Mukhyamantri Krushi v Anna Prakriya Udyog Yojana 2024 In Marathi : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना 2024 मराठी माहिती
Mukhyamantri Krushi v Anna Prakriya Udyog Yojana 2024 In Marathi : भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. मात्र शेतीत उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, मात्र अवेळी येणारा पाऊस आणि प्रक्रिया उद्योगाचा असलेला अभाव यामुळे पिकवलेले माल मोठ्या प्रमाणात थांबवण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये बचत गट, शेतकरी आदींचा समावेश आहे. यातून पिकाची होणारी नासाडी थांबवणे आणि अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे.
Mukhyamantri Krushi v Anna Prakriya Udyog Yojanaमुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी उत्पादित मालाची गुणवत्ता वाढवणे, निर्यातीला चालना देणे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रक्रिया उद्योग साठी करण्यात येणार आहे.
Mukhyamantri Krushi v Anna Prakriya Udyog Yojana मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेतमालनाचे मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे, उत्पादित अन्नपदार्थाच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, उर्जेची बचत व्हावी यासाठीच्या प्रकल्पांच्या आधुनिकीकरण प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही शंभर टक्के राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी 2024- 25 च्या अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद करण्यात आली ती म्हणजे या रकमेमध्ये 75 कोटी रकमेची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना खूप जास्त फायदा होणार आहे.
ठळक मुद्दे
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना
Mukhyamantri Krushi v Anna Prakriya Udyog Yojana 2024 In Marathi
योजनेची स्थिती
या योजनेअंतर्गत असणाऱ्या समाविष्ट बाबी
या योजनेअंतर्गत असलेले पात्र उद्योग
मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजनेचे पात्र लाभार्थी व संस्था
या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत
बँकेची संबंधित अनुदान
योजनेची स्थिती
या योजनेच्या माध्यमातून 2018 -19 ते 2023- 24 या दरम्यान एकूण 584 लाभार्थ्यास 201.47 कोटी चे अनुदान देण्यात आले आहे.
याबरोबरच आता 2024 आणि 25 मध्ये 207 प्रकल्पांना 75 कोटी रुपयाच्या अनुदानास मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत असणाऱ्या समाविष्ट बाबी
Mukhyamantri Krushi v Anna Prakriya Udyog Yojanaमुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत खालील बाबी समाविष्ट असतील
या योजनेअंतर्गत नवीन अन्नप्रक्रिया उद्योग स्थापन करणे
सुरू असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगांची वाढ
विस्तारीकरण व आधुनिकीकरण मूल्यवर्धन
शीतसाखळी आणि साठवणुकीच्या पायाभूत सुविधा
अन्नप्रक्रिया उद्योगाशी निगडित पिक काढणीची पूर्व प्रक्रिया
केंद्र व एकात्मिक शीतसाखळी स्थापन करणे
Mukhyamantri Krushi v Anna Prakriya Udyog Yojana या योजनेअंतर्गत असलेले पात्र उद्योग
तृणधान्य
कडधान्य
फळे
भाजीपाला
तेलबिया
मसाला
औषधी व सुगंधी वनस्पती इत्यादी
प्रक्रिया उद्योग गूळ उद्योग, वाईन उद्योग
दुग्ध व पशुखाद्य प्रकल्प यामध्ये भरड धान्यावरील कृषी व प्रक्रिया आणि मूल्यवर्धन
मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजनेचे पात्र लाभार्थी व संस्था
वैयक्तिक लाभार्थी – वैयक्तिक उद्योजक, सक्षम प्रगतीशील शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला, नवउद्योजक भागीदारी प्रकल्प, भागीदारी संस्था.
गट लाभार्थी शेतकरी उत्पादक गट/ संस्था/ कंपनी, स्वयं सहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था, शासकीय संस्था, खाजगी संस्था, शासनाच्या कुटुंब या संज्ञेनुसार (पती-पत्नी व त्यांच्या अपत्ते) एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल.
या योजनेचा लाभ हा अर्जदारास एकदाच घेता येईल. परंतु इतर योजनेतून लाभ घेतलेल्या प्रकल्पात प्रकल्पाचे स्तरवृद्धी विस्तारीकरण व आधुनिकीकरण यासाठी या योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय राहील.
या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत
कारखाना व मशीनरी व बांधकाम यासाठी अनुदान खर्चाचे प्रमाण अनुक्रमे 60:40 असे असेल.
कारखाना व मशिनरी आणि टेक्निकल सिविल वर्क याच्या एकूण खर्चाच्या 30 टक्के अनुदान म्हणजेच 50 लाख रुपये पर्यंत.
बँकेची संबंधित अनुदान
यातून दोन टप्प्यांमध्ये अनुदान दिले जाते
टप्पा पहिला प्रकल्प उभारणी पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.
टप्पा दुसरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने उत्पादनात आल्यानंतर दिला जातो.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीनिकरण मिशन
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना
एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रम
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
पीएम पोषण शक्ती निर्माण अभियान
राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना
स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना