Benefits of the ayushman vaya Vandana card In Marathi : कोणाला बनवता येते कार्ड जाणून घ्या संपूर्ण माहिती
Benefits of the ayushman vaya Vandana card केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आयुष्मान वंदना कार्ड योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत 70 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार सुविधा देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे वय वंदना कार्ड असणे आवश्यक आहे.
Benefits of the ayushman vaya Vandana card In Marathi चला तर मग आज आपण जाणून घेऊया आयुष्मान वयवंदना कार्ड योजनेची संपूर्ण माहिती ते कुठे काढावे त्याचे काय- काय लाभ मिळतात?
Benefits of the ayushman vaya Vandana card केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून देशातील नागरिकांसाठी विविध योजना चालवत असते. यापैकीच एक केंद्र सरकारने सुरू केलेली योजना म्हणजे आयुष्मान वय वंदना कार्ड योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवते.
benefits of the ayushman vaya Vandana card and who can get it know details या योजनेअंतर्गत देशातील 70 वर्ष पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारकडून आयुष्यमान वय वंदना कार्ड दिले जाते. याचा वापर करून लोक आरोग्य सुविधाचा लाभ घेऊ शकतात.
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येतात.
काय आहे आयुष्मान वय वंदना कार्ड?
benefits of the ayushman vaya Vandana card and who can get it know details
Free Health Insurance for 70 Plus केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेअंतर्गत देशभरातील 70 पेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिक देशभरातील केंद्र सरकारने निवडलेल्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिले जातात.
Free Health Insurance for 70 Plus या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे वर्षाला कॅशलेस उपचार दिले जातात. यामध्ये सेकंडरी आणि टर्नेश्वरी उपचारांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना हे उपचार देशभरातील नोंदणीकृत रुग्णालयामध्ये घेता येतात.
आयुष्मान वय वंदना कार्ड देशातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 70 पेक्षा अधिक आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये भरती झाल्यानंतर येणारा संपूर्ण खर्च केला जातो.
यामध्ये रुग्णाची सर्जरी असेल, तपासणी, औषधे, रुग्णालयामध्ये ऍडमिट होणे आणि इतर देखभाऱ्याच्या सुविधांचा समावेश करण्यात आलेला आहे. याबरोबर नुकत्याच काही बाहेरील ओपीडी उपचार आणि काही विशेष प्रकरणचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे वाढत्या वयाबरोबरच आरोग्य संबंधित समस्याही वाढतात. अशावेळी त्यांचे नियमित उत्पन्नही बंद झालेले असते आणि त्यांच्याकडे बचतही मुबलक प्रमाणात मर्यादित असते अशा स्थितीमध्ये कुटुंबाला उपचाराचा खर्च चिंतेत टाकू शकतो.
मात्र केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्यमान वय वंदना कार्ड योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळत असल्यामुळे जेष्ठ नागरिकांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
जर तुम्हीही एक वरिष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबातही कोणी वरिष्ठ नागरिक असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्या व्यक्तीचे आपल्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन हे कार्ड काढून घ्यावे जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत उपचार घेता येतील.