PM Surya Ghar Yojana Update News In Marathi : कमी खर्च, 25 वर्षापर्यंत मोफत वीज

PM Surya Ghar Yojana 2026 Update News In Marathi : पीएम सूर्यघर योजनेत मिळते मोठे अनुदान

PM Surya Ghar Yojana In Marathi : जर तुम्हीही प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत सोलर पॅनल लावण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे की तुम्हाला या सोलर पॅनलवर किती अनुदान मिळणार आहे. चला जाणून घेऊया की तुम्हाला किती अनुदान मिळते.

PM Surya Ghar Yojana केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी केंद्र सरकारकडून सामान्य नागरिकाला मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज योजनेचा लाभ मिळतो.

मात्र सर्वसामान्य नागरिकाला एक प्रश्न सतत पडतो तो म्हणजे किती किलोमीटर वर किती अनुदान मिळते आणि ते किती दिवसात मिळते. याबरोबरच सोलर पॅनल लावण्यासाठी किती खर्च येतो.

कुठल्याही अनुदानाशिवाय बाजारातून सोलर पॅनल खरेदी करून लावण्यासाठी प्रति किलोवॅट 60,000 ते 80 हजार रुपये खर्च येतो. मात्र पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सरकार या खर्चातील 60% ते 40% अनुदान म्हणून देत आहे.

1kw प्रणाली सोलर पॅनल इंस्टॉल केल्यानंतर सरकार 30 हजार रुपये पर्यंत अनुदान देते.
2kw सिस्टीम वर 60 हजार रुपये अनुदान देते.
3kw सिस्टीम किंवा यापेक्षा मोठी अधिक सिस्टीमवर 78 हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे.

याबरोबरच काही राज्य सरकारने या अनुदानामध्ये अजून त्यांच्या अनुदानाचाही हिस्सा उचलला आहे. यामुळे सामान्य नागरिकाला अजून कमी दरामध्ये सोलर सिस्टिम इन्स्टॉलेशन करता येते. तुम्ही लावत असलेल्या सोलर पॅनल चे आयुष्य 25 वर्षापर्यंत आहे म्हणजेच 25 वर्षापर्यंत तुम्हाला मोफत वीज मिळणार आहे.

जर तुम्ही 3 किलोमीटर सोलर सिस्टिम लावली असेल तर तुम्हाला जवळपास 1.80 लाख रुपये खर्च करावा लागतो. याच प्रमाणे 2 किलो वॅट सोलर पॅनल लावल्यास 1.1 लाख रुपये आणि 1 किलोवॅट सोलर पॅनल लावण्यासाठी 60 ते 80 हजार रुपये खर्च येतो.

मात्र केंद्र सरकार प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना अंतर्गत तुम्हाला अनुदान देत असल्यामुळे तुम्हाला कमी खर्चामध्ये आपल्या छतावर सोलर पॅनल सिस्टीम लावण्यास मदत होते. मग विचार कसला करताय चला तत्काळ अर्ज करा आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी तुम्ही केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता किंवा जवळच्या सीएससी केंद्रात जाऊनही अर्ज करू शकता.

पीएम सूर्य घर योजनेचे फायदे

Benefits of PM Surya Ghar Yojana

एक कोटी नागरिकांना मोफत वीज मिळेल.

या योजनेमुळे सरकारच्या वीज खर्चात 50 लाख रुपयांची बचत होणार आहे.

या योजनेमुळे सौर ऊर्जेचा जास्त वापर होणार असून त्यामुळे नैसर्गिक साधनांची बचत होणार आहे.

या योजनेमुळे प्रदूषण कमी होणार आहे. कारण कोळशामुळे तयार होणारी वीज ही कमी होईल.

नागरिकांच्या घरातील आता विजेला खंड पडणार नाही, या योजनेअंतर्गत 40% पर्यंत सबसिडी मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या अंतरीम अर्थसंकल्पात सौर ऊर्जा योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. देशातील तब्बल एक कोटी घरावर सोलर पॅनल बसवण्यात येणार असून 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेला PM Surya Ghar Muft Bijli Yojna मंजुरी दिली असून यासाठी 75021 कोटी रुपये खर्च येणार आहे.

पीएम सूर्यघर योजनेचे लाभ

  1. घरासाठी मोफत वीज मिळेल.
  2. सरकारसाठी विजेची मागणी कमी होईल.
  3. नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढेल.
  4. कार्बन उत्सर्जन कमी होईल.

पीएम सूर्यघर योजनेसाठीची पात्रता

Eligibility of PM Surya Ghar Yojana

  • तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे
  • कुटुंबाकडे छत असलेले घर असणे आवश्यक आहे. कारण सौर पॅनल लावण्यासाठी ते महत्त्वाचे आहे.
  • कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे गरजेचे आहे
  • कुटुंबाने सौर पॅनलसाठी अन्य सबसिडी असलेल्या कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
  • आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.
  • तुमचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे.

पीएम सूर्यघर योजनेसाठीची कागदपत्रे

Documents of PM Surya Ghar Yojana

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

छत असलेल्या घराचे प्रमाणपत्र

रेशन कार्ड

आधार कार्ड

विज बिल

बँकेचे पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करावा

PM Surya Ghar Yojana online apply

वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तो खालील पद्धतीने भरा.

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या Pradhanmantri Surya Ghar Yojana अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल, तेथे गेल्यावर Login Here हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आणि संकेतांक टाका.

यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करा, त्यानंतर तुमच्यासमोर नवीन होमपेज उघडेल.

त्यामध्ये Apply for Rooftop Solar Installation हा फॉर्म दिसेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.

त्या फॉर्ममध्ये एप्लीकेशन डिटेल्स म्हणजे त्या मध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे तिथे upload करावे लागतील.

त्यानंतर तुम्ही संपूर्ण फॉर्म पुन्हा एकदा चेक करून फायनल सबमिट करावा यानंतर तुमचा फॉर्म तपासणीसाठी जाईल आणि त्यानंतर तुम्हाला मंजुरी मिळेल आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.