Gudi Padwa 2025 Information In Marathi : गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती, कथा, मुहूर्त
Gudi Padwa 2025 In Marathi : हिंदू कालनिर्णयानुसार पहिला महिना हा चैत्र महिना असतो. चैत्र महिन्याला गुढीपाडव्यापासून सुरुवात होते. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार महाराष्ट्रातील लोकांसाठी हा नवीन वर्ष चा दिवस म्हणून साजरा केला जातो.
Gudi Padwa 2025 चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार मार्च ते एप्रिल यादरम्यान येतो. यावर्षी म्हणजेच 2025 रोजी हा सन 30 मार्च 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी रविवार आहे.
Gudi Padwa 2025 गुढीपाडव्याबद्दल अनेक कथा आहेत. गुढीपाडवा का साजरा केला जातो? याची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसेच गुढीपाडव्याचे शुभ मुहूर्त कोणते आहे? याची देखील माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
गुढीपाडवा कसा साजरा करतात
How To Celebrate In Gudi Padwa
Gudi Padwa 2025 Information गुढीपाडवा हा सण प्रामुख्याने येणाऱ्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांचे घर, अंगण स्वच्छ करतात जेणेकरून प्रसन्न वातावरण राहील. या दिवशी पारंपारिक तेल स्नान करणे आवश्यक आहे. महिला त्यांच्या घरासमोर अंगणामध्ये सुंदर व नक्षीदार रांगोळी काढतात. नवीन कपडे परिधान करतात. हा सण महाराष्ट्रात सर्वत्र साजरा होतो.
Gudi Padwa 2025 या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे. नंतर घरातील मोठ्यांना नमस्कार करावा. अंगणात सुशोभित रांगोळी काढावी. घराला तोरण लावावी. पुरुषांनी देवाची विशेष पूजा पंचामृताभिषेकासह करावी. या दिवशी स्वयंपाकात पुरणपोळी करण्याची पद्धत आहे. गुढीला प्रामुख्याने कडुलिंब आणि गूळ देवाच्या नैवेद्यासाठी जरूर ठेवावा. हा प्रसाद नंतर सर्वांनी घ्यावा. वर्षभरामध्ये येणाऱ्या सुख-दुःखाला आनंदाने अनुभवण्याची योग्यता कडूलिंब आणि गुळाच्या सेवनाने साध्य होते.
Gudi Padwa 2025 Information In Marathi गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नववर्ष सुरू होते. हे वर्ष सुरू होण्याआधीच बाजारात नवीन वर्षाचे पंचांग उपलब्ध होते. या दिवशी पंचांग घेण्याचे विशेष महत्त्व आहे. पूर्वी घरोघरी दिनदर्शिका नव्हती त्यामुळे तिथी काय, नक्षत्र, मुहूर्त हे सर्व काही पंचांगावरून कळत असे. पूर्वी पंचांगावरून महिना कधी बदलणार आहे, सण उत्सव कधी येणार आहेत, ग्रहण कधी आहे, अधिक मास आहे का, त्याचबरोबर सर्व सणावारांची माहिती पंचांगांमध्ये दिलेली असते.
गुढी कशी उभारावी
Gudi Padwa 2025 In Marathi
Gudi Padwa 2025 महाराष्ट्रात गुढीपाडवा या सणाला सणाला खूप महत्त्व आहे. इंद्रध्वजारोहण असेही या सणाला नाव आहे. सामान्यपणे माणसांच्या उंची एवढी काठी घेऊन टोकावर तांब्या उपडा घालून त्यावर एक खण, फुल, आंब्याची पानं, साखरेची माळ म्हणजेच गाठी, कडूलिंबाचा पाला, सुंदर कोरी साडी नेसून सजवून घराच्या पुढील भागी सर्वांना दिसेल अशी उभे करून पूजा करतात. देवाला विशेष अलंकार घालून दीपोत्सव करतात. सूर्योदयापूर्वी गुढी उभारून सूर्यास्ताच्या आत गुढी उतरवावी.
तारीख आणि मुहूर्त
Gudi Padwa 2025 Date And Time
Gudi Padwa 2025 Muhurta हिंदू पंचांगानुसार प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण 30 मार्च रोजी साजरा केला जाईल. दृकपंचांगानुसार, प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4 वाजून 27 मिनिटांनी सुरू होईल आणि 30 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 49 मिनिटांनी संपेल.
गुढीपाडव्याची कथा
Gudi Padwa Story
Gudi Padwa 2025 गुढीपाडव्या बद्दल अनेक पौराणिक कथा आहेत. हिंदू धर्मांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुरानात असे म्हटले आहे की, एका नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व लोक मृत्यूमुखी पडले आणि संपूर्ण काळ हा थांबला गेला होता. तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने जगाची पुनर्निर्मिती केली. या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रयत्नांनी काळ पुन्हा सुरू झाला आणि न्याय आणि सत्याचे युग सुरू झाले. या कारणामुळे या दिवशी भगवान ब्रह्मदेवाची पूजा केली जाते आणि गुढी उभारली जाते.
दुसरी कथा म्हणजे 14 वर्षांचा वनवास संपवून भगवान राम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येला परतले. हा दिवस भगवान रामाचा रावणावर विजय साजरा करतो. म्हणून रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर आयोजित विजय ध्वज म्हणून गुढी उभारली होती आणि हा सण साजरा केला होता.
तर ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव केला आणि राज्यातील लोकांना मुघल राजवटीतून मुक्त केले. महाराष्ट्रातील लोक या दिवशी गुढी उभारण्याचे हे प्रमुख कारण आहे असे म्हटले जाते की, घरांच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टींना प्रवेश करण्यापासून रोखतो म्हणून हा सण साजरा केला जातो.
गुढीपाडव्याचे महत्त्व
Importance Gudi Padwa 2025
- गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते.
- आयुष्यात सुख समृद्धी येते.
- गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो जसे की रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण करतो.
- हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणून देखील ओळखला जातो.