PM PRANAM YOJANA 2024 In Marathi : रासायनिक खताचा वापर होणार कमी

PM PRANAM YOJANA 2024 Information In marathi : पंतप्रधान प्रमाण योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

PM PRANAM YOJANA 2024 नमस्कार वाचकहो, आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पंतप्रधान प्रणाम योजना 2024 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. PM PRANAM YOJANA या योजना अंतर्गत रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय खते, कंपोस्ट खत, बायोफर्टीलायझर यासारख्या अनेक नैसर्गिक खतांचा वापर करून मातीची सुपीकता टिकवून ठेवणे, जमिनीची धूप कमी करणे आणि शेतीचे उत्पादकता वाढवणे हे पंतप्रधान प्रणाम योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. 2023 च्या अर्थसंकल्पात पीएम प्रणाम योजनेची PM PRANAM YOJANA घोषणा करण्यात आली. पंतप्रधान प्रणाम योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे.

PM PRANAM YOJANA 2024

PM PRANAM YOJANA 2024 सरकार सतत नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असते. ज्या योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवरील अनुदानाचा भार कमी होईल. त्याचबरोबर शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी होईल. पंतप्रधान प्रणाम योजनेअंतर्गत रासायनिक खतांना पर्यायी खते निर्माण करणे या उद्दिष्टाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

PM PRANAM YOJANA सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की प्रणाम म्हणजे काय या मध्ये PRANAM याचा अर्थ प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर एग्रीकल्चर मॅनेजमेंट हे आहे. पीएम प्रणाम योजनेअंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, शेतीचे उत्पादकता वाढवणे, पिकांची पोषकता वाढवणे, त्याचबरोबर नैसर्गिक खतांचा वापर करणे आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे यावर मुख्य भर देण्यात येणार आहे. पंतप्रधान प्रणाम योजनेअंतर्गत रसायनिक खतांचा वापर कमी करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन करणे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. रासायनिक खतांना पर्यायी खते म्हणून सेंद्रिय खते, कंपोस्ट खत, शेणखत, बायोफर्टीलायझर यांचा वापर करणे. नैसर्गिक खतांचा वापर करून जमिनीचे धूप थांबवणे. मातीचे आरोग्य सुधारणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे./

PM PRANAM YOJANA आज आपण या लेखाच्या माध्यमातून पंतप्रधान प्रणाम योजनेचे सविस्तर माहिती पाहणार आहोत. या योजनेची काय आहेत वैशिष्ट्ये?, योजनेचा काय आहे मुख्य उद्देश?, पंतप्रधान योजनेचे काय आहेत फायदे?, पंतप्रधान प्रणाम योजनेसाठी कसा करावा लागेल अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

ठळक मुद्दे

पंतप्रधान प्रमाण योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

PM PRANAM YOJANA 2024 Information In marathi

पंतप्रधान प्रमाण योजनेची थोडक्यात माहिती

PM PRANAM YOJANA In Short

पंतप्रधान प्रमाणे योजनेची वैशिष्ट्ये

PM PRANAM YOJANA Features

पंतप्रधान प्रणाम योजनेची उद्दिष्टे

PM PRANAM YOJANA Purpose

पंतप्रधान प्रणाम योजनेचे फायदे

PM PRANAM YOJANA Benefits

पीएम प्रणाम योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे

PM PRANAM YOJANA Documents

पीएम प्रणाम योजनेसाठी योजनेची अर्ज प्रक्रिया

PM PRANAM YOJANA Apply

पंतप्रधान प्रमाण योजनेची थोडक्यात माहिती

PM PRANAM YOJANA In Short

योजनेचे नावपंतप्रधान प्रणाम योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
योजनेचा उद्देशरासायनिक खतांचा वापर कमी करणे
पात्रताराज्यातील शेतकरी
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
PM PRANAM YOJANA 2024

पंतप्रधान प्रमाणे योजनेची वैशिष्ट्ये

PM PRANAM YOJANA Features

पंतप्रधान प्रमाण योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमी करणे हा आहे.

पंतप्रधान प्रणाम योजनेसाठी कोणतेही वेगळ्या अनुदान दिले जाणार नाही.

रासायनिक खतांसाठी दिला जाणारा निधी पंतप्रधान प्रणाम योजनेसाठी वापरण्यात येईल.  

प्रत्येक राज्याला अनुदानावर बचत केलेल्या पैशाच्या 50% अनुदान या योजनेअंतर्गत मिळेल.

मिळालेल्या निधीपैकी 70 टक्के निधी पर्याय खते आणि पर्याय खत उत्पादन सुविधा विकसित करण्यात साठी वापरता येईल.

उरलेल्या 30 टक्के निधीचा वापर हा शेतकरी पंचायत शेतकरी उत्पादक संस्था आणि बचत गट गटांना मदत करण्यासाठी केला जाईल.

पंतप्रधान प्रणाम योजनेची उद्दिष्टे

PM PRANAM YOJANA Purpose

रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांच्या मिश्रणात खतांचा संतुलन वापर करून शेतीची उत्पादकता वाढविणे हे पंतप्रधान प्रणामयोजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

PM PRANAM YOJANA 2024 या योजना अंतर्गत प्रथम एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याची सुविधा करून दिली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत दहा हजार जैव संसाधन केंद्र स्थापन केली जाणार आहेत.  

जैव संसाधन केंद्रामुळे राष्ट्रीय स्तरावर सूक्ष्म खते आणि कीटकनाशक उत्पादनाचे आणि वितरणाचे जाळे वाढवण्यास मदत होईल.  

रासायनिक खताचा वापर कमी केल्यामुळे जमिनीचा दर्जा सुधारेल यामुळे जमिनीची धूप थांबेल.  

या योजनेमुळे जमिनीची पोषकता टिकून राहील.

या योजनेमुळे शेती उत्पादनात वाढ होईल.

पंतप्रधान प्रणाम योजनेचे फायदे

PM PRANAM YOJANA Benefits

PM PRANAM YOJANA 2024 या योजनेमुळे रासायनिक खतांचा वापर कमी करण्यात येईल आणि त्यामुळे जमिनीचा दर्जा सुधारेल.

जास्तीत जास्त पोषक तत्वे असणारे पीक घेता येईल.

स्वच्छ ऊर्जा निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

सेंद्रिय खत नैसर्गिक खतांबरोबर पर्यायी पोषक खतांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल.

पीएम प्रणाम योजनेची पात्रता

PM PRANAM YOJANA Eligibility

या योजनेसाठी राज्यातील सर्व शेतकरी पात्र आहेत.

रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर करणारे सर्व इच्छुक शेतकरी पात्र असतील.

पीएम प्रणाम योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे

PM PRANAM YOJANA Documents

आधार कार्ड

रहिवाशी प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

पीएम प्रणाम योजनेसाठी योजनेची अर्ज प्रक्रिया

PM PRANAM YOJANA Apply

पंतप्रधान प्रणाम योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील सी एस सी सेंटरला भेट द्यावी लागेल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना

प्रशिक्षण योजना 2024 

आयुष्यमान भारत विमा योजना

पीएम पोषण शक्ती निर्माण अभियान

संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना

पीएम श्रमयोगी मानधन योजना

डिजिटल कृषी मिशन 

राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना

सौर कुंपण योजना