PhonePe Launches Biometric UPI Payments : Phonepe युजर्स साठी खुशखबर

PhonePe Launches Biometric UPI Payments In Marathi : आता पिन कोड न टाकता ही करता येणार पेमेंट

PhonePe Launches Biometric UPI Payments : आपण पाहतो की, प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाइल आहे आणि प्रत्येकाजवळ त्या मोबाईल मध्ये Phonepe ॲप्लिकेशन आहे. सध्या सगळीकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा सुरू झाली आहे. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी अनेक बँकांचे आणि इतर डिजिटल पेमेंट अँप वापरले जातात.

जर तुम्ही Phonepe यूजर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता UPI व्यवहारासाठी बायोमेट्रिक अथेंटीकेशन ची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

PhonePe Launches Biometric UPI Payments या नव्या फीचर मुळे वापर करताना आता UPI PIN टाकण्याची गरज नाही. त्या ऐवजी तुम्ही थेट फिंगरप्रिंट किंवा फेस रिकग्निशनच्या मदतीने अगदी सहज पेमेंट करू शकता. यामुळे पैसे मोबाईल मधून जाण्याचा धोका किंवा सायबर स्कॅनच्या समस्या नक्कीच कमी होतील.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही सुविधा सध्या 5000 पर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच लहान रकमेंसाठी आता प्रत्येक वेळी PIN लक्षात ठेवण्याची गरज नाही. जर तुम्ही 5000 पर्यंतचे पेमेंट करत असाल तर तुम्हाला आता यूपीआय पिन टाकण्याची गरज नाही.

जर कमी प्रकाश, सेंसरची अडचण किंवा इतर तांत्रिक कारणामुळे बायोमेट्रिक काम करत नसेल तर वापरकर्ते UPI पिन चा वापर करून व्यवहार पूर्ण करू शकतात. परंतु अशी कोणतीही अडचण नसल्यास तुम्ही थेट तुमचे बायोमेट्रिक अथेंटीकेशन नुसार फेस आयडी किंवा फिंगरप्रिंटचा वापर करून पेमेंट करू शकतात.

Make Phonepe biometric upi payments without pin कंपनीच्या म्हणण्यानुसार हे वापरकर्त्यांचा पेमेंट अनुभव जास्त सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी व्यवहार करताना बाजूच्या व्यक्तीने PIN पाहिल्या जाण्याचा धोका संभावतो हा धोका देखील आता टाळता येणार आहे.

Phonepe चे हेड ऑफिस अग्रवाल यांनी सांगितले की, डिजिटल पेमेंट अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित बनवणे हेच कंपनीचे मोठे उद्दिष्ट आहे. बायोमेट्रिक अथेंटीकेशन मुळे व्यवहार अधिक फ्रिक्शन लेस होतील आणि हार्डवेअर लेव्हल सेक्युरिटी मिळेल.

सध्या ही सुविधा अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि फिंगरप्रिंट तसेच फेस रेकग्निशन दोन्ही सपोर्ट करते. लवकरच IOS वापरकर्त्यांसाठी ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. आता ही सुविधा तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही कशी करणार हे आपण पाहू.

कसा करणार बायोमेट्रिक चा वापर

Make Phonepe biometric upi payments without pin

ही सुविधा सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील Phonepe ॲप उघडावे लागेल.
त्यानंतर प्रोफाइल मध्ये जाऊन manage payment’s हा पर्याय निवडा.
त्यानंतर Biometric Pay या आयकॉनवर टॅप करून संबंधित बँक खात्यासाठी UPI बायोमेट्रिक ॲथेंटीकेशन सुरू करा.
एकदा सेटअप करताना UPI PIN आणि बायोमेट्रिक ची पुष्टी करा.
त्यानंतर भविष्यातील व्यवहारांसाठी थेट बायोमेट्रिक चा वापर तुम्हाला करता येईल.