शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत OTS योजनेतील 1.69 लाख नावे तपासा
मुंबई : Karjmukti Yojana OTS First List 2026 in marathi : राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत 2 लाखापेक्षा कमी कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या यापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसापासून 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या कधी प्रसिद्ध होणार? याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती. मात्र 20 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीमध्ये 1 लाख 69 हजार 820 पात्र शेतकऱ्यांची नावे आहेत. टप्प्याटप्प्याने पुढील याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती..
OTS Farmer List 2026 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेसाठी पात्र ठरलेल्या १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, या योजनेत कर्जमुक्ती, एकवेळ समझोता (ओटीएस) आणि प्रोत्साहन असे तीन घटक समाविष्ट आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमुक्ती घटकाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याअंतर्गत २५.८१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या २०.७२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १८ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आली आहे.
१ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकवेळ समझोता (ओटीएस) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या दोन लाख रुपयांवरील कर्जाच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. बँकांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे संगणकीय संस्करण करून १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इथे तपास यादी
या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँकेचे नाव, बँक शाखा, विकास संस्थेचे नाव, कर्जखाते क्रमांक, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, ओटीएस नुसार थकबाकीची रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम यांचा समावेश आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
2 लाख रुपयांवरील रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक
पात्र शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीतील तपशील तपासून ओटीएस नुसार त्यांच्या हिश्श्याची दोन लाख रुपयांवरील रक्कम संबंधित बँकेत जमा करणे आवश्यक आहे. एकाच बँकेत कर्जखाते असलेल्या शेतकऱ्यांनी यादीमध्ये नमूद केलेली रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा करावी. एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही एका कर्जखात्यात ही रक्कम जमा करण्याची सुविधा आहे. मात्र, संबंधित खात्यात ओटीएस नुसार बँकेस देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये.
माहिती दर शुक्रवारी पोर्टलवर होणार अपलोड
शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची माहिती संबंधित बँकेकडून पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार आहे. ही माहिती दर शुक्रवारी पोर्टलवर अपलोड केली जाईल. शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम जमा केल्याची खातरजमा झाल्यानंतर थकबाकी अद्ययावत केल्याच्या तीन दिवसांनंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या तसेच योजनेच्या निकषांनुसार संबंधित बँकेत आपल्या हिश्श्याची रक्कम जमा केलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे. शासनाकडून ही रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या दोन लाख रुपयांवरील कर्जाच्या हिश्श्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत आहे.
विभागनिहाय पात्र शेतकऱ्यांची संख्या
- छत्रपती संभाजीनगर विभाग : छत्रपती संभाजीनगर विभागातील ३९,५९७ शेतकरी पात्र ठरले आहेत.
- नाशिक विभाग : प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीत नाशिक विभागात सर्वाधिक ४८,३७९ शेतकरी पात्र ठरले आहेत.
- पुणे विभाग : पुणे विभागातील ४०,९४६ शेतकरी पात्र ठरले आहेत.
- अमरावती विभाग : अमरावती विभागातील २५,९१७ शेतकरी पात्र ठरले आहेत.
- नागपूर विभाग : नागपूर विभागातील १२,००२ शेतकरी पात्र ठरले आहेत.
- कोकण विभाग : कोकण विभागातील २,९७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
ही ओटीएस अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली पहिली यादी असून, बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील काळातही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
योजनेअंतर्गत मृत, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासंदर्भात १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना FAQ
प्रश्न 1: शेतकरी कर्जमुक्ती योजनेची OTS यादी प्रसिद्ध झाली आहे का?
उत्तर: होय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एकवेळ समझोता (OTS) योजनेची पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रश्न 2: OTS योजनेच्या पहिल्या यादीत किती शेतकऱ्यांची नावे आहेत?
उत्तर: पहिल्या यादीमध्ये 1 लाख 69 हजार 820 पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रश्न 3: OTS योजनेअंतर्गत किती रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे?
उत्तर: पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या दोन लाख रुपयांवरील कर्जाच्या हिश्श्याची रक्कम बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.
प्रश्न 4: OTS योजनेची लाभार्थी यादी कुठे तपासता येईल?
उत्तर: लाभार्थी यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी तेथे जाऊन आपले नाव तपासू शकतात.
प्रश्न 5: OTS योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःची रक्कम भरावी लागेल का?
उत्तर: होय. पात्र शेतकऱ्यांनी यादीमध्ये नमूद केलेली दोन लाख रुपयांवरील कर्जाची स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करणे आवश्यक आहे.
प्रश्न 6: OTS योजनेसाठी रक्कम भरण्याची अंतिम मुदत किती आहे?
उत्तर: पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
प्रश्न 7: OTS योजनेसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे का?
उत्तर: होय. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. रक्कम जमा केल्यानंतर बँकेने थकबाकीची माहिती अद्ययावत केल्याच्या तीन दिवसांनंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होईल.
प्रश्न 8: ॲग्रीस्टॅक नोंदणी नसल्यास कर्जमाफीचा लाभ मिळेल का?
उत्तर: या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून घ्यावी.
प्रश्न 9: OTS योजनेची पुढील लाभार्थी यादी कधी प्रसिद्ध होणार?
उत्तर: बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण सुरू असून, पुढील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
प्रश्न 10: शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची माहिती पोर्टलवर कधी अपडेट होणार?
उत्तर: संबंधित बँकांकडून शेतकऱ्यांनी जमा केलेल्या रकमेची माहिती पोर्टलवर अद्ययावत केली जाणार आहे. ही माहिती दर शुक्रवारी अपलोड केली जाणार आहे.
प्रश्न 11: एकापेक्षा जास्त कर्जखाती असल्यास रक्कम कुठे जमा करावी?
उत्तर: एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही एका कर्जखात्यात ओटीएसनुसार देय असलेली रक्कम जमा करण्याची सुविधा आहे. मात्र, बँकेला देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये.
प्रश्न 12: OTS योजनेचा लाभ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ होणार का?
उत्तर: शेतकऱ्याने स्वतःचा निर्धारित हिस्सा जमा केला आणि शासनाकडून मंजूर दोन लाख रुपयांपर्यंतची मदत बँकेत जमा झाली, तर संबंधित कर्जखात्याची थकबाकी निकाली निघण्यास मदत होईल. अंतिम कर्जमुक्ती बँकेच्या खात्यातील नोंदीनुसार निश्चित होईल.
Read About : PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तारीख जाहीर!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
website : yojanamazi.com
अशाच विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर व अधिकृत माहिती मिळवण्यासाठी योजना माझी (yojanamazi.com) या वेबसाइटला भेट द्या. सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आमचे Facebook आणि Instagram पेज फॉलो करा.