Farishte Yojana 2024 In Marathi : जय भीम, फरिश्ते योजना पुन्हा सुरू

Farishte Yojana 2024 In Marathi : फरिश्ते योजना 2024 मराठी माहिती

Farishte Yojana 2024 In Marathi : आम आदी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर दिल्ली सरकारने सुरू केलेल्या जय भीम योजना आणि फरिश्ते योजना थप्प झाल्या होत्या. मात्र आता ते जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांनी या दोन्ही योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. फरिश्ते योजनेच्या माध्यमातून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मोफत उपचार दिले जाणार आहेत तर जय भीम योजनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाची फ्री कोचिंग देण्यात येणार आहे.


Farishte Yojana 2024 In Marathi आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री जय भिम योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तील विद्यार्थ्यांना आयआयटी आणि अन्य स्पर्धा परीक्षाची कोचिंगसाठीची फिस दिल्ली सरकार भरणार आहे. याबरोबरच अडीच हजार रुपये प्रति विद्यार्थी खर्चही देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र जमा करावे लागेल. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी मुख्यमंत्री जय भीम योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.


Farishte Yojana 2024 अरविंद केजरीवाल म्हणाले की दलित आणि ओबीसी समाजासाठी 2017 मध्ये मुख्यमंत्री जय भिम योजना सुरू केली होती. मात्र काही कारणामुळे ही योजना ठप्प झाली होती. पण आता पुन्हा ही योजना सुरू करण्यात येत आहे.
Farishte Yojana 2024 आयआयटीसह विविध स्पर्धेची कोचिंग खूप महागडी झाली आहे. ही बाब लक्षात घेत दिल्ली सरकार या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपूर्ण खर्च देत होती.

Farishte Yojana 2024 यासह अडीच हजार रुपये खर्च प्रति विद्यार्थी पण दिला जात होता. मात्र आपण जेलमध्ये गेल्यानंतर ही योजना ठप्प झाली होती. मात्र आज पुन्हा मी ही योजना सुरू करत आहे, या मधल्या काळातील जो गॅप असेल तो भरून काढण्यात येईल. ज्या कारणामुळे ही योजना बंद करण्यात आली होती. आता सर्व सुरू करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी येतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी बोलताना दिली.


Farishte Yojana 2024 केजरीवाल म्हणाले, दिल्लीमध्ये जुन्या सरकारने कुठलेही काम केले नाही. त्यामुळे त्यांना एलजी सोबत भांडायचे काम पडले नाही. मनीष सिसोदिया यांनी शाळा बनवल्या त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले, जर आम्हीही काही काम केले नाही तर आम्हालाही संघर्ष करावा लागेल. आमचा कुठल्याही पक्षाशी संघर्ष किंवा दुश्मनी नाही. आम्हाला व्यवस्था ठीक करायचे आहे. बीजेपी वाले दिल्लीवाल्यांना परेशान करत आहेत. दिल्लीतील लोकांना अडचणीत आम्ही पाहू शकत नाही. कारण दिल्लीवाला प्रत्येक नागरिक माझ्या परिवाराचा भाग आहे.

थांबलेली सर्व कामे सुरू करणार

Farishte Yojana मी आता जेलमधून बाहेर आलो आहे. भाजपने जी कामे थांबवली आहेत ती संपूर्ण कामे मी आता पुन्हा सुरू करत आहे. त्याची सुरुवात दिल्ली सरकार मुख्यमंत्री जय भिम योजना पुन्हा सुरू करून करत आहे. मुख्यमंत्री जय भीम योजनेच्या माध्यमातून दलित, एससी- एसटी -ओबीसी आणि ईडब्ल्यूएस समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षाची तयारी मोफत करता येणार आहे. आता गरीब मुलांनाही प्रगती करून देशाच्या विकासात आपले योगदान देता येणार आहे.

फरिश्ते योजना होणार पुन्हा सुरू

Farishte Yojana दिल्ली सरकारने पुन्हा एकदा फरिश्ते योजना सुरू केली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी ही योजना ही बंद केली होती. मात्र आता आम्ही पुन्हा ही योजना सुरू करत आहोत. या योजनेच्या माध्यमातून रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना कोणत्याही रुग्णालयामध्ये दाखल करत येईल आणि जखमींना रुग्णालयात आणणाऱ्या व्यक्तीची कुठल्याही प्रकारचे चौकशी केली जाणार नाही. याबरोबरच जखमी व्यक्तीवर झालेला संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे. या योजनेमुळे आतापर्यंत आम्ही 26 हजार पेक्षा अधिक लोकांचा जीव वाचवला असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी योजनेची घोषणा करताना दिली आहे.


दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी म्हणाल्या की. केजरीवाल ज्यावेळेस जेलमध्ये गेले त्यानंतर जय भिम योजना ठप्प झाली होती. मात्र गरीब आणि वंचित वर्गातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या व्हिजनला पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आज अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीच्या कॅबिनेटने मुख्यमंत्री जय भीम योजना पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षाची संपूर्ण कोचिंग फ्री मध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे आता तरुणांना पुन्हा आपले स्वप्न पूर्ण करता येणार आहे. Farishte Yojana

फरिश्ते योजना म्हणजे काय

Farishte Yojana 2024 देशातील वाढती अपघाताची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र अपघात झाल्यानंतर आपली चौकशी होईल या भीतीमुळे अनेक नागरिक जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करत नाहीत. मात्र अशा जखमी व्यक्तींना लवकरात लवकर उपचार मिळावे यासाठी दिल्ली सरकारने फरिस्ते योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून एखाद्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणाऱ्या व्यक्तीची कुठल्याही प्रकारची चौकशी केली जाणार नाही. तसेच जखमी व्यक्तीवर मोफत उपचार केले जाणार आहेत. रुग्णालयात दाखल करणाऱ्या व्यक्तीची चौकशी होणार नसल्यामुळे अनेक जण पुढे येऊन जखमींची मदत करतील हा सरकारला विश्वास आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 26 हजारापेक्षा अधिक जणांचे जीव वाचवण्यास मदत झाली आहे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना

राष्ट्रीय आयुष मिशन

मुख्यमंत्री योजना दूत 

वस्त्रोद्योग विणकर बक्षीस योजना 

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना

अटल भूजल योजना

अपंग बस सवलत योजना