अटल पेन्शन योजना 2024 Atal Pension Yojana 2024
नमस्कार, वाचकहो आज आपण अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana संदर्भात संपूर्ण माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत. अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2015 मध्ये सुरू केली. विशेषतः देशातील मजूर वर्गाला मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली या योजनेअंतर्गत पेन्शन फंड नियम आणि विकास प्राधिकरण या संस्थेद्वारे अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana प्रशासित केली जाते. अटल पेन्शन योजना म्हणजे काय?, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेची वैशिष्ट्ये, या योजनेचे उद्दिष्टे, या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत याची संपूर्ण माहिती या लेखात आपण आज पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या योजनेची संपूर्ण माहिती.
अटल पेन्शन योजना म्हणजे काय?
What is Atal Pension Yojana
देशातील असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आणि मजूर यांना वृद्धपकाळात पेन्शनची सुविधा नसते, त्यामुळे अशा मजुरांना त्यांच्या उतार वयात त्यांचे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. या कामगारांना आणि मजुरांना उतार वयात पैशाची अडचण येऊ नये म्हणून केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली. ज्यामुळे असंघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी त्यांच्या वृद्धपकाळात म्हणजेच त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुढील आयुष्यासाठी बचत करतील. या बचतीमुळे त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. भारतात संपूर्ण कामगारांमध्ये 88% कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करणारे आहेत. म्हणजेच जवळपास 47.29 करोड लोकसंख्या ही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची आहे. ज्यांचे उत्पन्नाचे साधन ही खूप कमी आहे. त्यांच्या पुढील आयुष्यात येणाऱ्या दैनंदिन कामात आर्थिक अडचण भासू नये म्हणूनच सरकारने हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अटल पेन्शन योजना APY सुरू केली.
2015-16 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने भारतीयांसाठी सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन जाहीर केली. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांना पेन्शन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अटल पेन्शन योजना APY 01 जून 2015 पासून कार्यान्वित आहे.
ठळक मुद्दे :
अटल पेन्शन योजना म्हणजे काय?
अटल पेन्शन योजनेची थोडक्यात माहिती
अटल पेन्शन योजनेचे फायदे
अटल पेन्शन योजनेचे वैशिष्ट्ये
अटल पेन्शन योजनेचा लाभ
अटल पेन्शन योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
अटल पेन्शन योजनेची पात्रता
अटल पेन्शन योजना खाते उघडण्याची प्रक्रिया
अटल पेन्शन योजनेचा फॉर्म कसा डाऊनलोड करावा
अटल पेन्शन योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया
अटल पेन्शन योजनेत APY निधी कसा भरावा
अटल पेन्शन योजनेमध्ये निधी देण्यास तुम्ही अयशस्वी झाल्यास काय होते
खात्यातून रक्कम काढण्याची प्रक्रिया
अटल पेन्शन योजना ग्राहकांसाठी कर लाभ
अटल पेन्शन योजनेचे खाते बंद कसे करावे
FAQ’S
https://en.wikipedia.org/wiki/Atal_Pension_Yojana#History
अटल पेन्शन योजनेची थोडक्यात माहिती
Atal Pension Yojana in short
योजनेचे नाव | अटल पेन्शन योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
कधी सुरू झाली | 01 जून 2015 |
पेन्शन रक्कम | 1000 ते 5000 |
योगदान कालावधी | किमान वीस वर्ष |
वयोमर्यादा | 18 ते 40 वर्ष |
मॅच्युरिटी | 60 वर्ष |
लाभ | असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अटल पेन्शन योजनेचे फायदे
Benefits of Atal Pension Yojana
केंद्र सरकारकडून हमीच्या स्वरूपात कमी जोखमीचा हा सेवानिवृत्तीचा पर्याय आहे.
APY वयाच्या साठ वर्षानंतर म्हणजेच सेवानिवृत्तीनंतर भारत सरकारकडून प्रतिमहा 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि 5000 रुपये पेन्शन मिळण्याची हमी देते.
अटल पेन्शन योजना APY मधील कर रक्कम आयकर कायदा 1961 च्या कलम 80 CCD(1) च्या अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे.
अटल पेन्शन योजनेच्या Atal Pension Yojana नियमानुसार सदस्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नॉमिनीला या योजनेचा लाभ मिळतो.
प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेसाठी https://yojanamazi.com/pradhanmatri-krushi-sinchai-yojana-2024-in-marathi/
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसाठी https://yojanamazi.com/pradhanmantri-jeevan-jyoti-bima-yojana-2024-in-marathi/
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी https://yojanamazi.com/pm-suraksha-bima-yojana-2024/
अटल पेन्शन योजनेचे वैशिष्ट्ये
Feature of Atal Pension Yojana
प्रत्येक लाभार्थी हा प्रतिमहा 1000 ते 5000 च्या हमे पूर्ण पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.
लाभार्थ्याला किमान पाच वर्षांसाठी भारत सरकारकडून हे योगदान प्राप्त होईल. त्यामुळे जर लाभार्थी 1 जून 2015 ते 31 मार्च 2016 या दरम्यान या अटल पेन्शन योजनेमध्ये Atal Pension Yojana सहभागी झाला असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
अटल पेन्शन योजनेचा लाभ
Benefits of Atal Pension Yojana
अटल पेन्शन योजनेचा APY लाभ म्हणजे सेवानिवृत्तीनंतर आर्थिक मदत मिळते.
या योजनेमध्ये नोंदणी करून व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हणजेच साठ वर्ष नंतर त्यांचा उत्पन्न स्त्रोत सुरक्षित करू शकतो. यामुळे दैनंदिन खर्च पूर्ण करण्यास मदत होते.
अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana ही योजना असंघटित क्षेत्राच्या पलीकडे आपले कव्हरेज विस्तारित करतात. यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना पेन्शन लागू होत नाही. अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांची लोकसंख्या देखील भरपूर आहे. यामुळे या योजनेचा लाभ भरपूर लोकांना घेता येतो.
ही योजना विविध गटातील व्यक्तींना परवडणारी आहे.
या योजनेमध्ये इच्छित पेन्शन रक्कम आणि नाव नोंदणीचे वय यावर रकमेची निवड केली जाते.
अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana ही लवचिक पर्याय प्रदान करते. यामुळे व्यक्तींना आर्थिक मदत मिळते.
अटल पेन्शन योजनेच्या Atal Pension Yojana लाभार्थ्यांना त्यांचे अकाउंट एका बँकेतून किंवा एका पोस्ट ऑफिस मधून देशभरातील कुठल्याही दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करता येते.
जर एखादी व्यक्ती मरण पावली तर तिची पेन्शन नामनिर्देशित पती किंवा पत्नीला दिली जाते.
अटल पेन्शन योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Documents of Atal Pension Yojana
आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते
अर्जदाराचे आधार कार्ड
मोबाइल नंबर
अर्जदाराचे ओळखपत्र
कायमचा पत्ता पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
अटल पेन्शन योजनेची पात्रता
Eligibility of Atal Pension Yojana
अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 40 वर्ष दरम्यान असावे.
अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे जे की त्याच्या आधार कार्डशी लिंक असावे.
ज्या व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारची पेन्शन उपलब्ध होत नसेल तोच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
या योजनेचे खाते उघडताना नाव नोंदणीसाठी पती किंवा पत्नीची माहिती देणे आवश्यक आहे.
अटल पेन्शन योजना खाते उघडण्याची प्रक्रिया
Atal Pension Yojana Account opening process
तुमच्या जवळच्या बँकेतिल शाखेत अटल पेन्शन योजना APY नोंदणी फॉर्म घ्या आणि सबमिट करा. त्यामध्ये तुमचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल नंबर लिहा. खाते उघडताना तुमच्या लिंक केलेल्या बँकेतून तुमचे पहिली वर्गणीची रक्कम कपात होईल. त्यानंतर बँक तुम्हाला पावती नंबर म्हणजेच PRAN नंबर देते त्यानंतर वर्गणी तुमच्या खात्यातून ऑटो डेबिट होईल.
अटल पेन्शन योजनेचा फॉर्म कसा डाऊनलोड करावा
How to download form of Atal Pension Yojana
अटल पेन्शन योजनेचे Atal Pension Yojana खाते उघडण्यासाठीचा फॉर्म तुमच्या जवळील बँकेच्या शाखेतून तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने मिळू शकतो. तरीही पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी PFRDA यांच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला अटल पेन्शन योजनेचा अर्ज मोफत डाउनलोड करता येतो. अटल पेन्शन योजना APY सदस्यत्व फॉर्म विविध बँकिंग वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे. ज्यामध्ये देशतील खाजगी आणि सार्वजनिक बँकांचा समावेश आहे.
https://npscra.nsdl.co.in/nsdl/forms/APY%20Subscriber%20Registration-Form.pdf या वेबसईटवरून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता.
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी PFRDA या वेबसाईटवरून अटल पेन्शन योजनेचा फॉर्म डाउनलोड करा.
अटल पेन्शन योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया
अटल पेन्शन योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :
अटल पेन्शन योजनेचाअर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. अर्ज अचूकपणे भरण्यासाठी खालील माहितीचा आधार घ्यावा.
सर्वप्रथम बँकेत जाऊन फॉर्म घ्या. त्यानंतर त्यावर विचारलेली बँकेसंबंधीची अचूक माहिती फॉर्ममध्ये भरा. काही अडचण असल्यास बँक व्यवस्थापकाशी संपर्क करून माहिती मिळवा.
त्यानंतर संपूर्ण माहिती ब्लॉक अक्षरामध्ये (capital later) अर्जावर भरा. यामध्ये तुमचा खाते नंबर, बँक शाखेचे नाव, आदि माहिती अर्जात भरावी.
अर्ज भरत असताना नावसमोर श्री, श्रीमती, कुमारी या पर्यायावर क्लिक करणे गरजेचे आहे. विवाहित महिलेने पतीचे नाव प्रवीष्ट करावे. तुमचे नाव, जन्म तारीख, वय आदि माहितीही यासोबत भरावी. याबरोबरच मोबाइल नंबर, ई-मेल, आधार नंबर आणि नॉमिनी कॉलम मध्ये नामनिर्देशित व्यक्तीचे नाव आणि त्याच्याशी असलेले नाते लिहावे. जर नॉमिनी अल्पवयीन असेल तर त्याची जन्म तारीख लिहावी.
दिलेल्या पर्यायाचा वापर करून 1 ते 5 हजार पर्यंतची पेन्शन योजना तुम्ही निवडू शकता. बँक तुमच्या वयानुसार मासिक रक्कम निश्चित करेल. त्यामुळे अर्ज करताना योगदान रक्कम मासिक हा रकाना रिक्त सोडावा उदाहरणार्थ : तुम्ही या योजनेत समाविष्ट होत असताना तुमची वय 25 वर्ष आहे. आणि तुम्ही दोन हजाराचे मासिक पेन्शन निवडले असेल तर बँक निश्चित करेल की तुम्ही प्रति महिना 151 रुपये रक्कम जमा करावी. तुमचा फॉर्म भरून झाल्यानंतर कागदपत्रावर स्वाक्षरी करा असे केल्याने तुम्ही अर्जावरील सर्व योजनेच्या अटी व शर्ती वाचल्या आहेत आणि याला सहमती देतात. याबरोबरच तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती अचूक असल्याचेही तुम्ही मान्य करता. तुम्हाला यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही संबंधित बँकेत तत्काळ जाऊन हे बदल करू शकता. हे लक्षात ठेवा की चुकीची माहितीसाठी तुम्हालाच जबाबदार धरले जाते. त्यामुळे अचूक माहिती देणे आवश्यक आहे.
या योजनेचा अर्ज भरल्यानंतर पोचपावती सबस्क्राईब वर नोंदणी आणि फॉर्म चा अंतिम भाग बँक मार्फत भरला जातो. ही माहिती बँक भरते आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेत असल्याचे खात्री करते. तुम्ही अर्ज भरल्यानंतर बँक कर्मचारी ही सर्व माहिती भरेल जर तुम्हाला तुमचे apy अकाउंट तुम्हाला बंद करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला apy बंद करण्याचा फॉर्म बँकेत भरावा लागतो. त्यानंतर तुमचे खाते बंद केले जाते.
अटल पेन्शन योजना फॉर्मचे उदाहरण
Example of Atal Pension Yojana form
आपण एका सोप्या पद्धतीने अटल पेन्शन योजनेच्या APY फॉर्मचे उदाहरण बघूया. यामध्ये तुम्हाला निधी जमा करण्याची पद्धत आणि त्याची तारीख कशी असेल हे बघूया.
तुम्हाला अटल पेन्शन योजनेचा APY लाभ घेण्यासाठी तुमचे बँकेमध्ये सेविंग अकाउंटचे डिटेल्स आणि तुमचा मोबाईल नंबर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही दिलेल्या बँक खट्यामधून दर महिन्याला तुमच्या खात्यातून हा निधी वजा करता येईल. निधी हा मासिक (1 महिना) त्रैमासिक (3 महिने) किंवा सहामाही (6 महिने) या तीनही पद्धतीने केला जाऊ शकतो. आणि त्यासाठीची ऑटो डेबिट सूचना देखील तुम्हाला सांगावी लागते. मासिक निधी तारीख निधीच्या पहिल्या तारखेपासून निर्धारित केला जातो. त्या नंतरचा सर्व निधी त्या तारखेला कपात करता येतो. उदाहरणार्थ जर तुम्ही 5 जानेवारीला पहिला निधी दिला असेल तर पुढची देय दिनांक ही 5 फेब्रुवारी असेल. आणि तसेच दर महिन्याला होत राहील. हा निधी तुमच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये टाकण्यासाठी पुरेशी रक्कम तुमच्या खात्यात जमा असायला हवी. तसेच केवायसी करण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँकेकडे देणे गरजेचे आहे. त्यासोबतच नॉमिनीचेही आधार कार्ड देणे आवश्यक आहे.
अटल पेन्शन योजनेत (APY) निधी कसा भरावा
अटल पेन्शन योजनेचा Atal Pension Yojana निधी तुमच्या बँकेच्या खात्यामधून सूचना करून वजा करता येतो. निधी देण्याचा हा एक पर्याय आहे. तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक ठेवावी लागते. ती न ठेवल्यास तुम्हाला दंड आकारला जातो. तो दंड खालील प्रमाणे :
जर दर महिन्याला 100 रुपये निधी असेल तर 1 रुपया दंड आकारला जातो
जर 101 ते 500 रुपये या दरम्यान निधी असेल तर 2 रुपये दंड आकारला जातो
जर 501 रुपये ते 1000 रुपये निधी असेल दरमहा 5 रुपये दंड आकारला जातो.
जर 1001 पेक्षा अधिक दरमहा निधी असेल तर 10 रुपये दंड आकारला जातो.
अटल पेन्शन योजनेमध्ये निधी देण्यास तुम्ही अयशस्वी झाल्यास काय होते
जर अटल पेन्शन योजना APY एसबीआय चे सदस्यत्व घेतले असेल आणि तरीही ऑटो डेबिट सूचना अयशस्वी झाल्यामुळे पेन्शन योजनेत नियमित निधी देण्यात अयशस्वी झाला असाल तर पुढील गोष्टी घडतात
जर 6 महिन्यापर्यंत निधी तुम्ही भरला नाही तर अटल पेन्शन योजना हे खाते ब्लॉक होते.
12 महिन्यापर्यंत निधी भरला नाही तर अटल पेन्शन योजना खाते बंद होते.
24 महिन्यापर्यंत निधी भरला नाही तर अटल पेन्शन योजना खाते हे आपोआप बंद होते. बँक त्या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कधीही तुमच्या बँक खात्यातून निधीची रक्कम वजा करू शकते. आणि अटल पेन्शन योजनेसाठी Atal Pension Yojana लिंक केलेला जो बँक खाते नंबर आहे त्या महिन्यात कधीही तुमचा निधी वसूल केला जाऊ शकतो.
खात्यातून रक्कम काढण्याची प्रक्रिया
तुमचे वय साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एपीवाय योजने मधून बाहेर पडू शकता. आणि तुमची पेन्शन प्राप्त करू शकता. तुमच्या एपीवाय अकाउंट मधून पैसे काढण्यासाठी तुमचे खाते असलेल्या संबंधित बँकेला भेट द्या आणि पेन्शन काढण्याचे बँकेला कळवा त्यानंतर तुमची पेन्शन तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा आजारीपणामुळे तो व्यक्ती या योजनेतून बाहेर पडू शकतो अशा परिस्थितीमध्ये तुमच्या खाते असलेल्या बँकेत जाऊन तुम्ही तुमचे अडचण बँकेला सांगून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे बँकेला पुरवावीत. जर अकाउंट धारक व्यक्तीचा त्याच्या वयाच्या 60 वर्षांपूर्वी मृत्यू झाला असेल तर पेन्शन रक्कम त्याच्या पत्नीला दिली जाते. एखाद्या वेळी पती आणि पत्नी या दोघांचाही काही कारणामुळे मृत्यू झाला असेल तर फॉर्मवर दिलेल्या नॉमिनीला पेन्शनची रक्कम दिली जाते.
अटल पेन्शन योजना ग्राहकांसाठी कर लाभ
अटल पेन्शन योजना ही एक केंद्र सरकारी पेन्शन योजना आहे. त्यामुळे प्राप्तीकर कायदा 1961 च्या कलम 80c अंतर्गत दीड लाख रुपयांसाठी पात्र आहे. वार्षिक रुपये पन्नास हजार पर्यंतची वर्गणी कर सवलतीसाठी प्राप्त आहेत. तसेच आयकर कायदा 1961 च्या नवीन कलम 80 CCD(1) अंतर्गत अटल पेन्शन योजना रुपये पन्नास हजार पर्यंत वाढवता येऊ शकतो.
अटल पेन्शन योजनेचे खाते बंद कसे करावे
अटल पेन्शन योजनेचे खाते बंद करणे आणि या योजनेतून स्वतःहून बाहेर पडण्याची परवानगी केवळ आजार किंवा मृत्यूच्या बाबतीतच आहे ज्या व्यक्तीचे खाते आहे त्या वेळेचा मृत्यू झाल्यास पेन्शन योजनेच्या खाते उघडण्याची फॉर्ममध्ये त्यांनी नॉमिनी म्हणून ज्या व्यक्तीचे नाव दिले आहे त्या व्यक्तीला ती पूर्ण रक्कम दिली जाते.
FAQ’S
अटल पेन्शन योजनेअंतर्गत कर लाभ मिळतो का?
होय… अटल पेन्शन योजना अंतर्गत आयकर कायदा 1961 च्या कलम 80 CCD च्या अंतर्गत तुम्हाला लाभ घेता येतो.
अटल पेन्शन योजनेसाठी कोण आहे पात्र?
18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेसाठी पात्र आहे. नोकरी करणारा किंवा स्वयंरोजगार असला तरीही अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो.
अटल पेन्शन योजनेचा लाभ कधीपासून सुरू होतो?
अटल पेन्शन योजनेअंतर्गत ज्या लाभार्थीचे वय 60 वर्ष पूर्ण आहे. म्हणजेच तो सेवानिवृत्त झाला आहे. त्यानंतर त्याला या योजनेचा लाभ घेता येतो.
अटल पेंशन योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर अटल पेंशन योजनेचा लाभ मिळतो.