RBI Governor Sanjay Malhotra 2025 information in marathi : RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली महत्वाची माहिती
big update regarding 10 and 500 rupee notes rbi governor sanjay malhotra : 10 आणि 500 रुपयाच्या नवीन नोटा आरबीआयकडून छापल्या जाणार आहेत. अशी माहिती Reserve Bank of India रिझर्व बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी दिली आहे.
RBI आरबीआयने दिलेल्या नवीन माहितीनुसार, लवकरच महात्मा गांधी (नवीन) मालिकेअंतर्गत 10 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात येणार आहेत. या 10 आणि 500 रुपयांच्या नोटावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे.
RBI Governor Sanjay Malhotra मध्यवर्ती बँकेने एका निवेदनात म्हटले की, या नोटांची रचना सर्व बाबतीत महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील 10 आणि 500 रुपयांच्या सध्याच्या नोटांसारखीच आहे, जरी नवीन नोटा चालू करण्यात आल्या तरी आरबीआयने यापूर्वी जारी केलेल्या 10 आणि 500 रुपयांच्या सर्व नोटा कायदेशीर निविदा राहतील.
RBI Governor Sanjay Malhotra मागील महिन्यात आरबीआयने गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या स्वाक्षरी असलेल्या 100 आणि 200 रुपयांच्या बँक नोटा जरी करण्याची घोषणा केली होती. मल्होत्रा यांनी डिसेंबर 2024 मध्ये आरबीआय गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला यापूर्वी शक्तीकांत दास हे माजी गव्हर्नर होते.
रेपोदर होणार 9 तारखेला जाहीर
Reserve Bank of India update information in marathi आरबीआयच्या चलन विषयक धोरण समितीची बैठक 7 एप्रिल पासून सुरू होत आहे. आरबीआयचे गव्हर्नर 9 एप्रिलला पतधोरण जाहीर करतील. चालू आर्थिक वर्षातील ही पहिली बैठक असेल. त्यामुळे ही खूप महत्त्वाची बैठक आहे.
Reserve Bank of India update information in marathi या बैठकीत रेपो दरात 0.25% कपात केली जाऊ शकते असे तज्ञांचे मत आहे. असे झाले तर रेपो दरात सलग दुसऱ्यांदा कपात केली जाईल त्यानंतर रेपो दर 6 टक्क्यांवर येतील.
RBI : या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. फेब्रुवारीमध्ये RBI गव्हर्नर ने 0.25% कपातीची घोषणा केली होती.