Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi : शेती अवजारे खरेदीसाठी 80 टक्के अनुदान; तुम्ही केलाय का अर्ज

Table of Contents

Krushi Yantrikikaran Yojana 2024 Information In Marathi : कृषी यांत्रिकीकरण योजना2024 मराठी माहिती

Krushi Yantrikikaran Yojana 2024 : केंद्र आणि राज्य सरकार मिळून देशातील शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवत असते. या योजनेचाच भाग म्हणून राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारे अवजारांच्या खरेदीसाठी 80% पर्यंत अनुदान देणारी योजना सुरू केली आहे.

Krushi Yantrikikaran Yojana या योजनेच्या माध्यमातून शेतकरी अनुदान तत्त्वावर शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. चला तर मग आपण पाहूया या योजनेसाठी अर्ज कसा करावा? या योजनेसाठी कोण पात्र आहे? याची संपूर्ण माहिती.

Krushi Yantrikikaran Yojana

Krushi Yantrikikaran Yojana भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रातील बहुतांश नागरिक शेती हा पारंपारिक व्यवसाय करतात. शेतकरी हा दारिद्र्यरेषेखालील स्वतःचे जीवन जगत असतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती ही मध्यम स्वरूपाची असल्यामुळे अनेक शेतकरी शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करण्यास असमर्थ असतात. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक शेतकरी आज सुद्धा ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता पारंपारिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे शेतीतील कामे करण्यासाठी अधिक वेळ आणि मेहनत करावी लागते, त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा समस्यांचा विचार करून राज्यातील शेती क्षेत्रात आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर वाढवा आणि शेतीची कामे गतीने व्हावीत शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे. या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजना 2024 Krushi Yantrikikaran Maharashtraसुरू करण्यात निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकरी घेऊ शकतात.

Krushi Yantrikikaran Yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करणे सोपे व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारने शेती अवजारे खरेदीसाठी 80 टक्के अनुदान देणारी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आवश्यक असणारे अवजारे खरेदी करू शकतो. त्यावर त्याला 80 टक्के पर्यंत अनुदान सरकारच्या वतीने देण्यात येत आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती चे काम करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे आहे. यामुळे शेतकऱ्याचा वेळ वाचेल आणि कमी मेहनत शेतकऱ्याला करावी लागेल तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होणार आहे.

ठळक मुद्दे

कृषी यांत्रिकीकरण योजना मराठी माहिती

Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi

कृषी यांत्रिकीकरण योजनेची थोडक्यात माहिती

Krushi Yantrikikaran Yojana In Short

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश

Purpose Of Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra

कृषी यांत्रिकीकरण योजनेची वैशिष्ट्ये

Krushi Yantrikikaran Yojana 2024 Features

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत समाविष्ट अवजारे

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत टक्केवारी अनुसार दिले जाणारे अनुदान

Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आरक्षण

Maharashtra Krishi Yantrikikaran Yojana

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध औजारांसाठी दिली जाणारी अनुदान राशी

इतर लाभार्थी यांना 40 टक्के

काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान

Subsidy For Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra In Marathi

आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत दिलेले जाणारे अनुदान

Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi

कृषी यांत्रिकीकरण योजनेचे लाभ

Krushi Yantrikikaran Yojana Benefits

कृषी यांत्रिकीकरण योजनेची पात्रता

Krushi Yantrikikaran Yojana Eligibility

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अटी आणि शर्ती

Krushi Yantrikikaran Yojana Terms And Conditions

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठीची कागदपत्रे

Krushi Yantrikikaran Yojana Documents

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याची निवड प्रक्रिया

Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi

कृषी यांत्रिक करण्यासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

Krushi Yantrikikaran Yojana Online Apply

कृषी यांत्रिकेसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

Krushi Yantrikikaran Yojana Application

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

कृषी यांत्रिकीकरण योजनेची थोडक्यात माहिती

Krushi Yantrikikaran Yojana In Short

योजनेचे नावकृषी यांत्रिकीकरण योजना
विभागमहाराष्ट्र कृषी विभाग
उद्देश कायशेती क्षेत्रात आधुनिक यंत्राचा वापर वाढवणे
लाभ कायशेतीसाठी लागणाऱ्या अवजार खरेदीसाठी 80 टक्के अनुदान
अर्ज प्रक्रियाऑफलाइन आणि ऑनलाईन
Krushi Yantrikikaran Yojana

