Ajit Pawar on Ladki Bahin yojana in marathi 2025 : लाडकी बहीण योजना बंद करणार नाही पण…

Ajit Pawar on Ladki Bahin yojana in marathi 2025 : राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा

Ajit Pawar on Ladki Bahin yojana in marathi 2025 : गेल्या अनेक दिवसापासून लाडकी बहिणी योजना सुरू राहणार की बंद होणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. Ajit Pawar on Ladki Bahin : मात्र आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात मोठी घोषणा विधानसभेत केली आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ajit Pawar on Ladki Bahin yojana in marathi 2025 : नुकताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. मुंबई येथे अर्थसंकल्पी अधिवेशन ही सुरू आहे, या अर्थसंकल्पात काही प्रश्नांची उत्तरे देताना उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही मात्र या योजनेमध्ये दुरुस्त्या करण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे.

Ajit Pawar on Ladki Bahin : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. मात्र या योजनेचा राज्यातील गरीब महिलांनाच लाभ मिळावा यासाठी काही दुरुस्त्या केल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar on Ladki Bahin yojana in marathi 2025 : आमचे सरकार आतापर्यंत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या मात्र आता अपात्र ठरत आहेत त्यांच्याकडून एक रुपयाही परत घेणार नाही अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली. त्यामुळे अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ajit Pawar on Ladki Bahin : अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात प्रश्नांची उत्तर देताना मोठी घोषणा केली आहे. आमच्या सरकारने आतापर्यंत ज्या बहिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आहेत. मात्र त्या आता अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून एक रुपयाही परत घेणार नाही.

Ajit Pawar on Ladki Bahin yojana in marathi 2025 : मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय फायदा होणार आहे याचाही विचार करत असतो असे पवार यांनी म्हटले आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना थेट 1500 रुपये रक्कम मिळत आहेत. त्यामधून महिला सक्षमीकरणाचे काम आमचे सरकार करत आहे.

Ajit Pawar on Ladki Bahin : यावेळी बोलताना पवार म्हणाले की, परवा विधान परिषदत गटनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचण्यात आली. लाडकी बहीण योजनेचे अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँक 10 ते 15हजार रुपयापर्यंत कर्ज देणार आहे.

Ajit Pawar on Ladki Bahin yojana in marathi 2025 : राज्यात आर्थिक विकास महामंडळासारख्या संस्था ही आहेत, जिल्हा सहकारी बँक आहेत, सरकारी बँक आहेत, मी सर्वांना आवाहन करणार आहे, ज्या महिलांना छोटा -मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही सुरू करा म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दिशेने आपण एक पाऊल टाकू असे अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Ajit Pawar on Ladki Bahin yojana in marathi 2025 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या हातात तब्बल 45 हजार कोटी रुपये जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. हा थोडा थोडका पैसा नाही सुमारे 45 हजार कोटी रुपये वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत.

Ajit Pawar on Ladki Bahin : यामुळे महिला सक्षम होतील, तिच्या कुटुंबाला या रकमेतून हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे-मोठे योगदान मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला