ऑक्टोंबरचा हप्ता कधी जमा होणार?
Ladki Bahin Yojana Update in marathi : गेल्या अनेक दिवसापासून लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र नोव्हेंबरचे तीन आठवडे संपले तरीही ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आजपर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांचे लक्ष आता ऑक्टोंबरचा हप्ता आपल्या खात्यात कधी जमा होणार? या गोष्टीकडे लक्ष लागले आहे. मात्र सध्या नोव्हेंबरचा तिसरा आठवडा ही उलटून गेला आहे तरीही महिलांच्या खात्यामध्ये आक्टोंबर महिन्याचा हप्ता जमा झालेले नाही म्हणजेच आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्याचे हप्ते महिलांचे सरकारकडे बाकी आहेत. मात्र हप्त्या बाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता लग्नसराईही जवळ आली आहे अशा काळात महिलांना आर्थिक मदतीची आवश्यकता असते. ऑक्टोंबर-नोव्हेंबर असा कुठलाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही. मात्र ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा मिळून एकत्र तीन हजार रुपये मिळणार का? असाही प्रश्न लाभार्थी महिला करत आहेत.
यामुळे लांबला हप्ता?
राज्य सरकारने दुष्काळ ग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आणि ती दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. त्यामुळे वेगवेगळ्या योजनेचा निधी नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळेच लाडक्या बहिणीचा हप्ता रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत सरकारने कुठेही स्पष्ट सांगितलेले नाही.
आत्ता 22 नोव्हेंबर सुरू असूनही लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ताही मिळत नाही. त्यामुळे आम्हाला दोन्ही हप्ते एकत्र मिळावेत अशी मागणी महिला करत आहेत म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चा जरी हप्ता एकत्र मिळाला तर तीन हजार रुपये मिळतील अशी महिला म्हणत आहेत. मात्र ऑक्टोबर- नोव्हेंबरचा हप्ता 3 हजार रुपये एकत्र देण्याबाबत सरकारकडून अजून कुठल्याही प्रकारचे अधिकृत आदेश किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.
महिलांनी याकडे द्यावे लक्ष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनी आपल्या बँक खात्याची स्थिती, आधार लिंकिंग आणि योजनेतल्या अर्जाच्या सर्व स्टेटस तपासून घ्यावे. अधिकृत घोषणा होईपर्यंत तीन हजार रुपये एकत्र मिळणार असल्याच्या चर्चावर विश्वास ठेवू नये. आता सरकारकडून हप्त्याची तारीख कधी जाहीर होईल आणि महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याकडे सर्व राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे (FAQ)
प्रश्न 1. लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला हप्ता व्हॉट्सॲपवरून पुन्हा सुरू करता येतो का?
उत्तर: नाही. महाराष्ट्र सरकारने बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू करण्यासाठी व्हॉट्सॲपवर अर्ज करण्याची कोणतीही अधिकृत सुविधा जाहीर केलेली नाही.
प्रश्न 2. लाडकी बहीण योजनेबाबत व्हॉट्सॲपवर व्हायरल होणारे संदेश खरे आहेत का?
उत्तर: नाही. व्हॉट्सॲपवर अर्ज करून बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू होईल, या दाव्याला कोणतीही अधिकृत पुष्टी नाही.
प्रश्न 3. लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत का?
उत्तर: सध्या मासिक आर्थिक लाभाची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याबाबत कोणताही अधिकृत शासन निर्णय झाल्याची माहिती नाही.
प्रश्न 4. लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या कारणांमुळे बंद होऊ शकतो?
उत्तर: अपात्रता, ई-केवायसी अपूर्ण असणे, अर्जातील त्रुटी किंवा बँक खात्याशी संबंधित अडचणी यांसारख्या कारणांमुळे लाभ थांबू शकतो.
प्रश्न 5. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे कसे तपासावे?
उत्तर: योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्जाची स्थिती आणि उपलब्ध पेमेंटविषयक माहिती तपासता येते.
प्रश्न 6. लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाला असल्यास महिलांनी काय करावे?
उत्तर: सर्वप्रथम आपली ई-केवायसी पूर्ण झाली आहे का, अर्जाची स्थिती काय आहे आणि काही कागदपत्रे किंवा माहिती प्रलंबित आहे का, हे अधिकृत संकेतस्थळावर तपासावे.
प्रश्न 7. व्हॉट्सॲपवर आधार क्रमांक, बँक तपशील आणि ओटीपी शेअर करणे सुरक्षित आहे का?
उत्तर: अजिबात नाही. अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद लिंकवर आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी शेअर करू नये.
प्रश्न 8. लाडकी बहीण योजनेबाबत तक्रार कुठे दाखल करता येते?
उत्तर: योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या तक्रार निवारण सुविधेचा वापर करून लाभार्थी महिला आपली तक्रार नोंदवू शकतात.
प्रश्न 9. बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल सुरू केले आहे का?
उत्तर: बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज स्वीकारणारे कोणतेही अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल जाहीर करण्यात आलेले नाही.
प्रश्न 10. लाडकी बहीण योजनेतील ऑनलाइन फसवणूक कशी टाळावी?
उत्तर: योजनेची माहिती केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळावरूनच घ्यावी. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि कोणालाही आपली गोपनीय माहिती देऊ नये.
Read About : 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
website : yojanamazi.com
अशाच विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर व अधिकृत माहिती मिळवण्यासाठी योजना माझी (yojanamazi.com) या वेबसाइटला भेट द्या. सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आमचे Facebook आणि Instagram पेज फॉलो करा.