Ladki Bahin Yojana : सप्टेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana Latest Update in marathi : गेल्या काही दिवसापासून लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे. मात्र आता या संदर्भात मोठे अपडेट समोर आली आहे. चला जाणून घेऊया काय आहे माहिती..
हेडलाईन
- लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? 344.62 कोटींचा निधी मंजूर
- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरच्या 1500 रुपयांचा मार्ग मोकळा
- लाडक्या बहिणीच्या हप्ताबद्दल मोठे अपडेट
Ladki Bahin Yojana Latest Update in marathi : आता देशभरामध्ये दिवाळीचे वारे वाहू लागले आहे. दिवाळी तोंडावर येऊन ठेपले आहे. अवघ्या काही दिवसात दिवाळी सुरू होईल. त्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींना देखील आपला हप्ता कधी जमा होईल याची प्रतीक्षा लागली आहे. त्यांच्यासाठी ही मोठी अपडेट आली आहे. कारण नुकताच सामाजिक न्याय विभागाने लाडक्या बहिणीच्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाला 344.62 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा महिलांना होती. लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले जातात. मात्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344.62 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वितरित केले आहेत.
Ladki Bahin Payment Date 2026 त्यामुळे आता कुठल्याही क्षणी महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होऊ शकतो. ही रक्कम महिला व बालविकास विभागाकडे जमा झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या लाभाचे वितरण विभागाकडून करण्यात येईल. आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील.
Ladki Bahin Yojana 1500 Rupees : महाराष्ट्र सरकारने सुरू केली माझी लाडकी बहीण योजना एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 हजार रुपये प्रति महिना दिले जातो. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार का? अशी चर्चा मागील काही दिवसापासून होती मात्र अजून सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार या संदर्भात स्पष्टता नाही. मात्र सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 344.62 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहेत.
81 लाख महिलांची नावे वगळली?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात महायुती सरकारने 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. तेव्हापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये रक्कम वर्ग करण्यात येते. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 कोटी 47 लाख लाभार्थी महिलांची संख्या होती. मात्र राज्य सरकारने ई- केवायसी प्रक्रिया राबवल्यानंतर ही संख्या मोठ्या प्रमाणात घटली. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर काहींची नावे वगळण्यात आली.
काही महिलांची नावे वयाची 65 वर्षे पूर्ण असल्यामुळे वगळली गेली तर काहींची सदन असतानाही या योजनेचा लाभ घेतला म्हणून नावे वगळण्यात आली. तर काही नावे सरकारी कर्मचारी असतानाही या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे वगळण्यात आली. मात्र एवढी नाव वगळण्यात आल्यामुळे सरकारचा या योजनेवरील खर्चही कमी झाला आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 कोटी 66 लाख एवढीच लाभार्थी महिलांची संख्या राहिली म्हणजे जवळपास 81 लाख महिलांची नावे वगळण्यात आली.
या महिलांची नावे वगळण्यात आली
राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. त्यांनी अनेक सभांमधून ही योजना कधीच बंद होणार नसल्याचेही सांगितले. ही योजना सुरू केली त्यावेळेस राज्य सरकारकडून अडीच लाखाच्या वरील उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र तरीही काही महिलांनी अर्ज केले आणि या योजनेचा लाभ घेतला अशा महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली. याशिवाय ज्या महिलांच्या नावावर चार चाकी वाहन असेल त्यांचा देखील लाभ या योजनेअंतर्गत बंद करण्यात आला. तसेच सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले. त्यावरही राज्य सरकारने कारवाई करत त्यांचाही लाभ बंद केला आहे.
लाडकी बहीण योजना 2026 – महत्त्वाचे FAQ
प्रश्न 1: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना किती रुपये मिळतात?
उत्तर: या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते.
प्रश्न 2: लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?
उत्तर: सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप निश्चित तारीख स्पष्ट झालेली नाही. मात्र निधी वितरणामुळे लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
प्रश्न 3: लाडकी बहीण योजनेसाठी 344.62 कोटी रुपयांचा निधी कशासाठी वितरित करण्यात आला?
उत्तर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र लाभार्थी महिलांच्या सप्टेंबर महिन्याच्या लाभासाठी 344.62 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वितरित केला आहे.
प्रश्न 4: सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार का?
उत्तर: सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे हप्ते एकत्र जमा होणार असल्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
प्रश्न 5: लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळतो?
उत्तर: महाराष्ट्रातील शासनाने निश्चित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
प्रश्न 6: लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाल्यास काय करावे?
उत्तर: सर्वप्रथम ई-केवायसी, बँक खाते, आधार लिंकिंग आणि योजनेच्या पात्रतेची तपासणी करावी. आवश्यक असल्यास संबंधित महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
प्रश्न 7: लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात जमा होतात?
उत्तर: योजनेसाठी नोंदणी केलेल्या आणि आधार संलग्न असलेल्या पात्र लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात DBT द्वारे पैसे जमा केले जातात.
Read About PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तारीख जाहीर!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
website : yojanamazi.com
