mann ki baat : मन की बात मध्ये मोदींची माहिती
PM Surya Ghar Yojana in marathi : पीएम सूर्यघर योजना बदलतेय लोकांचे नशीबपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 132 वा मन की बात हा कार्यक्रम रविवारी सादर झाला. या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सुर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व देशवासीयांना केले आहे. याबरोबरच त्यांनी याद्वारे सौर ऊर्जेचे फायदे सांगितले आणि याद्वारे रोजगार आणि कमाईची संदर्भातही मार्गदर्शन केले.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana impact : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी मन की बातचा 132 व्या भागांमध्ये सौर ऊर्जाचे महत्व सांगितले. आज देशाचा कानाकोपऱ्यात सूर्यघर मोफत वीज योजनेचा प्रभाव दिसत असल्याचेही मोदी म्हणाले. याबरोबरच सौर ऊर्जेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याबरोबरच त्यांनी सौर ऊर्जाद्वारे रोजगार आणि कमाई करत असलेल्या लोकांचे उदाहरणही सांगितली.
PM Surya Ghar Yojana in marathi : पीएम सूर्यघर योजना बदलतेय लोकांचे नशीबपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज तुम्ही देशातील कुठल्याही छोट्या-मोठ्या शहरात जा, तिथे एक मोठा बदल झालेला तुम्हाला नक्कीच दिसेल. तो म्हणजे तेथील घरावर मोठ्या प्रमाणात सोलर पॅनल लावलेले दिसतील. काही वर्षांपूर्वी एखाद दुसऱ्या घरावर सौर पॅनल लावलेले दिसत. मात्र आज पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे देशातील कानाकोपऱ्यात सौर पॅनल दिसत आहेत.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana impact : या योजनेमुळे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या पायल मुंजपारा यांच्या जीवनामध्ये मोठा बदल झाला आहे. त्यांनी सूर्य पहलच्या माध्यमातून सौर ऊर्जा टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले आणि चार महिन्यांमध्ये सोलर टेक्निशियनचा कोर्स पूर्ण केला. आता त्या एक कुशल सोलर टेक्निशियन बनल्या आहेत.
पायल एक सोलर उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. ती आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये सोलर पॅनल लावण्याचे काम करते आणि याद्वारे त्यांना महिन्याला हजारो रुपये उत्पन मिळत आहे.
PM Surya Ghar Yojana in marathi : पीएम सूर्यघर योजना बदलतेय लोकांचे नशीबपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मेरठचे अरुण कुमार आता आपल्या परिसरामध्ये ऊर्जा दाता म्हणून काम करत आहेत. नुकतेच त्यांनी दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि आपले अनुभव सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की याद्वारे ते केवळ वीज बिल वाचवत नाहीत तर आपली अतिरिक्त वीज महावितरणला विक्रीही करतात.
याबरोबर जयपुर मधील मुरलीधर जी यांची ही यशस्वी गाथा अशाच प्रकारचे आहे. यापूर्वी त्यांची शेती डिझेल पंपावर अवलंबून होती. मात्र यावर हजारो रुपये खर्च व्हायचे. मात्र आता सोलर पंप लावल्याने त्यांचा शेतीचा खर्च कमी झाला आहे. आणि उत्पादनही वाढले आहे. कारण त्यांना 24 तास सौर पंपासाठी सोलर पॅनलद्वारे वीज उपलब्ध होत आहे.
आता इंधनाची चिंता राहिली नाही आणि शेतीला योग्य वेळी ते पाणी देत आहेत. त्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न ही वाढले आहे. याबरोबर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता त्यांचे कुटुंब स्वच्छ ऊर्जा सोबत चांगले जीवन जगत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना चालू आहे. नॉर्थ ईस्टच्या भागांमध्ये पण याचा लाभ मिळत आहे. त्रिपुराच्या अनेक मागास गावे असे आहेत जेथे विजेची मोठी समस्या होती. मात्र आता सोलर मिनी ग्रीडच्या माध्यमातून तेथे प्रत्येक घरामध्ये प्रकाश पोहचला आहे. तेथे मुले आता रात्रीही अभ्यास करू शकत आहेत. मोबाईल लोकांना चार्ज करता येत आहे. आणि गावांमध्ये सामाजिक जीवनामध्ये बदल झाला आहे.
देशामध्ये सौर ऊर्जा क्रांतीचे असे अनेक उदाहरण पाहायला मिळत आहेत. तुम्हीही या क्रांतीमध्ये सहभागी व्हा आणि दुसऱ्यांना पण या योजनेशी जोडा आणि सौर ऊर्जा मध्ये आत्मनिर्भर व्हा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 132 व्या भागाच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमांमध्ये केले आहे.