Dr Vilas Ujawane Passes Away 2025 marathi : ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन

Dr Vilas Ujawane Passes Away information in marathi : ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे

Dr Vilas Ujawane Passes Away ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाने कला विश्वावर शोककळा पसरली आहे. नुकतेच ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असताना मराठी मनोरंजनविश्वातही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Dr Vilas Ujawane Passes Away मराठी मनोरंजन सृष्टीतील डॉ. विलास उजवणे यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 4 एप्रिल 2025 रोजी मिरा रोड या ठिकाणी असणाऱ्या एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. विलास उजवणे यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Dr Vilas Ujawane Passes Away काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार झाला होता. त्यावर त्यांनी मात केली होती. मात्र नंतर यासंबंधी विकार झाल्याने पुन्हा त्यांची तब्येत हलवली होती आणि अचानक आज 4 एप्रिल रोजी त्यांचे प्राणज्योत मालवली. चार दिवस सासूचे, दामिनी, वादळवाट यासारख्या लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

actor dr vilas ujawane passes away डॉ. उजवणे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत काम केले. उजवणे यांचा जन्म नागपूर मध्ये झाला होता. नागपूर विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि डॉक्टरकीची पदवी मिळवली. परंतु त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती नंतर मुंबईत येऊन त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं. अनेक व्यवसायिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं.

actor dr vilas ujawane passes away “शुभम भवतु” या डायलॉगमुळे डॉ. विलास उजवणे घरोघरी पोहोचले होते. चार दिवस सासूचे, वादळवाट, दामिनी यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. हिंदी सिनेमांमध्ये देखील त्यांनी काही भूमिका स्वीकारल्या आहेत. त्यांच्या आठवणी आणि योगदान कायमच आपल्या स्मरणात राहतील.