Budget 2026 In Marathi : वाचा सविस्तर अर्थसंकल्प
Budget 2026 In Marathi : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण विकासासाठी मोठा घोषणा करण्यात आल्या. यामधील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे.
Budget 2026 In Marathi : आज आपण अर्थसंकल्पात कृषी सलग्न क्षेत्र आणि ग्रामीण विकास झाला या अर्थसंकल्पातून काय मिळाले आहे हे पाहणार आहोत…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना
Budget Maharashtra 2026 महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना केली आहे.
जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यात येणार आहे.
कर्जमाफी तसेच प्रोत्साहन पर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारशीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सभागृहात सांगितले. याबाबत समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाय योजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे.
सातबारा कोरा नाहीच?
Budget Maharashtra 2026 महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन राज्यातील शेतकऱ्यांना दिले होते. मात्र या घोषणाकडे सरकारने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कारण राज्यातील शेतकऱ्यांना केवळ 2 लाख पर्यंतची मर्यादा घालून कर्जमाफी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. याबरोबरच पात्र असणारे शेतकरी म्हणजे ही पात्रता काय असणार हे ही स्पष्ट करण्यात आलेले नाही त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे.

कृषी सलग्न क्षेत्र आणि ग्रामीण विकास
Budget Maharashtra 2026 राज्याचा कृषी जीडीपी 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलर्स वरून 500 अब्ज डॉलर्स वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्याचा पोशिंदा बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्यात येईल. शेतकऱ्यांना सुलभतेने सेवा देण्यासाठी महावेद ॲग्रीस्टॅक महाडीबीटी व इतर डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण
Budget Maharashtra 2026 In Marathi महाराष्ट्र आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल शेतीमध्ये देशात आघाडीवर आहे. महाविस्तार AI या प्लॅटफॉर्ममुळे 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हवामान अंदाज पिक सल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळत आहे. हा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा डिजिटल सहकारी आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी आम्ही महाविस्तार मध्ये देह वाली दिल्ली भाषेचा समावेश केला आहे.
लवकरच इतर प्रमुख आदिवासी भाषाही जोडल्या जातील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही वसुधा ही व्हॉइस सेवा सुरू केली आहे. या द्वारे फोन कॉल वरच पिकाचे आरोग्य आणि कीड व्यवस्थापनाबाबत सल्ला दिला जात आहे.
एग्रीकल्चर डेटा एक्सचेंज आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेशन अँड इंक्युबॅशन सेंटर स्थापन करण्यात येत आहे. यामुळे कृषी स्टार्टअपना मोठी चालना मिळेल.
या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीचा उत्पादन खर्च 25% पर्यंत कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

ॲग्रीस्टॅक योजना
Budget Maharashtra 2026 In Marathi कृषी क्षेत्रातील डेटा व डिजिटल सेवांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद व पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी राज्यात योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्यात असून फेब्रुवारी 2026 पर्यंत 1 कोटी 31 लाख फार्मर आयडी तयार झाले आहेत. या योजनेत आम्ही आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी यांचा देखील समावेश करीत आहोत.

कृषी समृद्धी योजना
Budget Maharashtra 2026 In Marathi कृषी समृद्धी योजना अंतर्गत 2026-27 ते 2029-30 या चार वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील.
नैसर्गिक शेती अभियान
Budget Maharashtra 2026 In Marathi राज्यात 5 लक्ष हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेती खाली आणून सकल व पोषण युक्त नैसर्गिक शेतमाल उत्पादित करण्यासाठी आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना
Budget 2026 राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा 25% आहे. ही व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करत आहोत. पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाला आता कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. यामुळे या क्षेत्रालाही शेतीप्रमाणे सर्व पायाभूत सुविधा आणि सवलती मिळतील. ज्यामुळे मत्स्य आणि पशुजन्य उत्पादनात मोठी वाढ होईल. संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त महिला गोपालक कुकूटपालक आणि शेळीपालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहन पर कार्यक्रम राबवणार आहोत.
मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना
Budget 2026 मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी प्रतिवर्षी 1240 कोटी रुपये आर्थिक भाराच्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील मच्छीमारांचे आर्थिक व सामाजिक विकासाबरोबरच पायाभूत सुविधा निर्मितीमुळे मत्स्य उत्पन्नात वाढ होणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
Budget 2026 मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एक अंतर्गत 97 टक्के कामे 30,000 किलोमीटर पेक्षा जास्त पूर्ण झाली असून उर्वरित कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. टप्पा दोन अंतर्गत 2450 किलोमीटर रस्त्याची कामे पूर्ण झाली असून उर्वरित काम प्रगती पथावर आहे. आता आम्ही टप्पा तीन घोषित करत असून त्या अंतर्गत 23 हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते व पुराची कामे हाती घेण्यात येतील.
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना
Budget 2026 ग्रामीण भागातील शेतपादन रस्त्याच्या मजबुती करणासाठी संपूर्ण यंत्रसामुग्रीच्या साह्याने जलद गतीने काम करण्यासाठी सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेतपादन रस्ते या नवीन योजनेस मान्यता देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या योजनेचे भाग एक व दोन अंतर्गत 99 टक्के कामे 26,758 किलोमीटर रस्ते व 782 पूल पूर्ण झाली आहेत.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग तीन अंतर्गत 6,331 किलोमीटर लांबीचे 993 रस्त्याच्या कामापैकी 5 हजार 86 किलोमीटर लांबीची 673 तसेच 223 पुलांच्या कामापैकी 57 फुलांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग चार अंतर्गत लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या, वस्त्या बारबाही रस्त्याने जोडण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
Budget 2026 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 2024-25 व 25-26 साठी 27 लाख 87 हजार मंजूर घरकुलांपैकी 3 लाख 57 हजार घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 33 हजार 410 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पंतप्रधान साध्य करण्यात येणार आहे. पीएम जनमन आवास योजनेअंतर्गत 54 हजार 129 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 17 हजार 929 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.