EPFO New Ruls In Marathi : आता चुटकीसरशी काढा पीएफ रक्कम

EPFO New Ruls : जाणून घ्या ॲडव्हान्स रक्कम मिळवण्याची 5 कारणे आणि नवीन नियम

EPFO New Ruls : पीएफ मधून पैसे काढणे आता अधिक सोपे झाले आहे. आता नवीन ईपीएफओ योजना 2026 अंतर्गत लग्न, शिक्षण आणि घर खरेदीसाठी तुम्ही केवळ एक वर्षाच्या नोकरी नंतर पीएफ मधून पैसे काढू शकणार आहात. मात्र हे लक्षात ठेवा की तुम्हाला त्यावेळी 25% बॅलन्स खात्यामध्ये ठेवावे लागेल. जाणून घ्या ॲडव्हान्स रक्कम काढण्याचे 5 कारणे आणि नवीन नियमाची माहिती…

EPFO New Ruls : जर तुम्हालाही तुमच्या काही कामासाठी पीएफ खात्यामधून पैसे काढायचे आहेत तर तुमच्यासाठी कर्मचारी भविष्य निधी योजना 2026 चे नवीन नियम जाणून घेणे आवश्यक आहेत. त्या नवीन नियमानुसार ॲडव्हान्स रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.

epf scheme 2026 : आता कर्मचारी आपले लग्न, मुलांचे शिक्षण किंवा घर खरेदीसाठीच्या कारणासाठी पीएफ मधील पैसे पूर्वीपेक्षा जलद गतीने काढू शकणार आहेत. मात्र नवीन नियमांमध्ये एक लॉक-इन टाकण्यात आली आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 25% रक्कम ठेवणे आवश्यक आहे. कारण तुमचा निवृत्ती फंड पूर्णपणे संपवून जाऊ नये.

काय आहे 25% चा नवीन नियम?

epf scheme 2026 : नवीन ईपीएफ नियमाअंतर्गत सर्वात मोठा बदल म्हणजे ‘मिनिमम बॅलेन्स’ संदर्भात झाला आहे. आता प्रत्येक सदस्य आपल्या खात्यामधून पूर्ण पैसा ॲडव्हान्स म्हणून काढू शकणार नाही, विड्रॉलच्या वेळी तुम्हाला एकूण बॅलन्सच्या कर्मचारी आणि नियुक्तो दोघांचा हिस्सा मिळून 25% भाग खात्यामध्ये शिल्लक ठेवावा लागणार आहे. बाकी 75 टक्के रक्कम तुम्ही काढू शकता.

त्याला Eligible Member Balance म्हटले जाते, तुम्ही तुमच्या गरजेनुसार या 75 टक्के रकमेतून 100 टक्के पर्यंत रक्कम काढू शकता.

या 5 कारणाने काढू शकता पीएफची रक्कम

5 big pf advance withdrawal rules eligibility

घर किंवा जमीन खरेदी : स्वतःचे घर खरेदीसाठी, जमीन खरेदीसाठी, होम लोन भरण्यासाठी किंवा घराची दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही पीएफ मधील पैसा काढू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या Eligible Member Balance या मधून 100% रक्कम काढू शकता. मात्र ठरवून दिलेले नियमाचे पालन करावे लागेल.
आजाराच्या उपचारासाठी : स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी तुम्ही 100 टक्के रक्कम काढण्यास पात्र आहात.
शिक्षण : उच्च शिक्षणासाठी तुम्ही पीएफ मधून रक्कम काढू शकता. नवीन योजनेच्या सदस्यांना पूर्ण सेवेच्या अवधी दरम्यान अधिक तर 10 वेळा शिक्षणासाठी रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.
लग्नासाठी : स्वतःच्या लग्नासाठी, भाऊ- बहिणीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या लग्नासाठी तुम्ही पीएफ मधून पैसा काढू शकता. सदस्यता दरम्यान अधिक तर 5 वेळेस तुम्ही यासाठी पैसा काढू शकता. यासाठी परवानगी आहे.
विशेष परिस्थिती दरम्यान : जर एखादा सदस्य गंभीर आर्थिक संकट किंवा कुठले अन्य आपत्ती सारख्या स्थितीमध्ये तुम्ही आपल्या स्पेशल कॅटेगिरी अंतर्गत पीएफ मधील पैसा काढू शकतो.

वेटिंग पिरियड झाला कमी, आता केवळ 12 महिन्यात पात्र

जुन्या नियमानुसार विविध कामासाठी पाच ते सात वर्ष pfo सदस्य असण्याची आवश्यकता होती. मात्र आता नवीन ईपीएफ नियम 2026 अंतर्गत यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आता अधिक तर प्रकरणांमध्ये केवळ 12 महिने (एक वर्षात) तुम्ही ईपीएफ सदस्यत्व घेतल्यानंतर आपली ॲडव्हान्स रक्कम साठी पात्र असणार आहात, म्हणजेच आता नवीन कर्मचाऱ्यांना आपल्या बचतीचा वापर करण्यासाठी एक वर्षच थांबावे लागेल. अधिक वर्ष थांबण्याची आवश्यकता नाही त्यांना एक वर्षानंतर त्याचा लाभ घेता येणार आहे.

हे लागतील आवश्यक कागदपत्रे?

क्लेम करण्याची प्रक्रिया आता पहिल्यापेक्षा अधिक सोपी करण्यात आली आहे. यामध्ये डिजिटल आणि पेपरलेस प्रक्रिया राबवली जात आहे. जर तुम्ही केवायसी पूर्ण केली आहे तर तुम्ही ऑनलाईन क्लेम करून रक्कम काढू शकता. यासाठी कुठले कागदपत्र द्यायची आवश्यकता पडणार नाही. मात्र ती कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत.

आधारशी लिंक ऍक्टिव्ह UAN नंबर

UAN नंबर सोबत लिंक आणि व्हेरिफिकेशन केलेले बँक खाते.
पॅन कार्ड (टॅक्स नियमांचे पालनासाठी).
विशेष प्रकरणी ( जसे की उपचार-शिक्षक) ईपीएफओ तुमच्याकडे पुरावा किंवा कागदपत्रे मागू शकतो.
टॅक्सचा नवीन नियम लक्षात ठेवा
लक्षात ठेवा की रक्कम काढण्याची पात्रता बारा महिने नंतर मिळणार आहे. मात्र टॅक्सचा नियम बदलला नाही, जर तुम्ही पाच वर्ष निरंतर सेवा पूर्वी पैसे काढले तर त्यावर टॅक्स लागू शकतो मात्र रक्कम काढण्यापूर्वी टॅक्स किती द्यावा लागेल हे समजून घेणे आवश्यक आहे.

काही नियम जशास तसेच?

तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की काही प्रमुख नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. 5 वर्षाच्या सलग सेवेचा नियम अजूनही ईपीएफ मधून काढलेल्या रकमेची कर पात्रता ठरवतो. अंशतः पैसे काढण्याची पात्रता नाही याव्यतिरिक्त ईपीएफ योगदानाची दर व्याज मोजण्याच्या पद्धती आणि युएएन पोर्टबिलिटी यामध्ये कुठल्याही बदल करण्यात आलेला नाही.

FAQs

मी ॲडव्हान्स पैसे काढल्यास माझी पेन्शन कमी होईल का?
नाही. अंशतः पैसे काढणे हे तुमच्या पीएफ फंडातून केलेले जाते. पेन्शन फंडातून नाही. याचा तुमच्या पेन्शनच्या रकमेवर कुठलाही परिणाम होणार नाही.

काढलेले पैसे पीएफ खात्यात परत जमा करावे लागतात का?
नाही. हे बँकेच्या कर्जासारखे नाही. ही तुमची स्वतःची बचत आहे आणि ती परत करण्याची आवश्यकता नाही.
दावा दाखल करण्यासाठी मला कार्यालयात किंवा एचआर कडे जावे लागेल का?
मुळीच नाही. जर तुमचा आधार बँक खात्याशी जोडलेले असेल तर तुम्ही ईपीएफओ पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करून रक्कम काढू शकता.

मी त्याच कारणासाठी (जसे की आजारपण) पुन्हा पैसे काढू शकेल का?
होय, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही पुन्हा पैसे काढू शकता. मात्र ईपीएफओचे वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे नियम आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन दावे वारंवार का नाकारली जातात?
काही प्रकरणांमध्ये बँक पासबुक, चेकचा फोटो स्पष्ट नसल्यामुळे किंवा आधार आणि पीएफ रेकॉर्डमध्ये नावाची स्पेलिंग जुळत नसल्यामुळे दावे नाकारले जातात.