Ladka Shetkari Abhiyan 2024 : लाडका शेतकरी अभियान 2024

Ladka Shetkari Abhiyan 2024 In Marathi : लाडका शेतकरी अभियान 2024

Ladka Shetkari Abhiyan 2024 : महाराष्ट्र सरकारने राज्यांमध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवत लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करण्यात आले. तसेच सोयाबीन व कापसाला हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यात येईल. ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली. त्यामुळे आता ज्यांनी ई-पीक पाहणी केली नव्हती अशाही शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम मिळणार आहे. लाडका शेतकरी अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या कृषि विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

Ladka Shetkari Abhiyan

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana in Marathi : यावेळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते रिमोट द्वारे नमो शेतकरी महासंन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात आला. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5000 रुपये अनुदान वितरित करण्यासाठी वेब पोर्टलही सुरू करण्यात आले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

Ladka Shetkari Abhiyan राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला. गतवर्षी सोयाबीन, कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी आवश्यक ई-पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आता ई-पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Ladka Shetkari Abhiyan मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच लाडक्या भावांना विद्यावेतन देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. आता याच धर्तीवर विविध लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. याची सुरुवात आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Ladka Shetkari Abhiyana शेतकऱ्यांना केवळ १ रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच शासनाचे धोरण असून राज्यातील कांदा, सोयाबीन, कापूस आणि दुधाला योग्य मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच कृषि क्षेत्रातील नवीन बदलांची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी, आधुनिक शेतीला चालना मिळून राज्यातील कृषि क्षेत्राचा विकास होण्यासाठी कृषि महोत्सव उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ladka Shetkari Abhiyan

Ladka Shetkari Abhiyan 2024 केवळ १ रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देणारे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे कृषिमंत्री चौहान म्हणाले.