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश

Purpose Of Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra

  • शेतीसाठी लागणारे आधुनिक यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा मुख्य उद्देश कृषी यांत्रिकीकरण योजनेचा आहे.
  • शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे.
  • कृषी यांत्रिकीकरणाला Krushi Yantrikikaran Yojana Maharashtraया योजनेच्या माध्यमातून प्राधान्य देणे.
  • आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीची कामे जलद करणे जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि शेतीची कामे वेळेवर होती.
  • आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी मदत करणे. यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
  • शेतकऱ्यांना अवजारे खरेदी करण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदीसाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये आणि कोणाकडून पैसे उधार घ्यावे लागू नयेत यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना काम करत आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेची वैशिष्ट्ये

Krushi Yantrikikaran Yojana 2024 Features

  • Krushi Yantrikikaran Yojana Maharashtraया योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
  • शेतकरी या योजनेच्या माध्यमातून अवजारे खरेदी करून शेतीची कामे कमी वेळात करू शकतील यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
  • Krushi Yantrikikaran Yojana Maharashtraया योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी अनुदान रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या मदतीने जमा केली जाईल.
  • महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठीचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवली आहे जेणेकरून शेतकऱ्याला कुठल्या अडचणीचा सामना करावा लागू नये.
  • महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • महाराष्ट्र सरकारची कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत एक योजना आहे या मध्ये केंद्र सरकारचा 60% सहभाग तर राज्य सरकारचा 40% सहभाग आहे.
  • Krushi Yojana या योजनेच्या माध्यमातून अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहीत धरण्यात येत नाही.
  • शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात त्यामुळे शेतकऱ्याला घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने अर्ज करता येतो. अर्ज करायला मोबाईलवर करता येत असल्यामुळे शेतकऱ्याला कुठल्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडत नाही त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा या दोघांचीही बचत होती.
  • अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मीळेपर्यंत अर्जाची स्थिती एसएमएसच्या माध्यमातून प्राप्त करू शकतात.
  • शेतकऱ्याची कामे तंत्रज्ञानाच्या आधारे जलद गतीने व्हावी हा सरकारचा ही योजना सुरू करण्यामागील उद्देश आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत समाविष्ट अवजारे

Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra

ट्रॅक्टर, पॉवर टीलर

  1. स्वयंचलित औजारे :  रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)
  2. ट्रॅक्टर चलीत औजारे : रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र,
  3. मळणी यंत्र (थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर,
  4. काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे : मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत टक्केवारी अनुसार दिले जाणारे अनुदान

Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi

अल्प व अत्यल्प भुधारक, अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकरी50 टक्के अनुदान
इतर शेतकरी40 टक्के अनुदान
मात्र राईस मिल, दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्वरायजर/पॉलीशरच्या बाबतीत अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा60 टक्के अनुदान
इतर लाभार्थी50 टक्के अनुदान
शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी60 टक्के अनुदान (24 लाख रु. पर्यंत अनुदान)

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आरक्षण

Maharashtra Krishi Yantrikikaran Yojana

महिलांसाठी : 30 टक्के निधी

दिव्यांग व्यक्तीसाठी : 3 टक्के निधी

जर महिला व दिव्यांगांसाठी अर्ज आले नाहीत तर सदर निधी इतर शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येईल

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध औजारांसाठी दिली जाणारी अनुदान राशी

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)

ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी)1.25 लाख रुपये  
पॉवर टिलर    बीएचपी पेक्षा कमी    65,000/- रुपये  
बीएचपी व त्यापेक्षा जास्त85,000/- रुपये
स्वयंचलित अवजारे रिपर कम बाइन्डर (3 व्हील)1,75,000/- रुपये  
रिपर कम बाइन्डर (4 व्हील)2,50000/- रुपये
रीपर75,000/- रुपये
पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड)25,000/- रुपये  
पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड)35,000/- रुपये
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड)63,000/- रुपये  
ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे  
रोटाव्हेटर 5 फुट42,000/- रुपये
रोटाव्हेटर 6 फुट44,800/- रुपये
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)1 लाख रुपये  
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)2.50 लाख रुपये  
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त)20,000/- रुपये  
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)35,000/- रुपये  
कल्टीव्हेटर50,000/- रुपये
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम70,000/- रुपये
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम89,500/- रुपये
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम4,000/- रुपये
नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम50,000/- रुपये
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)1.25 लाख रुपये  
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर75,000/- रुपये  
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर1 लाख रुपये  
Manually operated chaff cutter (above 3 feet)6,300/- रुपये  
Manually operated chaff cutter (upto 3 feet)5000/- रुपये
Krushi Yantrikikaran Yojana

इतर लाभार्थी यांना 40 टक्के

ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी)1 लाख रुपये
पॉवर टिलर    8 बीएच पी पेक्षा कमी50,000/- रुपये
8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त70,000/- रुपये
स्वयंचलित अवजारे 
रिपर कम बाइन्डर (3 व्हील)1.40 लाख रुपये  
रिपर कम बाइन्डर (4 व्हील)2 लाख रुपये
रीपर60,000/- रुपये  
पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड)20,000/- रुपये  
पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड)30,000/- रुपये  
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड)50,000/- रुपये  
ट्रॅक्टर (35 बीएचपी पेक्षा जास्त) चलितअवजारे   
रोटाव्हेटर 5 फुट34,000/- रुपये
रोटाव्हेटर 6 फुट35,800/- रुपये
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)80,000/- रुपये  
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)2 लाख रुपये  
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त)16,000/- रुपये
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)30,000/- रुपये
कल्टीव्हेटर40,000/- रुपये  
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम 56,000/- रुपये  
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम71,600/- रुपये
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम32,000/- रुपये
पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम40,000/- रुपये
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर 1 लाख रुपये
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर60,000/- रुपये
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर80,000/- रुपये
Manually Operated Chaff Cutter (Above 3 Feet)40 टक्के 5000/- रुपये  
Manually Operated Chaff Cutter (Upto 3 Feet)40 टक्के 4000/- रुपये

काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान

Subsidy For Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra In Marathi

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा

मिनी दाल मिल60 टक्के 1.5 लाख रुपये
मिनी राईस मिल60 टक्के 2.4 लाख रुपये
पैकिंग मशीन60 टक्के 3 लाख रुपये
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर      60 टक्के 60,000/- लाख रुपये
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर50 टक्के 1 लाख रुपये
इतर लाभार्थी    
मिनी दाल मिल50 टक्के 1.25 लाख रुपये
मिनी राईस मिल50 टक्के 2 लाख रुपये
पैकिंग मशीन50 टक्के 2.40 लाख रुपये
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर50 टक्के 50,000/- रुपये
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर40 टक्के 80000/- रुपये

आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत दिलेले जाणारे अनुदान

Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती अवजारे खरेदी करण्यासाठी 80 टक्के अनुदान देण्यात येते. याद्वारे शेतकरी शेतीसाठी लागणारे सर्व अवजारे खरेदी करू शकतात.

कृषी यांत्रिकीकरण योजनेचे लाभ

Krushi Yantrikikaran Yojana Benefits

  • महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती अवजारे खरेदीसाठी आर्थिक मदत करण्यात येते.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
  • शेतकऱ्यांना शेती उपकरणे साहित्य खरेदीसाठी आर्थिक दृष्ट्या कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये आणि या योजनेमुळे त्यांना सहज सहज उपकरणे खरेदी करता येतील.
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
  • शेतकऱ्यांना शेती क्षेत्राशी संबंधित आधुनिक अवजारे खरेदीसाठी सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे.
  • Krushi Yantrikikaran Yojana Maharashtraया योजनेच्या माध्यमातून विविध जबाबदारी खरेदीसाठी अनुदान मिळवून दिले जाते.
  • आधुनिक अवजारे खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येतात त्यामुळे शेतीच्या उत्पन्न वाढीस मदत होईल

कृषी यांत्रिकीकरण योजनेची पात्रता

Krushi Yantrikikaran Yojana Eligibility

अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे तरच या योजनेचा त्याला लाभ दिला जातो.

