jivant satbara campaign from 1st april 2025 In Marathi : 1 एप्रिल पासून जिवंत सातबारा मोहीम सुरू

jivant satbara campaign from 1st april Information In Marathi : वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करता येणार

jivant satbara campaign from 1st april 2025 : महाराष्ट्र सरकारने एक नवीन मोहीम सुरू केली आहे तिचं नाव आहे jivant satbara जिवंत सातबारा. ही मोहीम महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वारस हक्क नोंदी जलद करण्यासाठी जिवंत सातबारा नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे.

jivant satbara campaign will be implemented from 1 april 2025 अनेक वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर वेळेत होत नसल्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर जमिनीच्या व्यवहारातही अनेक अडचणी निर्माण होतात. या सर्व घटनेचा विचार करून 1 एप्रिल पासून राज्यभरात व्यापक प्रमाणावर जिवंत सातबारा jivant satbara ही मोहीम राबवली जाणार जात आहे.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांची माहिती अधिकृत अभिलेखांमध्ये समाविष्ट करण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Jivant Satbara Campaign योग्य प्रतिअनुसार वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर Satbara Utara होत नसल्याने जमिनीच्या खरेदी, विक्री, शेतीविषयक कर्ज, सरकारी अनुदान, त्याचबरोबर विविध योजनांचा लाभ मिळवताना वारसदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सरकारने हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जिवंत सातबारा मोहीम हा उपक्रम हाती घेतला आहे.

या पाच योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

Jivant Satbara Campaign जमिनीच्या सातबारावर Satbara Utara मयतांचे नाव असल्याने त्यांना त्यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने अनेक अडचणी विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद, कालावधी अधिकाराभिलेखांमध्ये नोंद न झाल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

ही अडचण लक्षात घेता संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा ही मोहीम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सातबारा वरील मृत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणी प्रक्रिया करण्याची आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन सातबारा अध्यायावत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाखण्यात आला आहे.

नावाची नोंद करण्याचा कालावधी

Jivant Satbara Campaign

21 एप्रिल ते 10 मे पर्यंत तलाठ्यांनी ई-फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करून मंडळ अधिकारी 1966 च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळाधिकारी वारस फेरफार वर शिक्कामोर्तब करून सातबारा दुरुस्त करून जिवंत व्यक्तींच्या नावाची नोंद घेणार आहे.

सातबाराचे काय आहे महत्व

Importance Of Satbara Utara

सातबारा हा शेती आणि शेतकऱ्यांसाठी अगदी जवळचा आहे. तुमच्या शेतीची नोंद, मालकी, शेतीवर मिळणार कर्ज, हंगामात तुम्ही घेतले घेत असलेली पिकं, शेतीतील झाड, विहीर या सर्वांची माहिती ठेवणारा सरकारी कागद म्हणजे सातबारा आहे.

त्यामुळेच या सातबाराला शेतकऱ्यांच्या लेखी खूप महत्त्व आहे. सातबारा हा शेतकऱ्यांच्या शेतीवरील मालकी व आणि हक्काची एक प्रकारची सनद आहे. सातबारालाच प्रॉपर्टी रेकॉर्ड property record म्हणले जाते. सातबारा म्हणजे शेतीचे क्षेत्र, पीक, सीमा, शेतीचा मालक, याबरोबरच पीक कर्ज यांची माहिती देणारा सरकारी कागद आहे. थोडक्यात काय तर शेती + शेतकरी = सातबारा

जिवंत सातबारा मोहिमेतील टप्पे

  • जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 1 ते 5 एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करते. या वाचनादरम्यान न्यायप्रविष्ठ प्रकाराने सोडून गावनिहाय मृत खातेदारांची यादी तयार करण्यात येईल.
  • 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठ्यांकडे सादर करता येतील.
  • स्थानिक चौकशी करून मंडळाधिकारी वारस ठराव ई- फेरफार प्रणाली मध्ये मंजूर करतील.
  • 21 एप्रिल ते 10 मे या कालावधीत तलाठी यांनी ही फेरफार प्रणाली मध्ये मृत खातेदारांऐवजी वारसाचे नाव नोंदविले जाईल.
  • मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करण्यात येईल. मृत व्यक्तीच्या ऐवजी वारसा व्यक्तीचे नाव सातबारावर येईल.