PM Vidya Laxmi Yojana Information In Marathi : विद्यार्थ्यांसाठी सरकारची महत्वपूर्ण योजना
PM Vidya Laxmi Yojana 2025 : सरकार विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. प्रत्येक मुलाला उच्च शिक्षण मिळावे हा सरकारचा उद्देश असतो.
PM Vidya Laxmi Yojana विद्यार्थ्याला उच्च शिक्षण मिळावे, विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहावा, प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळावी असे सरकारला वाटते. अनेकांना उच्च शिक्षण घ्यायचे असते परंतु प्रत्येकाच्या घरच्या काही अडचणींमुळे प्रत्येक विद्यार्थ्यालाही शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विद्यालक्षमी योजना सुरू केली आहे.
PM Vidya Laxmi Yojana Eligibility या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एज्युकेशन लोन मिळते प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेत विद्यार्थ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेत तुम्हाला कमी व्याजदर व्याजदरात शिक्षणासाठी कर्ज मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होते.
PM Vidya Laxmi Yojana Eligibility आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेणे प्रत्येक कुटुंबाला जमत नाही त्यामुळे सरकारने ही योजना राबवली आहे. या योजनेतून पात्र विद्यार्थ्याला 10 लाखांपर्यंत कर्ज मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
10 लाख रुपयांचे कर्ज बिना गॅरंटी मिळते. 7.5 लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर 75 टक्के सरकारी ची क्रेडिट गॅरंटी मिळते. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4.5 लाखांपेक्षा कमी असेल तर व्याजदर द्यावे लागत नाही.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 4.5 लाख ते 8 लाखांच्या दरम्यान आहे त्यांना 3 टक्के व्याजदरला सवलत मिळते. या योजनेत कर्जाचा परतफेडीचा कालावधी 15 वर्षे असतो.
आवश्यक कागदपत्रे
PM Vidya Laxmi Yojana Documents
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
दहावी आणि बारावीचे मार्कशीट
प्रवेश पत्र
वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
अर्जाचा फॉर्म
कसा कराल अर्ज
PM Vidya Laxmi Yojana Apply Online
पीएम विद्यालक्ष्मी योजनेचा अर्ज करण्यासाठी या योजनेच्या https://pmvidyalaxmi.co.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या
त्यानंतर स्टुडन्ट लॉगिन वर जाऊन नवीन अकाउंट तयार करा
त्यानंतर अप्लाय फॉर्म एज्युकेशन लोन यावर क्लिक करा
त्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करा
त्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करून अर्ज सबमिट करा