हजार रुपये अशा 3 टप्प्यांमध्ये करण्यात येते. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येते.

PM Kisan Yojana : गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. मात्र ती प्रतीक्षा आता संपली आहे. कारण 23 ऑक्टोंबरला एग्रीकल्चर इंडिया या ट्विटर हँडल वरून सरकारने 30 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता जमा होणार असल्याची घोषणा केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. तो देशातील कुठल्याही राज्यातील रहिवासी असो त्याला या योजनेचा लाभ घेता येतो.

जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी आहात आणि आतापर्यंत ekyc केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या. जेणेकरून तुमचा हप्ता थांबणार नाही. यासाठी सर्वात प्रथम तुम्ही तुमचे स्टेटस चेक करा. स्टेटस मध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही केवायसी केलेली आहे किंवा नाही. जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुम्ही घर बसून ई- केवायसी करू शकता.

पीएम फसल बीमा योजना

PM Fasal Bima Yojana : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण देण्याचे काम करण्यात येते. कुठल्याही आपत्ती, दुष्काळ परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत करण्यात येते म्हणजेच शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना एक वरदान ठरली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या या योजना महत्त्वाची आहे. कारण केंद्र आणि राज्य सरकार मिळून पिक विमाचा प्रीमियम भरतात. उर्वरित रक्कम शेतकऱ्याला भरावे लागते, अशा पद्धतीने शेतकरी आपल्या प्रत्येक पिकाचा विमा उतरू शकतो. जेणेकरून आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी अशा परिस्थितीमध्ये जर पिकाचे नुकसान झाले असेल तर पीएम फसल बीमा योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक मदत केली जाते. जेणेकरून त्यांच्या आर्थिक नुकसान होऊ नये.

पंतप्रधान शेतकरी मानधन योजना

PM Kisan Maandhan Yojana : देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. शेतकरी मानधन योजना मध्ये शेतकऱ्याला अंशदान करून या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवता येते. शेतकऱ्याचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला ही पेन्शन 3000 रुपये याप्रमाणे दिली जाते. या योजनेचा लाभ 18 ते चाळीस वर्ष दरम्यान वय असणारे शेतकरी घेऊ शकतात.

Government Schemes for Farmers in marathi : यामध्ये अंशदान रक्कम ही जमा करावी लागते. शेतकऱ्यांना वृद्ध काळात पेन्शन मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना सुरू केलेली आहे. वृद्धपकाळात शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते आणि पीएम किसान योजनेचे खाते शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे.

या अशा तीन योजना आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना परिपूर्ण आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेत असतात. त्या दृष्टिकोनातून पीएम किसान योजना, पीएम फसल विमा योजना आणि पीएम शेतकरी मानधन योजना महत्त्वाच्या ठरतात. या तिन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.

Read About PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तारीख जाहीर!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
website : yojanamazi.com