Kiran Gaikwad : देवमाणूस फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली

Kiran Gaikwad ही होणार किरणची “होम मिनिस्टर”

Kiran Gaikwad किरण गायकवाड मराठमोळा अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या लाईफ पार्टनर च नाव सांगितलं आहे. किरण गायकवाड ने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. किरण गायकवाड ची होणारी लाईफ पार्टनर कोण आहे हे सांगितले आहे. किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर या दोघांनी प्रेमाची कबुली दिली. सोशल मीडियावर किरण ने दोघांचे फोटो पोस्ट केले आहेत.

Kiran Gaikwad किरण गायकवाड हा Devmanus देवमाणूस या मालिकेत खलनायक म्हणून काम करत होता. त्यानंतर मालिकेतील मुख्य कलाकार असलेल्या अस्मिताने देखील पोस्ट शेअर केली होती. किरण आणि अस्मिता च्या नात्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र आता किरण ने त्याच्या आयुष्यातील त्याच्या खास व्यक्ती बद्दल त्याच्या होणाऱ्या लाईफ पार्टनर बद्दल प्रेम सांगितले आहे. Devmanus

Kiran Gaikwad

Kiran Gaikwad Photo किरण गायकवाड ने वैष्णवी कल्याणकर सोबत फोटो पोस्ट करून त्यावर ही माझी होणारी होम मिनिस्टर असं कॅप्शन दिलं आहे. किरण आणि वैष्णवी ने खास फोटोशूट केले त्यात किरण आणि वैष्णवी पारंपारिक लुक मध्ये दिसून येत आहेत. वैष्णवी ने महाराष्ट्रीयन लुक साडी नेसली आहे तर किरणने कुर्ता पायजमा घालून फोटो काढले आहेत. या फोटोत दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.

Kiran Gaikwad Photo पोस्ट करत कॅप्शन लिहिलं आहे की “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठका होत राहतील, मंत्री पद वाटत राहतील, त्यांच ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो…” ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर”! असं कॅप्शन देत किरणने त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Kiran Gaikwad Photo वैष्णवी कल्याणकर ही देखील अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. “तू चाल पुढं” या मालिकेत वैष्णवी ने काम केले आहे. Devmanus देवमाणूस मालिकेत देखील वैष्णवी ने काम केले आहे. सध्या सन मराठी वरील तिकळी या मालिकेत वैष्णवी काम करते.