Free Higher Education For Maharashtra Girls : आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

Free Higher Education For Maharashtra Girls

Free Higher Education For Maharashtra Girls आता महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मिळणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील मुलींना उच्च शिक्षणाचे शुल्क आणि परीक्षा शुल्क मध्ये 100 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे. यासंदर्भातील जीआर 8 जुलै रोजी प्रसिद्ध झाला आहे.

Free Higher Education For Maharashtra Girls


Free Higher Education For Maharashtra Girls महाराष्ट्रातील व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (एसइबीसी) आणि इतर मागासवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण शुल्कात व परीक्षा शुल्क मध्ये 50% ऐवजी 100% शिक्षण शुल्क देण्यासंदर्भातील सरकारचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येणार आहे.


Free Higher Education For Girls केंद्र सरकारने सुरू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्यातसाठी, महिला सक्षमीकरण अंतर्गत आर्थिक पाठबळ, व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून आणि मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती. या निर्णयाला मंत्रिमंडळाचे मान्यता मिळाली असून 8 जुलै रोजी यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे


Higher Education महाराष्ट्र सरकारचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग व कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मस्य व्यवसाय विभाग या विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थाद्वारे राबविण्यात जाणाऱ्या व्यवसाय अभ्यासक्रमांना केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) आर्थिक दुर्बल घटक आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के लाभ देण्यात येत होता. मात्र आता हा लाभ 100% देण्यात येण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


Free Higher Education For Maharashtra Girls व्यवसायिक शिक्षणामध्ये मुलीचे प्रमाण 36 टक्के इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यवसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने आणि महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळ अभावी व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत म्हणून राज्य सरकारने 5 जुलै रोजी झालेल्या बैठकीत 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हटले शासन निर्णयात


Higher Education महाराष्ट्रातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित, अशासकीय महाविद्यालय अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय विद्यापीठे, खाजगी अभिमात विद्यापीठे, स्वयं अर्थ साहाय्यीत विद्यापीठे वगळून) आणि सार्वजनिक विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास सरकारच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशिकेत आणि पूर्वीपासून प्रवेशिकेत असलेल्या ( अर्जाची नूतनीकरण केलेल्या) मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के लाभ ऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी येणाऱ्या 906.05 कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक निधीस मान्यता देण्यात आली आहे


Free Higher Education For Maharashtra Girls शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यात 100 टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाची आर्थिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन परीक्षेत आणि पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या ( अर्जाची नूतनीकरण केलेल्या) महिला व बालविकास विभाग सरकार निर्णय 6 एप्रिल 2024 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारी मध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा लागू करण्यात आली आहे.


सर्व प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून या योजनेचा निधी हा संबंध प्रशासकीय विभागाच्या लेखा विभागाअंतर्गत अर्ज संकल्पित करण्यात यावा. तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणी करता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे.Free Higher Education For Maharashtra Girls


मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उप समितीच्या निर्णयानुसार इडब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 7 ऑगस्ट 2017 रोजी शासन निर्णयामध्ये खालील सुधारली करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अ) इडब्ल्यूएस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत लाभ देताना इएस डब्ल्यूएस प्रमाणपत्र ऐवजी आई व वडील( दोन्ही पालकांचे) एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. तथापि, जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न, उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे.


आ) इडब्ल्यूएस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू राहील. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.


उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारी मध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता मिळाली आहे. Higher Education


संबंधित प्रशासकीय विभागांनी वरील प्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी. याव्यतिरिक्त योजनेच्या अटी शर्ती व कार्यपद्धती कायम राहतील असा निर्णय 5 जुलै 2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील मुलींना मोफत शिक्षक घे ण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना