government schemes to get loan for starting own startup 2025 In Marathi : सरकारच्या या योजनेतून मिळेल कर्ज
government schemes to get loan for starting own startup : देशातील अनेक तरुणांना आपल्या स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा असतो. मात्र त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते आपले स्टार्टअप सुरू करू शकत नाहीत. मात्र अशा स्थितीमध्ये सरकारने अशा लोकांची मदत करण्यासाठी योजना सुरू केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही योजनांची माहिती देणार आहोत या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःचा स्टार्टअप व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
चला तर मग जाणून घेऊया कुठल्या योजना आहेत ज्यातून आपण आपले स्टार्टअप सुरू करू शकतो.
government schemes to get loan for starting own startup नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे अनेकांना आवडतो. मात्र स्वतःचा स्टार्टअप व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला गुंतवणूक भांडवल ची आवश्यकता लागते. अनेकांना स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा असतो, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते आपल्या स्टार्टअप सुरू करू शकत नाहीत. आर्थिक अडचण असल्यामुळे ते व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. मात्र आता चिंता करण्याची काही गरज नाही कारण अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी सरकार या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाखो रुपयांचे कर्ज देते. आज आपण अशाच काही योजनांच्या बद्दल माहिती पाहणार आहोत.
प्रधानमंत्री मुद्रा योजना
Pradhan Mantri Mudra Yojana
Pradhan Mantri Mudra Yojana देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना 2015 मध्ये सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून केली जाते. या रकमेतून तरुण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतात.
स्टँड अप इंडिया योजना
Stand up india yojana केंद्र सरकारने स्टँड अप इंडिया योजना ची सुरुवात 2016 मध्ये केली आहे. या योजनेच्या माध्यमातून SC, ST महिलांना 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाते. या योजनेचा लाभ ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा अधिक आहे असा प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतो.
क्रेडिट गॅरंटी फंड योजना
Credit Guarantee Scheme
Credit Guarantee Scheme क्रेडिट गॅरंटी फंड योजनेच्या माध्यमातून मान्यताप्राप्त स्टार्ट अपला विना गॅरंटी कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून DPIIT द्वारे मान्यताप्राप्त स्टार्टअप आणि स्थिर महसूल प्रवासह स्टार्टअप ला कर्ज देण्यात येते.
प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम
प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम च्या माध्यमातून नवीन मायक्रो उद्योगांची स्थापना आणि ग्रामीण व शहरी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उत्पन्न निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून 25 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते.