Har Ghar Har Grihni Yojana 2025 Information In Marathi : हर घर हर गृहिणी योजना 2025 संपूर्ण मराठी माहिती
Har Ghar Har Grihni Yojana हर घर हर गृहिणी योजना लॉन्च करताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी म्हणाल्या की अंतोदय कुटुंबांना परवडणाऱ्या दरात एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून देण्याची ही एक मोठी कल्याणकारी योजना आहे.
Har Ghar Har Grihni Yojana 2025 या योजनेअंतर्गत राज्य सरकार घरगुती गॅस सिलेंडर अत्यंत सवलतीच्या दरात म्हणजेच केवळ 500 रुपयात उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करत आहे. या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे आवश्यक संसाधने अधिक परवडणारी म्हणून आर्थिक दृष्ट्या वंचित कुटुंबांना आधार देणे.
Har Ghar Har Grihni Yojana हर घर हर गृहिणी योजना नावाची योजना हरियाणा राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी म्हणाल्या की अंतोदय कुटुंबांना परवडणाऱ्या दरात एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Har Ghar Har Grihni Yojana सरकार आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबीयांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देऊन मदत करणार आहे. याचा फायदा हरियाणातील 50 लाख बीपीएल कुटुंबांना होणार आहे. हरियाणा सरकारने हर घर हर गृहिणी योजनेसाठी एक ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून अंतोदय कुटुंबांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आता करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री सैनी यांनी सांगितले. 500 रुपये पेक्षा अधिक रक्कम लाभार्थीच्या खात्यात मासिक डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
हर घर हर गृहिणी योजना 2025 संपूर्ण मराठी माहिती
Har Ghar Har Grihni Yojana 2025 Information In Marathi
हर घर हर ग्रहणी योजनेचे उद्देश
Har Ghar Har Grihni Yojana Purpose
कोणते परिवार या योजनेसाठी पात्र
Har Ghar Har Grihni Yojana 2025 Eligibility
हर घर हर गृहिणी योजनेचा लाभ
Har Ghar Har Grihni Yojana Benefits
हर घर हर गृहिणी योजनेसाठीची पात्रता
Har Ghar Har Grihni Yojana Eligibility
हर घर हर गृहिणी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Har Ghar Har Grihni Yojana Documents
हर घर हर गृहिणी योजनेची अर्ज प्रक्रिया
Har Ghar Har Grihni Yojana Online Apply
अर्जाची स्थिती कशी पहावी
Har Ghar Har Grihni Yojana 2025 In Marathi

हर घर हर ग्रहणी योजनेचे उद्देश
Har Ghar Har Grihni Yojana Purpose
हर घर हर ग्रहणी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे हरियाणा राज्यातील महिलांना सबसिडीवर एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून देणे आहे.
याव्यतिरिक्त हरियाणा सरकारचा मुख्य उद्देश गरीब कुटुंब आणि राशन कार्ड धारकांना गॅस सिलेंडर कनेक्शन देणे हा आहे. जे आजही स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करतात या योजनेमागील सरकारचे लक्ष आहे की महिलांना लाकूड, कोळसा, चूल यापासून त्यांना मुक्ती देणे आहे.
वातावरण प्रदूषण मुक्त करणे आहे.
कोणते परिवार या योजनेसाठी पात्र
Har Ghar Har Grihni Yojana 2025 Eligibility
Har Ghar Har Grihni Yojana 2025 हर घर हर ग्रहणी योजनेसाठी असे सर्व कुटुंब पात्र आहेत ज्यांचे फॅमिली आयडी म्हणजेच हरियाणा परिवार ओळखपत्र मध्ये वार्षिक उत्पन्न 1.80 लाख पेक्षा कमी आहे आणि त्यांचे बीपीएल राशन कार्ड किंवा गुलाबी रेशन कार्ड ज्याला एवाय कार्ड किंवा त्यांच्याकडे अंतोदय कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र आहे. ते सर्व कुटुंब या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हर घर हर गृहिणी योजनेचा लाभ
Har Ghar Har Grihni Yojana Benefits
हर घर हर गृहिणी योजना तिला आपण हरियाणा गॅस सिलेंडर सबसिडी योजना म्हणून ओळखतो याद्वारे तुम्हाला 500 रुपये मध्ये एलपीजी गॅस सिलेंडर देण्यात येतो.
या योजनेचा लाभ हरियाणा सरकार राज्यातील जवळपास 50 लाख कुटुंबाला देणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थीला 500 रुपये मध्ये गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.
500 रुपये पेक्षा अधिक लागणारे रक्कम फॅमिली आयडी मध्ये जो कुटुंबाचा प्रमुख असेल त्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून पाठवली जाणार आहेत.
हर घर हर गृहिणी योजनेसाठीची पात्रता
Har Ghar Har Grihni Yojana Eligibility
अर्जदार हा हरियाणा राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराकडे फॅमिली आयडी ज्याला कुटुंब ओळखपत्र म्हटले जाते ते असणे आवश्यक आहे.
फॅमिली आयडी मध्ये वार्षिक उत्पन्न 1.80 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
बीपीएल आणि राशन कार्ड धारक कुटुंबच या योजनेसाठी पात्र असतील.
हर घर हर गृहिणी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Har Ghar Har Grihni Yojana Documents
कुटुंब ओळख प्रमाणपत्र
फॅमिली आयडी
आधार कार्ड
गॅस सिलेंडर बुकची कॉफी ज्यामध्ये एलपीजी आयडी एलपीजी कस्टमर नंबर असतो
फॅमिली आयडीशी जोडलेला मोबाईल नंबर
बँक खाते पासबुकची झेरॉक्स असे बँक खाते जे फॅमिली आयडीसी जोडलेले असावे
हर घर हर गृहिणी योजनेची अर्ज प्रक्रिया
Har Ghar Har Grihni Yojana Online Apply
हर घर हर गृहिणी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली पद्धतीचा अवलंब करावा लागेल याद्वारे तुम्ही कुठल्याही चुकी विना आपला अर्ज जमा करू शकता.
सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर हर घर हर ग्रहणी स्कीम यावर क्लिक करावे लागेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला एस या पर्यायावर क्लिक करून आपला फॅमिली आयडी टाकावे लागेल.
फॅमिली आयडी टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो तिथे टाकावा.
त्यानंतर तुमच्या कुटुंबातील संपूर्ण मेंबरची लिस्ट तुम्हाला दिसेल यामध्ये तुम्हाला अशा व्यक्तीची नोंद करायची आहे त्याच्या नावावर एलपीजी सिलेंडर आहे.
त्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या एलपीजी सिलेंडर कंपनीची निवड करायची आहे.
ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर खाली असलेल्या सबमिट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.
अर्जाची स्थिती कशी पहावी
Har Ghar Har Grihni Yojana 2025 In Marathi
अर्जाची स्थिती पाहण्यासाठी
सर्वात पहिले तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या.
वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला मेनूमध्ये रजिस्ट्रेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तिथे तुम्ही आपला फॅमिली आयडी टाकून तुमच्या अर्जाचे स्टेटस म्हणजेच अर्जाची स्थिती तपासू शकता.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA