कार्ड बनवण्याची प्रक्रिया पात्रता आणि लाभ काय आहेत?
abha card 2026 benefits, elgibility, how to apply online in marathi : आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आभा कार्ड बनवले जातात. या कार्डच्या माध्यमातून मोफत उपचाराची सुविधा मिळत नाही मात्र मेडिकल हिस्ट्री संबंधित सर्व कागदपत्रे एका जागेवर डिजिटल सेव (सुरक्षित जतन) केले जातात. यामुळे इमर्जन्सी परिस्थितीमध्ये त्याचा मोठा लाभ होतो. हे कार्ड ऑनलाइन बनवले जाऊ शकते.
abha card 2026 आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट आभा कार्ड आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत बनवले जाते. यामध्ये 14 अंकी आभा आयडी तुम्हाला दिला जातो. या आयडीच्या द्वारे रुग्ण उपचाराची जुनी संपूर्ण माहिती डिजिटल पद्धतीने या क्रमांकावर सेव करू शकतो. जेणेकरून कुठल्याही इमर्जन्सी परिस्थितीमध्ये रुग्णाच्या पूर्वी केलेल्या उपचाराबद्दल माहिती आभा कार्डवर उपलब्ध असेल.
यामध्ये औषधे, यापूर्वी घेतलेले उपचार आधीची माहिती यावर सेव केली जाईल. आभा कार्ड संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत- जसे की याद्वारे आम्हाला मोफत उपचार मिळतील का? हे कार्ड बनवण्यासाठी पैसे लागतात का? आभा कार्ड बनवण्याची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे? चला जाणून घेऊया प्रश्नांची उत्तरे आजच्या बातमीत..
आभा कार्डद्वारे मोफत उपचार मिळतात?
abha card 2026 benefits, elgibility, how to apply online in marathi : आभा कार्डचा सर्वात मोठा लाभ म्हणजे यामध्ये आरोग्य संबंधित संपूर्ण माहिती डिजिटल पद्धतीने रेकॉर्ड केली जाते. आभा कार्डद्वारे मेडिकल हिस्ट्रीची संपूर्ण माहिती काढली जाऊ शकते. देशातील कुठल्याही रुग्णालयात किंवा डॉक्टर द्वारे या आयडीद्वारे रुग्णाची मेडिकल हिस्ट्री चेक करता येते. मात्र आभा कार्ड द्वारे मोफत उपचाराची सुविधा मिळत नाही. 5 लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार आयुष्मान कार्ड द्वारे मिळतात.
ABHA Card आणि Ayushman Card यातील फरक
आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड हे दोन्हीही कार्ड वेगवेगळ्या आहेत आणि याचे कामही वेगवेगळे आहेत. आभा कार्डद्वारे तुमची मेडिकल हिस्ट्री डिजिटल पद्धतीने साठवून ठेवली जाते. तर आयुष्मान कार्डद्वारे तुम्हाला मोफत 5 लाख रुपये पर्यंत उपचार दिले जातात.
आभा कार्ड बनवण्याची पात्रता
- देशातील प्रत्येक व्यक्ती आभा कार्डसाठी अर्ज करू शकतो, ज्याचे वय 18 पेक्षा अधिक आहे असा व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने आभार जनरेट करू शकतो.
- कमी वय असणाऱ्या मुलांच्या नावे त्यांचे पालक किंवा आई-वडील आभा कार्ड मुलांचे बनवू शकतात.
- मुलाच्या जन्मानंतर कधीही हा आभा आयडी कार्ड बनवले जाऊ शकते. हे आयडी कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे.
आभा कार्ड बनवण्याची प्रक्रिया
- सर्वात प्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईट abha.abdm.gov.in या साईडला भेट द्या. त्यानंतर तुमच्यासमोर क्रियेट आभा नंबर हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- तिथे तुम्हाला आधार नंबर किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. तो पर्याय निवडल्यानंतर आधार नंबर टाका आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी मिळेल, तो ओटीपी इथे भरा आणि यानंतर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा.