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अटी आणि शर्ती

Krushi Yantrikikaran Yojana Terms And Conditions

  • केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो महाराष्ट्र बाहेरील व्यक्तीचा अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे म्हणजे त्याच्याकडे शेती असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील असल्यास त्याच्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेली शेतीची अवजारे शेतकऱ्याला किमान 6 वर्ष हस्तांतर पुनर्विक्री किंवा गहाण ठेवता येणार नाहीत.
  • कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8अ असणे गरजेचे आहे.
  • अर्जदारास ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजारे यापैकी केवळ एकाच गोष्टीसाठी अनुदान देण्यात येईल.
  • संबंधित अवजाराच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने ट्रॅक्टरचा लाभ मिळवला असेल तर ट्रॅक्टरचलित आजारासाठी लाभ मिळण्यास अर्जदार पात्र असेल मात्र त्याला ट्रॅक्टर असल्याचा पुरावा अर्जासोबत जोडावा लागेल.
  • एखाद्या शेतकऱ्याने कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून अवजार खरेदीचा लाभ घेतला असेल तर पुढील 10 वर्ष त्याला या योजनेचा लाभ पुन्हा घेता येणार नाही. मात्र दुसऱ्या अवजारासाठी तो शेतकरी अर्ज करू शकतो आणि योजनेचा लाभ घेऊ शकतो.

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठीची कागदपत्रे

Krushi Yantrikikaran Yojana Documents

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

रेशन कार्ड

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

जातीचे प्रमाणपत्र

जमिनीचा 7/12 आणि 8 अ

बँक खाते पासबुक

यंत्र किंवा अवजाराचे कोटेशन

परीक्षण अहवाल प्रमाणपत्र

प्रतिज्ञापत्र

पासपोर्ट साईज फोटो

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याची निवड प्रक्रिया

Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi

या योजनेसाठी जमा झाले अर्जाची व कागदपत्राची ऑनलाईन छाननी करण्यात येते. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना संमती आदेश ऑनलाईन दिला जातो. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एक एसएमएसही पाठवला जातो.

जर शेतकऱ्याला पूर्वसंमती आदेश पाहायचा असेल तर तो महाडीबीटीच्या पोर्टल वर जाऊन लॉगिन करून पाहू शकतो. अर्ज करूनही ज्या शेतकऱ्यांची निवड झाली नाही मात्र प्रतीक्षा यादीत त्यांचे नाव आहे असे लाभार्थी पुढील वर्षी त्याच अवजारांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असल्यास त्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन मागील वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा लागेल त्यानंतर त्यांना या योजनेच्या माध्यमातून पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही पूर्वीचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.

Krushi Yantrikikaran Yojana

कृषी यांत्रिक करण्यासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

Krushi Yantrikikaran Yojana Online Apply

अर्ज करण्यासाठी प्रथम अर्जदाराला कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्यावर कृषी विभागात कृषी यांत्रिकीकरण योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज उघडेल त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचून भरावी.

त्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.

संपूर्ण माहिती भरून झाल्यावर एकदा अर्ज तपासून पहावा माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर सेव या बटनावर क्लिक करावे.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

कृषी यांत्रिकेसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

Krushi Yantrikikaran Yojana Application

शेतकऱ्यांना सर्वात प्रथम जिल्ह्याच्या कृषी विभागात जाऊन कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. त्यानंतर अर्ज विचारलेली संपूर्ण माहिती भरून त्याच्यासोबत लागणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर त्याच कार्यालयात तुम्ही भरून दिला अर्ज जमा करावा लागेल. अशा सोप्या पद्धतीने या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करता येतो.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळते?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून 80 टक्के अनुदान शेतीचे अवजारे खरेदी करण्यासाठी दिले जाते.

प्रश्न: कृषी यांत्रिकी योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा?

उत्तर: कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आणि संबंधित जिल्हा कृषी विभागात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

प्रश्न: कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ काय?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते.

प्रश्न: कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश काय?

उत्तर: राज्यातील कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढवून शेतीतील कामे जलद गतीने आणि वेळेवर पूर्ण करणे हा आहे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA