E Shram Card Pension Yojana 2024 In Marathi : असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणार पेन्शन

E Shram Card Pension Yojana 2024 Information In Marathi : ई-श्रम कार्ड पेन्शन योजना 2024 मराठी माहिती

E Shram Card Pension Yojana 2024 : केंद्र सरकारच्या वतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आर्थिक मदत म्हणून ई-श्रम कार्ड पेन्शन योजना  सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ई-श्रम कार्ड धारकांना वर्षाला 36 हजार रुपयाची पेन्शन दिली जाणार आहे. ई-श्रम कार्ड पेन्शन योजना त्या सर्व लोकांसाठी बनवण्यात आली आहे. जे असंघटित क्षेत्रात काम करतात यामुळे जेणेकरून त्यांच्या उपजीविकेसाठी शाश्वत विकास निश्चित करता येईल.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून ई-श्रम कार्ड पेन्शन योजना 2024 E Shram Card Pension Yojana 2024  ची संपूर्ण माहिती बघणार आहोत. ई-श्रम कार्ड पेन्शन योजना  म्हणजे काय?, या योजनेचा कोणाला होतो लाभ? ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेची काय आहेत फायदे, उद्दिष्टय, पात्रता, या योजनेसाठी कसा करावा अर्ज? या सर्व गोष्टींची माहिती आजच्या लेखातून पाहणार आहोत. श्रमिक आणि कामगारांना या योजनेसाठी काय काय कागदपत्रे, पात्रता आहेत याचीही संबंधित माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

E Shram Card Pension Yojana

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना म्हणजे काय?

What Is E Shram Card Pension Yojana

E Shram Card Pension Yojana भारत हा विकसनशील देश आहे. आपल्या देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी देशातील कामगार वर्ग यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर श्रमिक वर्ग देखील भरपूर आहेत. परंतु असंघटित क्षेत्रात काम करणारे मजुरांचे दैनंदिन जीवन हे खूप अडचणीचे असते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी 2020 पासून ई श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू केली आहे.

ई श्रम कार्ड पेन्शन योजनेचा E Shram Card Pension Yojana लाभ हा देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळतो. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन दिली जाते.  ही योजना असंघटित क्षेत्रातील सर्व लोकांसाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या एका विशिष्ट वयानंतर पेन्शन सुरू होते.

ई श्रम कार्ड पेन्शन योजने अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3 हजार रुपये दरमहा याप्रमाणे  पेन्शन दिली जाते, म्हणजेच 36 हजार रुपये वार्षिक पेन्शन या लाभार्थ्यांना ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत दिली जाते. त्याचबरोबर ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत लाभार्थीला 2 लाख रुपयांचा अपघात विमा देखील मिळतो.

E Shram Card Pension केंद्र सरकारने देशातील सर्व ई-श्रम कार्ड धारकांची सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी ई-श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगाराला निश्चित वयानंतर पेन्शन दिली जाईल. पेन्शन योजना अंतर्गत ई-श्रम कार्ड धारकांना वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. म्हणजेच प्रतिवर्षी 36 हजार रुपयाची पेन्शन रक्कम पात्र कामगारांना मिळणार आहे.

E Shram Card Pension योजनेचा लाभ तुम्हाला मोफत घेता येणार नाही. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला वयानुसार काही ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन दिली जाईल. यासाठी तुम्हाला पीएम श्रम योगी मानधन योजना अंतर्गत आपला अर्ज करावा लागेल. ही योजना कामगारांना सामाजिक आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्हीही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.

ठळक मुद्दे:-

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना म्हणजे काय?

What Is E Shram Card Pension Yojana

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेबद्दल थोडक्यात माहिती

E Shram Card Pension Yojana In Short

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचे लाभ

E Shram Card Pension Yojana Benefits

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचे वैशिष्ट्ये

E Shram Card Pension Yojana Features

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी पात्रता

E Shram Card Pension Yojana Eligibility

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

E Shram Card Pension Yojana Documents

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया

E Shram Card Pension Yojana Online Apply

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

E Shram Card Pension Yojana Apply

FAQ’S वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेबद्दल थोडक्यात माहिती

E Shram Card Pension Yojana In Short

योजनेचे नावई-श्रम पेन्शन कार्ड
विभागकामगार आणि रोजगार मंत्रालय
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
लाभार्थीदेशातील श्रमिक कामगार
उद्देशकामगारांना आर्थिक मदत करत त्यांच्या भविष्यासाठी तरतूद करणे
पेन्शन रक्कम3000 रुपये प्रति महिना
वार्षिक पेन्शन36000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://maandhan.in/
E Shram Card Pension Yojana

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचे लाभ

E Shram Card Pension Yojana Benefits

  • ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचा E Shram Card Pension Yojana लाभ देशातील सर्व ई-श्रम कार्डधारकांना दिला जाणार आहे. कारण त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेअंतर्गत श्रम कार्ड धारकांना वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रति महिना 3000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे.
  • केंद्र सरकारकडून देण्यात येणारी पेन्शन रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 36 हजार रुपये प्रति वर्ष आर्थिक पेन्शन म्हणून दिली जाणार आहे.
  • पीएम श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत जे श्रम कार्डधारक या योजनेसाठी अर्ज करतात त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • श्रम कार्ड धारकांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेद्वारे कामगाराचे भविष्य उज्वल करण्यास मदत होईल आणि त्यांचा आर्थिक विकासही या माध्यमातून होईल.

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचे वैशिष्ट्ये

E Shram Card Pension Yojana Features

  • देशभरातील ई-श्रम कार्ड धारकांचा सामाजिक आर्थिक विकास व्हावा आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू केली आहे.
  • ई-श्रम कार्ड पेन्शन E Shram Card Pension Yojana धारकांना वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना 3000 रुपये प्रती महिना पेन्शन मिळेल आणि निवृत्ती नंतर मिळणाऱ्या पेन्शन मधून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागेल.
  • सेवानिवृत्ती नंतर त्यांना वार्षिक 36000 रुपये पेन्शन च्या माध्यमातून मिळतील कामगारांसाठी हा एक उत्पन्नाचा स्त्रोत असेल.
  • E Shram Card Pension Yojana योजनेतून त्यांना ठराविक पेन्शन मिळत असल्याने त्यांना कोणावर विसंबून राहण्याची आवश्यकता नसेल.
  • या योजनेतून त्यांचा सामाजिक, आर्थिक विकास होण्यास मदत होईल आणि त्यांना हक्काची पेन्शन मिळेल.

ई श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी पात्रता

E Shram Card Pension Yojana Eligibility

  • अर्जदार भारताचा रहिवासी असावा.
  • ई-श्रम कार्ड पेन्शन योजना साठी असंघटित क्षेत्रात कामगार असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार कामगाराचे वय 18 ते 40 या दरम्यान असावे.
  • कामगार अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असावे.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

अंत्योदय अन्न योजना

स्वामित्व योजना

कन्यादान योजना

बांधकाम कामगार योजना

महात्मा फुले जन आरोग्य योजना

ई श्रम कार्ड योजनेसाठी कोण करू शकतो नोंदणी

सेल्समन

दुकानात काम करणारे कर्मचारी

ऑटो चालक

मेंढीपाळ  

दुग्ध व्यवसाय करणारे

पंक्चर दुरुस्ती करणारे

सर्व पशुपालक

फेरीवाले

डिलिव्हरी बॉय

वीट भट्ट्यांवर काम करणारे मजूर

E Shram Card Pension Yojana

ई श्रम कार्ड अंतर्गत या योजनांचा मिळतो लाभ

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

अटल पेन्शन योजना

राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना

कौशल्य विकास योजना

आयुष्यमान भारत योजना

स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ

सार्वजनिक वितरण व्यवस्था योजना

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

E Shram Card Pension Yojana Documents

आधार कार्ड

ई श्रम कार्ड

बँक खाते पासबुक

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पासपोर्ट साईज आकाराचा फोटो

आदी कागदपत्र आवश्यक आहेत

E Shram Card Pension Yojana

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया

E Shram Card Pension Yojana 2024 online apply

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना 2024 E Shram Card Pension Yojana 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज दिसेल.

होम पेजवर तुम्हाला schemes (योजना) यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला पी एम एस वाय एम या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजना संबंधी माहिती येईल.

यावर असलेल्या लॉगिन वर क्लिक  करावे.

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज येईल त्यावर तुम्हाला self enrollment  या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो इथे टाकून सबमिट करावा.

आता तुमच्यासमोर ई-श्रम कार्ड पेन्शन योजना 2024 अर्ज समोर येईल.

अर्ज फॉर्म वर मागितलेली सर्व माहिती तुम्ही यामध्ये भरा.

माहिती भरल्यानंतर तुम्हाला मागितले सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावे लागतील.

सर्वात शेवटी तुम्हाला सबमिट या बटनावर आपला फॉर्म सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट करताच तुम्हाला अर्जाची पावती मिळून जाईल.

अशाप्रकारे तुम्ही यशस्वीपणे ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

ई श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

E Shram Card Pension Yojana Apply

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना साठी E Shram Card Pension Yojana ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन हा अर्ज भरावा लागेल.

सीएससी केंद्रावर गेल्यानंतर त्यांना ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी अर्ज करावेत असे सांगावे लागेल त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्र सीएससी केंद्र चालकाकडे जमा करावे लागतील.

सीएससी केंद्रचालक च्या माध्यमातून ई-श्रम कार्ड पेन्शन योजना चार्ज भरला जाईल.

अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक पावती देण्यात येईल त्यानंतर तुम्हाला सीएससी केंद्र चालकाचे निश्चित शुल्क द्यावे लागेल.

अशाप्रकारे तुम्ही ई-श्रम कार्ड साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

FAQ’S वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: ई श्रम कार्ड पेन्शन योजना अंतर्गत कामगारांना किती पेन्शन मिळते?

उत्तर: या योजनेअंतर्गत कामगाराला प्रति महिना 3000 रुपये पेन्शन दिली जाते. ती त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते

प्रश्न: ई श्रम कार्ड पेन्शन योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

उत्तर: ई श्रमकार्ड पेन्शन योजनेचा लाभ ई-श्रम कार्ड धारकांना त्यांचे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळतो.

प्रश्न: ई श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

उत्तर: ई-श्रम पेन्शन कार्ड योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रक्रियेद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA