government schemes for women In Marathi : या राज्यामध्ये महिलांसाठी चालू आहेत या सरकारी योजना

government schemes for women : जाणून घ्या कुठे किती रुपये मिळतात

government schemes for women : आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत. मग त्यामध्ये सैनिकांसारखे आव्हानात्मक काम असो किंवा डॉक्टर सारखे जबाबदारी असणारे काम. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत.

government schemes for women are running in these states देशातील अनेक राज्यांमध्ये महिलांच्या कल्याणासाठी सरकारकडून विविध योजना चालवल्या जात आहेत. चला तर मग जाणून घेऊया कुठल्या राज्यामध्ये महिलांसाठी कुठकुठल्या योजना चालवल्या जात आहेत…

government schemes महिला समाज आणि कुटुंब या दोन्हीच्या आधारस्तंभ आहेत. महिलांच्या सशक्तीकरणाशिवाय देश विकास करू शकत नाही ही बाब लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकार सतत महिलांसाठी अनेक चांगल्या योजना आणत असते आणि त्या राबवत असते.

Sarkari Yojana या योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील महिलांना आर्थिक सशक्त करून त्यांना स्वयंरोजगाराच्या दिशेमध्ये प्रोत्साहन करत असते. यासाठी राज्य सरकार कडून महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना चालवल्या जातात. चला जाणून घेऊया कुठल्या राज्यामध्ये कुठली योजना सध्या सुरू आहे.

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला 1500 रुपये प्रति महिना दिला जातो. आता या योजनेअंतर्गत बारावा हप्ताही जमा करण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये महिला समृद्धी योजना

Mahila Samridhi Yojana

दिल्लीमध्ये रेखा सरकारने महिला समृद्धी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. याव्यतिरिक्त दिल्लीच्या रेखा गुप्ता सरकारकडून मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1000 रुपये प्रति महिना दिले जातात. मात्र अजून पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्सफर करणे सुरू झालेले नाही.

झारखंड मध्ये मंईयां सन्मान योजना

Mukhyamantri Maiya Samman Yojana

झारखंड मध्ये हेमंत सोरेन सरकारने मंईयां सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना आर्थिक मदत केली जाते. यामध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये दिले जातात.

मध्यप्रदेश सरकारची लाडली बहना योजना

Ladli Behna Yojana

मध्यप्रदेश सरकारने लाडली बहना योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1250 रुपये जमा केले जातात. यामुळे महिलांचा आर्थिक विकास होण्यास मदत होते.

हरियाणा सरकारची लाडो लक्ष्मी योजना

Lado Lakshmi Scheme

Lado Lakshmi Yojana हरियाणा सरकारने लाडो लक्ष्मी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये दिले जातात. महिलांचा आर्थिक विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशची निराश्रित महिला पेन्शन योजना

उत्तरप्रदेश मध्ये निराश्रीत महिला पेन्शन योजना चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1000 रुपये आर्थिक मदत केली जाते.

पश्चिम बंगाल सरकारची लक्ष्मी भंडार योजना

या योजनेच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील महिलांना 1000 रुपये आणि अनुसूचित जातीतील महिलांना 1200 रुपये प्रति महिना आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून केली जाते.

छत्तीसगड मध्ये महतारी वंदना योजना

Mahtari Vandana Yojana

छत्तीसगड सरकारने महतारी वंदना योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1000 रुपये मदत दिली जाते.

हिमाचल प्रदेश मध्ये इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना

हिमाचल प्रदेश सरकारने इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाते.