Upload personal photo in chatgpt is safe or not what is side effects घिबली फोटो तयार करणे सेफ आहे की नाही?
Upload personal photo in chatgpt is safe or not what is side effects प्रत्येक वेळी काही ना काही तरी सोशल मीडियावर ट्रेंड येत राहतो. सध्याचा काय ट्रेंड सुरू आहे ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. सध्याचा सर्वत्र एकच ट्रेंड सुरू आहे घिबली आर्ट. याची चांगलीच चर्चा सध्या सर्वत्र सोशल मीडियावर पसरली आहे.
Ghibli Art असंख्य लोकांनी घिबली Ghibli Style वापरत स्वतःचे AI फोटो तयार केले आहेत. तुम्ही तुमचा फोटो AI ला देता त्यानंतर घिबली आर्ट मधून तुमचा फोटो तयार होतो, परंतु तुम्ही तुमचा फोटो अपलोड करून घिबली आर्टला तयार करायला देतात त्यावेळी तो सुरक्षित आहे की नाही याची कोणी जाणीव करून घेतली आहे का?
चला तर मग आज आपण हे सुरक्षित आहे की नाही याबद्दल जाणून घेऊया.
Ghibli Art सांगायचं झालं तर घिबली आर्ट Ghibli Art प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर वापरकर्ते नकळतपणे Open AI ला वेगवेगळ्या चेहऱ्यांचा डेटा प्रधान प्रदान करत आहेत. ज्यामुळे त्यांची गोपनीयता धोक्यात येऊ शकते तुम्ही तुमचा फोटो कुठे देताय याची खात्री करून घ्या. वापरकर्त्यांना धोके येऊ शकतात समीक्षकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. वापरकर्त्यांना कोणते धोके येऊ शकतात हे आपण आज पाहणार आहोत.
वापरकर्त्यांना काय आहे धोके
- Ghibli Style वापरकर्त्यांनी एकदा त्यांचे फोटो सबमिट केले की त्या फोटोंच्या वापरातील नियंत्रण गमावले जाते.
- तर open AI चे गोपनीयता धोरण असे सांगते की वापरकर्ता इनपुट मॉडेल प्रशिक्षणासाठी वापरला जाऊ शकतो. हे भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे असं पोस्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे.
- जर तुम्ही तुमचा फोटो अपलोड करताय त्यानंतर त्यावर तुमचा अधिकार राहत नाही. तुमचा फोटो अन्य कोणत्याही कामासाठी कोणीही वापरू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घेणे खूप जरुरी आहे.
- तुम्ही अपलोड केलेल्या फोटोंचा गैरवापर करून एखाद्याची ओळख देखील चोरली जाऊ शकते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
- फोटो अपलोड केल्यामुळे तुमची खाजगी माहिती सुरक्षित राहू शकत नाही आणि तुम्ही हॅकिंग च्या बळी जाऊ शकता.
- तुमचा फोटो चुकीच्या कामासाठी उपयोग केला जाऊ शकतो जसे की खोटे प्रोफाइल बनवणे इत्यादी..
- वापरकर्त्यांच्या फोटोंचा अनधिकृत वापर कायदेशीर समस्या निर्माण करू शकतो.
अशा अनेक धोक्यांना सामोरे जावे लागेल त्यासाठी तुम्ही तुमचा फोटो शेअर करण्यापूर्वी सावधगिरी बाळगायला हवी