PM Kisan Maandhan Yojana in marathi : शेतकरी पती-पत्नीला मिळणार 6000 पेन्शन

PM Kisan Maandhan Registration : केंद्र सरकारची भन्नाट योजना, असा करा अर्ज

PM Kisan Maandhan Yojana in marathi : केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना वृद्धपकाळामध्ये आर्थिक मदत करण्यासाठी योजना सुरू केली आहे. पीएम किसान मानधन योजना असे या योजनेचे नाव असून या योजनेद्वारे शेतकरी असलेल्या पती-पत्नीला 6 हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. याची नोंदणी कशी करावी याची संपूर्ण माहिती आपण आज पाहूया..

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजना पैकीच एक म्हणजे पीएम किसान मानधन योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून वृद्ध काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3 हजार रुपये पेन्शन देण्यात येते. विशेष बाब म्हणजे या योजनेमध्ये पती-पत्नी दोघेही पात्र ठरल्यास कुटुंबाला वर्षाला 72 हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळू शकते.

किती भरावा लागेल हप्ता?

पीएम किसान मानधन योजनेसाठी लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला वयानुसार 55 रुपये ते 200 रुपयांपर्यंत रक्कम जमा करावी लागते. शेतकऱ्याने जमा केलेल्या रकमे एवढाच वाटा केंद्र सरकारकडून पेन्शन निधीमध्ये जमा करण्यात येतो. ही रक्कम शेतकऱ्याला त्याचे 60 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत जमा करावी लागते आणि 60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3000 रुपये म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपये आणि जर कुटुंबातील पती-पत्नीला दोघांनाही पेन्शनचा लाभ मिळत असेल तर वर्षाला 72 हजार रुपये पेन्शन त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते.

पीएम किसान पेन्शन योजनेची पात्रता

अर्जदार शेतकऱ्याचे वय 18 ते 40 दरम्यान असावे.
देशातील कुठलाही शेतकरी मात्र त्याच्याकडे (2 हेक्टरपर्यंत जमीन) अल्पभूधारक शेतकरी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे अधिक जमीन असता कामा नये.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत यामध्ये हप्ता भरावा लागेल. शेतकरी जेवढा हप्ता भरेल तेवढाच केंद्र सरकारकडून ही हप्ता भरण्यात येईल आणि साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरू होईल.

पीएम किसान पेन्शन योजनेची नोंदणी प्रक्रिया?

पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज करताना तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यासोबत तुमच्या आधार कार्ड, बँक पासबुक, वयाचा दाखला अधिक कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागतील.
तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊनही आधार क्रमांकाच्या आधारे योजनेसाठी नोंदणी करू शकता. या योजनेसाठी तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला दरमहा हप्ता भरावा लागेल. तुमच्या वयानुसार तो हप्ता ठरेल.

शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी दोन पर्याय दिलेले आहेत ते आपल्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊनही या योजनेसाठी नोंदणी करू शकतात. किंवा ऑनलाईन अँप द्वारे सुद्धा शेतकरी अर्ज भरू शकतात. अर्ज भरत असताना आधार कार्ड, बँक पासबुक आणि जमिनी संबंधित कागदपत्रे जसे की सातबारा असणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर मासिक हप्त्याची रक्कम निश्चित होईल आणि ती रक्कम तुम्ही वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत भरत राहील राहायची आहे आणि वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3 हजार रुपये पेन्शन सुरू होईल. यामुळे वृद्धपकाळात तुम्हाला आर्थिक मदत मिळत राहील आणि कोणावरही निर्भर राहण्याची गरज राहणार नाही.

PM Kisan Maandhan Yojana – महत्त्वाचे FAQ

प्रश्न 1: पीएम किसान मानधन योजना म्हणजे काय?
उत्तर: प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळते.

प्रश्न 2: शेतकरी पती-पत्नीला मिळून ₹6,000 पेन्शन मिळू शकते का?
उत्तर: होय. पती आणि पत्नी दोघेही स्वतंत्रपणे पात्र असतील आणि त्यांनी योजनेत स्वतंत्र नोंदणी केली असेल, तर वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी ₹3,000 म्हणजे एकूण ₹6,000 मासिक पेन्शन मिळू शकते.

प्रश्न 3: पीएम किसान मानधन योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

प्रश्न 4: या योजनेसाठी दरमहा किती रुपये भरावे लागतात?
उत्तर: शेतकऱ्याच्या प्रवेशाच्या वयानुसार दरमहा ₹55 ते ₹200 पर्यंत योगदान भरावे लागते. केंद्र सरकारकडूनही तेवढेच योगदान जमा केले जाते. pmkisan.gov.in+1

प्रश्न 5: पीएम किसान मानधन योजनेसाठी किती जमीन असणे आवश्यक आहे?
उत्तर: अर्जदार शेतकऱ्याकडे 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. संबंधित राज्याच्या जमीन अभिलेखात नाव असणेही आवश्यक आहे. pmkisan.gov.in

प्रश्न 6: पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: आधार कार्ड, बँक खाते किंवा पासबुक आणि जमिनीच्या नोंदीसंबंधित माहिती आवश्यक असते. नोंदणीवेळी आवश्यक तपशील CSC केंद्रावर द्यावे लागतात.

प्रश्न 7: पीएम किसान मानधन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
उत्तर: योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन नोंदणी करता येते. अधिकृत संकेतस्थळ: https://maandhan.in/

प्रश्न 8: शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पेन्शन कोणाला मिळते?
उत्तर: पेन्शन सुरू असताना लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास आणि पती किंवा पत्नी स्वतः या योजनेचा लाभार्थी नसल्यास, जोडीदाराला मूळ पेन्शनच्या 50 टक्के म्हणजे ₹1,500 मासिक कौटुंबिक पेन्शन मिळू शकते. Press Information Bureau+1

प्रश्न 9: पीएम किसान मानधन योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळतो का?
उत्तर: नाही. प्रामुख्याने 18 ते 40 वयोगटातील पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. काही सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांचे सदस्य आणि इतर अपात्र श्रेणीतील व्यक्तींना लाभ मिळत नाही.

प्रश्न 10: पीएम किसान मानधन योजनेत नोंदणी केल्यानंतर पेन्शन कधी सुरू होते?
उत्तर: लाभार्थी शेतकऱ्याचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि योजनेच्या अटींची पूर्तता झाल्यावर दरमहा ₹3,000 पेन्शन सुरू होते.

read about : One Nation One Ration Card in marathi : वन नेशन, वन रेशन कार्डचा मोठा फायदा!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
ABHA कार्ड म्हणजे काय? 
website : yojanamazi.com

अशाच विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर व अधिकृत माहिती मिळवण्यासाठी योजना माझी (yojanamazi.com) या वेबसाइटला भेट द्या. सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आमचे Facebook आणि Instagram पेज फॉलो करा.