- आता तुम्ही तुमची कॉन्टॅक्ट डिटेल्स जसे की मोबाईल नंबर, ईमेल आयडी आदी माहितीची नोंदणी करा. त्यानंतर तुमचा आभा ऍड्रेस म्हणजेच आयडीची निवड करू शकता.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचे आभा आयडी कार्ड बनून तयार असेल, तुम्ही याच वेबसाईटवरून आभा कार्ड डाऊनलोडही करू शकता किंवा तुम्हाला वाटले तर तुम्ही तुमच्या मोबाईल फोन मध्ये आभा ॲप डाऊनलोड करूनही आभा आयडी कार्ड बनवू शकता.
आभा कार्डबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्रश्न 1. आभा कार्ड म्हणजे काय?
उत्तर: आभा कार्ड (ABHA Card) म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट. हे 14 अंकी डिजिटल हेल्थ आयडी असून नागरिकांच्या आरोग्यविषयक नोंदी डिजिटल स्वरूपात ठेवण्यास मदत करते.
प्रश्न 2. आभा कार्ड काढण्यासाठी किती पैसे लागतात?
उत्तर: आभा कार्ड तयार करणे आणि डाउनलोड करणे पूर्णपणे मोफत आहे.
प्रश्न 3. आभा कार्ड कोणाला काढता येते?
उत्तर: भारतातील नागरिकांना आभा कार्ड तयार करता येते. यासाठी वयाची विशिष्ट मर्यादा नाही.
प्रश्न 4. आभा कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
उत्तर: आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक वापरून ऑनलाइन नोंदणी करता येते. ड्रायव्हिंग लायसन्सचाही पर्याय उपलब्ध आहे.
प्रश्न 5. आधार कार्डशिवाय आभा कार्ड काढता येते का?
उत्तर: होय. आधार कार्डशिवाय ड्रायव्हिंग लायसन्सच्या माध्यमातूनही नोंदणी करता येते. मात्र त्यासाठी आरोग्य केंद्रात ओळख पडताळणी करावी लागू शकते.
प्रश्न 6. आभा कार्डचा उपयोग काय आहे?
उत्तर: रुग्णांचे वैद्यकीय रिपोर्ट, तपासण्या, औषधोपचार आणि आरोग्यविषयक नोंदी डिजिटल स्वरूपात व्यवस्थापित करण्यासाठी आभा कार्ड उपयोगी ठरते.
प्रश्न 7. आभा कार्डमुळे मोफत उपचार मिळतात का?
उत्तर: नाही. आभा कार्ड हे डिजिटल हेल्थ आयडी आहे. यामुळे स्वतःहून मोफत उपचार मिळत नाहीत. मोफत उपचारांसाठी स्वतंत्र आरोग्य योजनांची पात्रता आवश्यक असते.
प्रश्न 8. आभा कार्ड ऑनलाइन डाउनलोड कसे करायचे?
उत्तर: https://abha.abdm.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून Download ABHA Card या पर्यायावर क्लिक करा.
प्रश्न 9. आभा कार्ड हरवल्यास पुन्हा मिळू शकते का?
उत्तर: होय. अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून आभा कार्ड पुन्हा डाउनलोड करता येते.
प्रश्न 10. आभा कार्ड काढणे बंधनकारक आहे का?
उत्तर: नाही. आभा कार्ड तयार करणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. नागरिकांच्या संमतीनेच आरोग्यविषयक माहिती शेअर केली जाते.
read about : One Nation One Ration Card in marathi : वन नेशन, वन रेशन कार्डचा मोठा फायदा!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
website : yojanamazi.com
महत्त्वाचे मुद्दे
अशाच विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर व अधिकृत माहिती मिळवण्यासाठी योजना माझी (yojanamazi.com) या वेबसाइटला भेट द्या. सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आमचे Facebook आणि Instagram पेज फॉलो करा.