Shree Gajanan Maharaj Vijay Granth Aadhyay 6 : गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 6

Shree Gajanan Maharaj Vijay Granth Aadhyay 6 : गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 6

Shree Gajanan Maharaj Vijay Granth Aadhyay आज आपण गजानन महाराज विजय ग्रंथातील अध्याय 6 पाहणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या अध्यायाचे काय महत्त्व आहे हे ही आपण पाहणार आहोत.


Shree Gajanan Maharaj Vijay Granth Aadhyay गजानन महाराजांचा वार हा गुरुवार आहे. त्यामुळे भक्तगण गुरुवारी याचे पारायण करतात. ज्याला जसे जमेल तसे पारायण अनेक भक्त करतात. पारायणाचे अनेक प्रकार आहेत आणि गजानन महाराजांच्या प्रत्येक अध्यायात त्यांच्या लीला सांगितल्या आहेत. हे पारायण प्राकृत भाषेत आहे.

Gajanan Vijay Granth In Marathi गजानन महाराजांच्या सहाव्या अध्यायाचे पठण केल्याने चांगला व विश्वासू मित्र मिळतो. चांगल्या वाईट मधील फरक कळतो.

गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 1

गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 2

गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 3

गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 4

गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 5

Shree Gajanan Maharaj Vijay Granth Aadhyay

अध्याय 6

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे परममंगला श्रीहरी । तुझी कृपा झालियावरी । अशुभ अवघें जातें दुरी । हा अनुभव संतांचा ॥१॥ त्या संतवाक्यीं भरंवसा । मी ठेवून श्रीनिवासा । मंगलाची धरुन आशा । तुझ्या दारीं पातलों ॥२॥
आतां विन्मुख लावल्यास । त्याचा तुला लागेल दोष । आणि बट्टा वाक्यास । लागेल कीं संतांच्या ॥३॥ म्हणोन हे माधवा ! । अभिमान माझा धरावा । रोष कधीं ना करावा । या अजाण लेंकरावर ॥४॥ बालकांचें हीनपण
। मातेलागीं दूषण । हें मनांत आणून करणें असेल तें करी ॥५॥ असो बंकटलाला घरीं । राहिली समर्थांची स्वारी । तयीं अपूर्व एक घडली खरी । गोष्ट श्रोते ती ऐका ॥६॥ गांवाचिया दक्षिणेस । बंकटलालाच्या मळ्यास ।
महाराज गेले एक दिवस । कणसें मक्याचीं खावया ॥७॥ बहुत मंडळी बरोबरी । कणसें खाया आली खरी । विहिरीपासीं तयारी । केली कणसें भाजण्याची ॥८॥ विहीर होती धनत्तर । पाणी जिला अपरंपार । गर्द छायेचे वृक्ष
थोर । जवळ होते चिंचेचे ॥९॥ आगटया पेटल्या एकसरां । आजमासें हो दहा बारा । तेणें डोंब झाला खरा । गगनोदरीं धूमाचा ॥१०॥ त्यायोगें ऐसे झाले । आग्या मोहोळ लागलेलें । चिंचवृक्षावरी भलें । त्याच्या माशा
उठल्या कीं ॥११॥ त्या माशा उठतां क्षणीं । मंडळी गेली पळोनी । कणसें ठिकाणच्या ठिकाणीं । मक्याचीं तीं राहिलीं हो ॥१२॥ त्या आग्या मोहोळांच्या मक्षिका । पसरल्या अवघ्या मळ्यांत देखा । घोंगडयाचा करुन बुरखा
। कोणी गेले पळून ॥१३॥ प्राणापरी आवडती । वस्तु नसे हो कोणती । अशा वेळीं समर्थमूर्ति । आसनीं होती निर्धास्त ॥१४॥ ते नाहीं पळून गेले । आसनीं आपल्या स्वस्थ बसले । विचार करुं लागले । निजचित्तीं माश्यांचा ॥१५॥ माशी तरी मीच झालों । मोहोळ तेंही मीच बनलों । कणसें खाया मीच आलों । कणसें तेंही रुपें माझीं ॥१६॥ ऐशा विचारें आनंदांत । महाराज राहिले डोलत । अंगावरी असंख्यात । माशा येऊन बैसल्या ॥१७॥ वाटे पासोडी माश्यांची । समर्थ पांघरले साची । योग्यता ब्रह्मनिष्ठाची । काय वर्णन करावी ? ॥१८॥ माशा चावती वरच्यावरी । परी न तो पर्वा करी । त्यांचे कांटे शरीरीं । बोचले असती असंख्यात ॥१९॥ यासी झाला एक प्रहर । भक्त झाले चिंतातुर । बंकटलालाचें अंतर । दुःखें व्याकुळ झालें हो ॥२०॥ कोठून बुद्धि झाली मला । येथ आणिलें समर्थाला । कणसें मक्याचीं खावयाला । मंडळीच्या समवेत ॥२१॥ अशा समर्थालागून । दुःख द्याया मीच कारण । झालों हें कां शिष्यपण । माझे हाय रे दुर्दैवा ! ॥२२॥ बंकटलालानें तयारी । पुढें येण्याची केली खरी । हें जाणोन अंतरीं । कौतुक केलें समर्थानें ॥२३॥ जीवांनो ! जा निघोन । बसा मोहोळीं जाऊन । माझ्या बंकटाकारण । तुम्हीं न कोणीं चावावें ॥२४॥ जमलेल्या मंडळींत । बंकट हाच निःसीम भक्त । जो माझ्याप्रीत्यर्थ । येत आहे धांवोनिया ॥२५॥ ऐसें म्हणतां माशा गेल्या । मोहोळावरी जाऊन बैसल्या । बंकटलालानें पाहिल्या । त्या आपल्या निजदृष्टीं ॥२६॥ महाराज त्या पाहोनी । बोलते झाले हांसोनी । वा खूप केलीस मेजवानी । आम्हांसी तूं माश्यांची ॥२७॥ अरे ते जीव विषारी । बैसले माझ्या अंगावरी । माझ्यापासून झाले दुरी । लड्डूभक्त येधवां ॥२८॥ याचा करी विचार । संकट आल्या कोणावर । कोणी न साह्य करणार । एका ईश्वरावांचुनी ॥२९॥ जिलबी पेढे बरफी खाती । माशा आल्या पळून जाती । ऐशी जयांची आहे कृति । ते स्वार्थी भक्त निःसंशय ॥३०॥ बंकटलाल मधुरोत्तर । करितां झाला त्यावर । महाराज आणवूं कां सोनार । कांटे माश्यांचे काढवया ! ॥३१॥ महापापी मी गुरुराया । तुम्हांलागीं त्रास द्याया । आणवितां झालों या ठायां । माशा किती डसल्या तरी ! ॥३२॥ गांधी अगणित अंगावर । उठल्या तुमच्या साचार । याचा व्हावया परिहार । उपाय सांगा कोणता ? ॥३३॥ बंकटलालाचें ऐकिलें । वचन महाराज बोलते झाले । अरे यांत ना कांहीं अधिक घडलें । डसणें स्वभाव माश्यांचा ॥३४॥ मला त्याची मुळींच बाधा । होणार नाहीं जाण कदा । त्या माशीरुप सच्चिदानंदा । म्यां जाणलें म्हणोन ॥३५॥ माशी तरी तोच झाला । तोच आहे माझा पुतळा । पाण्यानेंच पाण्याला । काय दुखवितां येईल ? ॥३६
हें ऐकतां ब्रह्मज्ञान । बंकटलाल धरी मौन । कांटे काढण्यालागून । बाहिलें त्यानें सोनारा ॥३७॥ सोनार चिमटे घेऊन आले । देहास शोधूं लागले । कोठें आहेत कांटे रुतले । मक्षिकेचे पहावया ॥३८॥ महारज वदले तयांना । काय ह्या वंध्यामैथुना । करितसा तुमच्या नयनां । कांटे ते ना दिसतील ॥३९॥ त काढण्या चिमटयाची । गती नाहीं मुळींच साची । साक्ष ती ह्या गोष्टीची । मीच दावितों तुम्हांला ॥४०॥ ऐसें म्हणून कौतुक केलें । वायूलागीं रोधून धरिलें । तों कांटे अवघे वरी आले । रुतलेल्या स्थलांतून ॥४१॥ तो पाहतां प्रकार । लोक आनंदले फार । कळून आला अधिकार । श्रीगजाननस्वामीचा ॥४२॥ पुढें कणसें भाजलीं । अवघ्यांनीं तीं ग्रहण केलीं । अस्तमानीं निघून आली । मंडळी निजगृहातें ॥४३॥ असो पुढें एक वेळा । महाराज गेले अकोटाला । आपुल्या बंधूस भेटण्याला । श्रीनरसिंगजीकारणें ॥४४॥ हा कोतश्या अल्लीचा । शिष्य मराठा जातीचा । कंठमणी विठ्ठलाचा । भक्‍तिबलानें झाला असे ॥४५॥ त्या नरसिंगजीचें चरित्र । मीं भक्‍तलीलामृतांत । वर्णिलें आहे इत्यंभूत । आतां तें सांगणें नको ॥४६॥ हें आकोट नामें नगर । शेगांवाहून साचार । आहे अठरा कोसांवर । ईशान्येला परियेसी ॥४७॥ मनोवेगाचा सजवून वारु । निघते झाले सद्‌गुरु । जे पदनताचे कल्पतरु । श्रीगजानन महाराज ॥४८॥ अकोटाच्या सान्निध्यासी । एका निबिडतरशा अरण्यासी । नससिंग राहे अहर्निशीं । एकान्तवास सेवावया ॥४९॥ हें निर्जन अवघें अरण्य । महा भयकंर दारुण । निंब अश्‍वत्थ रातांजन । वृक्ष जेथें उदेले ॥५०॥ लता त्या नाना जाती । वृक्षा वेढून बैसल्या असती । ण वाढलें भूमीवरती । सर्प वारुळीं असंख्यात ॥५१॥ ऐशा त्या अरण्यांत । नरसिंगजी जाऊन बसत । म्हणून आले अवचित । समर्थ त्यासी भेटावया ॥५२॥ सारखा भेटे सारख्यासी । पाणीच मिळें पाण्याशीं । विजातीय द्रव्यासी । समरसता होणें नसे ॥५३॥ गजाननासी पाहिलें । तेणें चित्त आनंदलें । मी नरसिंगजीचें भलें । तो प्रेमा न वर्णवे कीं ॥५४॥ एक हरी एक हर । चालते बोलते परमेश्‍वर । एक राम एक कुमर । वसुदेवदेवकीचा ॥५५॥ एक मुनि वसिष्ठ । एक पाराशर ऋषि श्रेष्ठ । एक जान्हवीचा कांठ । एक तट गोदेचा ॥५६॥ एक हिरा कोहिनूर । एक कौस्तुभ साचार । एक वैनतेय एक कुमर । सती वानरी अंजनीचा ॥५७॥ दोघे भेटले एकमेकां । दोघा आनंद सारखा । बैसते झाले आसनीं एका । हितगुज तें करावया ॥५८॥ अनुभव ते आपापले । एकमेकां कथिते झाले । नरसिंगा, तूं उत्तम केलें । प्रपंचांत राहिलास ॥५९॥ मीं त्याग केला तयाचा । स्वीकार करुन योगाचा । सच्चिदानंद तत्त्वाचा । करिता झालों विचार ॥६०॥ या योगाच्या क्रियेंत । गोष्टी होती अघटीत । ज्यांचा मुळीं न लागे अंत । या सामान्य लोकांला ॥६१॥ त्या गोष्टी लपवावया । पिसा बनलों जगा ठायां । उपाधी ते नासावया । वेड बळेंच पांघरलों ॥६२॥ तत्त्व जाणण्याकारण । मार्ग कथिले आहेत तीन । कर्म, भक्ति, योग म्हणून । शास्त्रकारांनीं शास्त्रांत ॥६३॥ फल या तिन्ही मार्गांचें । एकचि आहे अखेरीचें । परी बाह्य स्वरुप त्यांचें । भिन्न भिन्न असें कीं ॥६४॥ योगी योगक्रियेचा । जरी अभिमान वाही साचा । तरी तयासी तत्त्वाचा । खर बोध ना होईल ॥६५॥ योगक्रियावरुन । अलिप्त रहावें तयापासून । कमलपत्रासमान । तरीच तत्त्व कळून ये ॥६६॥ याचपरी प्रपंचाची । स्थिति नरसिंगा आहे साची । आसक्ति कन्यापुत्रांची । मुळींच राहतां कामा नये ॥६७॥ गार पाण्यांत राहते । परी न पाणी शिरुं देते । सेंच वागती साचें । या प्रपंचामाझारीं ॥६८॥ यापरी त्वां रहावें । अपेक्षारहित असावें । चित्तांतून ना ढळूं द्यावें । सच्चिदानंद ईशाला ॥६९॥ म्हणजे कांहींच अशक्य नाहीं । तूं, मी आणि शेषशायी । एकरुप आहों पाही । जन जनार्दन भिन्न नसे ॥७०॥ नरसिंग म्हणती बंधुराया ! । आलास मसी भेटावया । ही तुझी केवढी दया । उपमा याला देण्या नसे ॥७१॥ प्रपंच मुळीं अशाश्वत । त्याची काय किंमत । दुपारच्या सावलीप्रत । कोण सांग खरे मानी ? ॥७२॥ तूं कथिलें जयापरी । तैसा वागेन भूवरीं । मी जाण वरच्यावरी । अशीच भेटी द्यावी तुवां ॥७३॥ देह-प्रारब्ध जयाचें । असेल ज्या जातीचें । तेंच आहे व्हावयाचें । लोकाचारी निःसंशय ॥७४॥ तुम्हां आम्हांकारणें । जें का धाडिलें ईशानें । तेंच आहे आपणां करणें । निरालसपणें भूमीवरी ॥७५॥ आतां विनंति इतुकीच खरी । व्यावहारिक भेट वरच्यावरी । देत जावी साजिरी । मी धाकटा बंधु तुझा ॥७६॥ नंदीग्रामा राहिला भरत । रघुपतीची वाट पहात । तैसाच मी या आकोटांत । राहून पाहतों वाट तुझी ॥७७॥ तुला येथें यावया । अशक्य कांहीं नाहीं सदया । अवघ्या आहेत योगक्रिया । अवगत तुला पहिल्यापून ॥७८॥ पद न लावितां पाण्याप्रत । योगी भरधांव वरुनी पळत । क्षणामाजीं फिरुन येत । शोधून अवघ्या त्रिभुवना ॥७९॥ ऐसें हितगुज उभयतांचें । रात्रभरी झालें साचें । भरतें आलें प्रेमाचें । दोघांचिया संगमीं ॥८०॥ खरे खरे जे का संत । तेथें हेंच घडून येत । दांभिकांचीं होतात । भांडणें पाहून एकमेकां ॥८१॥ दांभिक म्हणूं नये गुरु । ते अवघे पोटभरु । पुरामाजीं फुटकें तारुं । तारण्यासी समर्थ नसे ! ॥८२॥ दांभिकांचा बोलबाला । जरी होतो जगीं भला । तरी त्यागणें आहे त्याला । निवडूनिया श्रोते हो ! ॥८३॥ संतत्व नाहीं मठांत । संतत्व नाहीं विद्वत्तेंत। संतत्व नाहीं कवित्वांत । तेथें स्वानुभव पाहिजे ॥८४॥ दांभिक मुलाम्याचें सोनें । त्याला सांगा काय घेणें । गृहिणी म्हणून ठेवणें । काय कसबीण सदनांत ? ॥८५॥ ही संतजोडी साक्षात्कारी । दांभिकतेची साच वैरी । नांदे ज्याच्या सदैव घरीं । सन्नीति सदाचार ॥८६॥ नरसिंगजीस भेटण्या जाण । काननीं आले गजानन । ऐसें कळलें वर्तमान । गुराखीद्वारें आकोटाला ॥८७॥ तें कळतां आनंदले । लोक धावूं लागले । नारळ घेऊन निघाले । पाहाया द्वय संतांसी ॥८८॥ एकमेकां ऐसें म्हणती । चला चला रे सत्वर गती । गोदा आणि भागीरथी । संगम पावली काननांत ॥८९॥ त्या भेटरुप प्रयागासी । जाऊं आपण स्नानासी । महोदयपर्वणीसी । साधून घेऊं चला हो ॥९०॥ तों इकडे काय झालें । गजानन आधींच निघून गेले । नरसिंगासी पुसून भले । भेट ना झाली पौरांसी ॥९१॥ पुढें एकदां गजानन । करीत असतां भ्रमण । दर्यापुराच्या सन्निध जाण । येते जाहाले शिष्यांसह ॥९२॥ दर्यापुराच्या शेजारीं । शिवर गांव निर्धारी । असे चंद्रभागेच्या तीरीं । व्रजभूषणा वास जेथें ॥९३॥ श्रोते ही चंद्रभागा । पंढरीची नाहीं बघा । ही लहानशी एक गंगा । पयोष्णीला मिळणारी ॥९४॥ या शिवर गांवांत । व्रजभूषण नामें पंडित । चार भाषा अवगत । होत्या श्रोते जयाला ॥९५॥ कीर्ति ज्याच्या विद्वत्तेची । वर्‍हाडीं पसरली साची । याला भक्ति भास्कराची । आत्यंतिक असे हो ॥९६॥ प्रत्यहीं चंद्रभागेवर । स्नान करी साचार । उदयास येतां दिनकर । अर्घ्य त्यासी देतसे ॥९७॥ पंच पंच उषःकाला । व्रजभूषण उठे भला । सारुन प्रातर्विधीला । अरुणोदयीं स्नान करी ॥९८॥ तेंही शीतोदकांनीं । ऐसा कर्मठ परी ज्ञानी । मानमान्यता विद्वज्जनीं । ज्याची होती विशेष ॥९९॥ त्या शिवरगांवाला । योगीराज फिरत आला । वाटे तपाचें द्यावयाला । फल त्या व्रजभूषणासी ॥१००॥ चंद्रभागेच्या वाळवंटीं । हा बैसला ज्ञानजेठी । समोर नदीचिया कांठीं । आले व्रजभूषण स्नानाला ॥१॥ ती प्रभातीची वेळा पाही । प्रकाशिल्या दिशा दाही । क्कुटाचा आवाज येई । वरचेवरी ऐकावया ॥२॥ चातक भारद्वाज पांखरें । जाऊं लागलीं अत्यादरें । भास्करासी सामोरे । पूर्व दिशा लक्षून ॥३॥ भास्कराचा उदय होतां । तम निमाला हां हां म्हणतां । जैसा सभेस पंडित येतां । मूर्ख जाती उठोनी ॥४॥ ऐशा त्या सुप्रभातीं । वाळवंटीं गुरुमूर्ति । बैसली होती निश्चिती । ब्रह्मानंदीं डोलत ॥५॥ सवें शिष्य अपार । बसले होते मंडलाकार । ते शिष्य नव्हते किरणें थोर । त्या गजाननभास्कराचीं ॥६॥ तईं व्रजभूषण तत्त्वतां । झाला सूर्यासी अर्घ्य देतां । तो हा पुढें ज्ञानसविता । त्यानें पाहिला प्रत्यक्ष ॥७॥ सूर्याप्रमाणें सतेज कांति । अजानुबाहू निश्चिती । दृष्टि नासाग्राच्या वरती । स्थिर जयाची झाली असे ॥८॥ ऐसा पुरुष पाहतां क्षणीं । व्रजभूषण हर्षला मनीं । संध्यासामान घेऊनी । आला धांवून जवळ त्यांच्या ॥९॥ अर्घ्य दिलें पायांवरी । गजाननाच्या सत्वरीं । प्रदक्षणाही अखेरी । त्यानें घातली तयाला ॥११०॥ मित्राय नमः सूर्याय नमः । भानवे नमः खगाय नमः । ऐसीं नांवें घेऊन पाहा । घातले द्वादश नमस्कार ॥११॥ शेवटीं आरती ओवाळिली । गजाननासी आदरें भली । न्यूनता ती नाहीं पडली । कशाचीही त्या ठायां ॥१२॥ प्रार्थनापूर्वक नमस्कार । साष्टांग केला अखेर । मुखानें तें स्तवन थोर । महाराजाचें चाललें ॥१३॥ माझ्या तपाचरणाचें । फळ आजि मिळालें साचें । दर्शन दिव्य पायाचें । आज झालों धन्य मी ॥१४॥ नभोदरींच्या भास्कराला । देत होतों अर्घ्य भला । तों आज प्रत्यक्ष पाहिला । ज्ञाननिधि योगेश्वर ॥१५॥ (श्लोक) हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी । ऐसें युगायुगीं किती अवतार घेसी ? । झाल्यास दर्शने तुझें भवरोगचिंता । नासे गजाननगुरो, मज पाव आतां ॥१॥ ऐसी प्रार्थना करुन । संपविलें त्यानें स्तवन । योगेश्वरें या आलिंगन । दृढ दिधलें त्या दोन्ही करें ॥१६॥ माय जैसी लेंकराला । प्रेमें धरी पोटाला । तेवीं व्रजभूषणाला । धरिते झाले महाराज ॥१७॥
मस्तकावरी ठेविला कर । आशीर्वाद दिधला थोर । सर्वदा तुझा जयजयकार । होईल बाळा व्रजभूषणा ! ॥१८॥ कर्ममार्ग सोडूं नको । विधी निरर्थक मानूं नको । मात्र त्यांत होऊं नको । लिप्त बाळा केव्हांही ॥१९॥ आचरुन कर्मफल । टाकितां भेटतो घननीळ । त्याच्या अंगीं न लागे मळ । या कर्माचा केव्हांही ॥१२०॥ तूं आतां आपुल्या सदनीं । माझे बोल ठेवी मनीं । प्रत्यहीं माझें तुला ध्यानीं । होत जाईल दर्शन ॥२१॥ ऐसें म्हणून प्रसाद दिला । श्रीफलाचा श्रोते भला । त्या व्रजभूषण पंडिताला । महाराज आले शेगांवीं ॥२२॥ ह्या शेगांवाचें होतें नांव । पूर्वकालीं शिवगांव । अपभ्रंशें लाधला ठाव । शेगांव या शब्दाला ॥२३॥ तेंच हल्लीं प्रचलीत । आहे बुधहो वर्‍हाडांत । सतरा पाटील होते सत्य । ह्या एकाच ग्रामाला ॥२४॥ महाराज शेगांवासी आले । परी न स्थिर राहिले । हमेशा ते भटकत फिरले । मनास येईल त्या स्थला ॥२५॥ आकोट अकोलें मलकापूर । नांवें सांगावीं कुठवर ? । चांदण्यांची न होणार । मोजदाद कोणाही ॥२६॥ ज्येष्ठ आषाढ महिना गेला । पुढें श्रावण मास आला । उत्सव होता सुरुं झाला । मारुतीच्या राऊळांत ॥२७॥ हें मारुतीचें मंदिर । शेगांवीं भव्य साचार । पाटील मंडळी थोर थोर । होती या भक्त देवाची ॥२८॥ पेंडीलागीं जैसा आळा । तेवीं पाटील गांवाला । जें जें कांहीं आवडे त्याला । तिकडे लोकांचा कल होई ॥२९॥ चाले उत्सव महिनाभर । अभिषेक पोथी कीर्तन गजर । अन्नदानाशीं येई पूर । अवघे लोक तृप्त होती ॥१३०॥ उत्सवाचा पुढारी । खंडू पाटील निर्धारी । जो गांवचा कारभारी । होता उदार मनाचा ॥३१॥ श्रोते हें पाटीलपण । आहे वाघाचें पांघरुण । तें जो घेई त्याला जन । भिऊं लागती सहजची ॥३२॥ गांव करी तें राव न करी । ऐशी मराठी भितरीं । म्हण एक आहे साजरी । ती यथातथ्य असे ॥३३॥ त्या मारुई मंदिरासी । आले गजानन पुण्यराशी । श्रावणाच्या आरंभासी । उत्सव श्रीचा पाहावया ॥३४॥ बोलले बंकटलालासी । मी आतां या मंदिरासी । राहीन जाणा अहर्निशीं । त्याचा शोक करुं नको ॥३५॥ गोसावी संन्यासी फकीर । यांना कायमचें राहण्या घर । योग्य नाहीं साचार । तुम्हां प्रापंचिकाचें ॥३६॥ मी परमहंस संन्यासी । आतां राहातों मंदिरासी । तूं बोलाविशी ज्या दिवशीं । तेवढयापुरता येईन तेथ ॥३७॥ हें अंतरींचें गुह्य तुला । कथन केलें बंकटलाला । स्वामी शंकराचार्याला । भ्रमण करणें भाग आलें ॥३८॥गोसावी मच्छिंद्र जालंदर । हेही राहिले निरंतर । प्रापंचिकाचें वगळून घर । काननामाजीं वृक्षातळीं ॥३९॥ छत्रपती राजा शिवाजी । जो रणबहादूर वीरगाजी । ज्यानें हिंदूची रक्षिली बाजी । दंडून दुष्ट यवनांना ॥१४०॥ त्या शिवाजीचें प्रेम फार । होतें रामदासावर । परी सज्जनगडावर । स्वामी होते वस्तीला ॥४१॥ याचा विचार करावा । हट्ट मुळीं ना धरावा । माझ्या म्हणण्यास मान द्यावा । यांत कल्याण तुझें असे ॥४२॥निरुपाय होऊन अखेर । देता झाला रुकार । तो बंकटलाल सावकार । गजाननाचें म्हणण्याला ॥४३॥ मंदिरीं स्वामी समर्थ येतां । हर्ष झाला समस्तां । भास्कर पाटील शुश्रूषेकरितां । जवळ राही निरंतर ॥४४॥ हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ । मुमुक्षूला दावो पथ । संतचरणसेवेचा ॥१४५॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥

!! गण गण गणात बोते !!