70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान वय वंदना कार्ड!, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Ayushman Vay Vandana Card in marathi : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाची अट न ठेवता आरोग्य संरक्षण दिले जाते. जाणून घ्या वय वंदना कार्डची पात्रता, फायदे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया.
केंद्र सरकारने देशातील वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेसाठी आरोग्य कवच दिले आहे. यासाठी केंद्र सरकारने वय वंदना कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सत्तरी पार ज्येष्ठांना 10 लाख रुपयांचे आरोग्यकवच वय वंदना कार्डद्वारे देण्यात येते. तुम्ही कार्ड काढले का नाही?
वाढत्या वयाबरोबरच आरोग्याच्या ही विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वय वंदना कार्ड योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सत्तर वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना 10 लाख रुपयांचे आरोग्य सुरक्षा कवच केंद्र सरकारकडून देण्यात येते.
वंदना कार्ड योजनेची पात्रता
Ayushman Vay Vandana Card : 70 वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक वय वंदना योजनेसाठी पात्र मानला जातो. मग त्याचे उत्पन्न कितीही असो, त्यामध्ये कुठलेही प्रकारची अडचण येत नाही. त्या व्यक्तीला पेन्शन असली तरीही त्याला या योजनेचा लाभ दिला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी वय वंदना कार्ड काढून घ्यावे जेणेकरून त्यांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी 10 लाख रुपयांचे मोफत उपचार घेता येतील आणि अचानक उद्भवलेल्या संकटाला सामोरे जाता येईल.
वंदना कार्ड काढण्यासाठी कुठलीही अट ठेवण्यात आलेली नाही. केवळ तुमचे वय 70 पार असणे आवश्यक आहे. 70 वर्ष झालेला प्रत्येक व्यक्ती केंद्र सरकारच्या आयुष्मान योजनेअंतर्गत 10 लाख रुपये पर्यंत आरोग्य कवच मिळू शकतो.
आयुष्यमान कार्ड आणि वय वंदना कार्ड मध्ये काय फरक
आयुष्यमान योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना पाच लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार देण्यात येतात. मात्र वय वंदना कार्ड हे 70 वर्षावरील ज्येष्ठांसाठी आहे. या कार्डद्वारे कुटुंबातील दोन जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो. महत्त्वाचे म्हणजे हे कार्ड कुटुंबाच्या पाच लाखाच्या मर्यादा व्यतिरिक्त अतिरिक्त संरक्षण देते म्हणजे या कार्डद्वारे 10 लाख रुपयापर्यंत उपचार मोफत मिळतात.
घरबसल्या बनवा वय वंदना कार्ड
- सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल ॲप मध्ये आयुष्मान ॲप डाऊनलोड करा.
- ॲप डाऊनलोड झाल्यानंतर बेनिफिशरी लाभार्थी पर्याय निवडून मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी लॉगिन करा.
- लॉगिन झाल्यानंतर 70 वर्ष वयाचा पर्याय निवडून आधार नंबर टाका, आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो सबमिट करा.
- स्वतःचा लाईव्ह फोटो काढून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
- त्यानंतर काही वेळात तुमचे वय वंदना कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल.
- हे कार्ड तुम्ही डाऊनलोड करून घ्या.
- याबरोबरच वय वंदना कार्ड तुम्ही जवळच्या रुग्णालयातील आरोग्य सेवकाकडूनही काढू शकता.
पूर्णपणे कॅशलेस उपचार
70 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात भरती होताना एक रुपयाही भरण्याची आवश्यकता नाही. सर्व प्रक्रिया ऑनलाइन पोर्टल द्वारे केली जाते. केवळ वय वंदना कार्ड आणि आधार कार्ड दाखवल्यानंतर रुग्णालयाकडून उपचाराची प्रक्रिया सुरू केली जाते. डिस्चार्जच्या वेळी ही कागदपत्राचा फारसा त्रास होत नाही आणि तुम्हाला मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातात.
या आजारांचा समावेश
वय वंदना कार्डद्वारे हृदयाच्या शस्त्रक्रिया ( बायपास, अँजिओप्लास्टी) गुडघे व सांधे प्रत्यारोपण, किडनी, कर्करोग, मोतीबिंदू आणि मज्जा संस्थेची संबंधित असलेल्या गंभीर आजारावर या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात.
सरकारीसह खाजगी रुग्णालयातही घेता येतात उपचार
वय वंदना कार्ड अंतर्गत तुम्ही केवळ सरकारी रुग्णालयातच नाही तर या योजनेच्या यादीमध्ये असलेल्या खाजगी रुग्णालयामध्येही उपचार घेऊ शकता. राज्यातील अनेक नामांकित मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये वय वंदना कार्ड )ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना दर्जेदार उपचार सुविधा मिळत आहेत.
वय वंदना कार्डबाबत 5 महत्त्वाचे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1: वय वंदना कार्ड कोणाला मिळू शकते?
उत्तर: 70 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले देशातील सर्व ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही.
प्रश्न 2: वय वंदना कार्डद्वारे किती रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात?
उत्तर: पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 10 लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळते. काही कुटुंबांना अतिरिक्त संरक्षणाचा लाभ मिळू शकतो.
प्रश्न 3: वय वंदना कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: वयाचा पुरावा आणि आधार कार्ड आवश्यक आहे. ऑनलाइन ई-केवायसीसाठी आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर उपयोगी ठरतो.
प्रश्न 4: वय वंदना कार्ड ऑनलाइन कसे काढायचे?
उत्तर: मोबाईलमध्ये Ayushman App डाउनलोड करा. Beneficiary पर्याय निवडून मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करा. त्यानंतर आधार क्रमांक टाकून ई-केवायसी पूर्ण करा आणि पात्रता मंजूर झाल्यानंतर कार्ड डाउनलोड करा.
प्रश्न 5: वय वंदना कार्डद्वारे खासगी रुग्णालयात उपचार घेता येतात का?
उत्तर: होय. या योजनेशी संलग्न असलेल्या सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये पात्र ज्येष्ठ नागरिकांना कॅशलेस उपचार घेता येतात.
Read About : Ayushman Bharat Scheme: Over 13 Crore People Treated : 13 कोटींहून अधिक रुग्णांवर उपचार, 48 कोटींपेक्षा जास्त कार्डांचे वाटप
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
website : yojanamazi.com
अशाच विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर व अधिकृत माहिती मिळवण्यासाठी योजना माझी (yojanamazi.com) या वेबसाइटला भेट द्या. सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आमचे Facebook आणि Instagram पेज फॉलो करा.