Devdasi Kalyan Yojana 2024 Information In Marathi : देवदासी कल्याण योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती
Devdasi Kalyan Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने देवदासींच्या कल्याणासाठी देवदासी कल्याण योजना सुरू केली आहे. देवदासी कल्याण योजनेअंतर्गत ज्या देवदासी महिला आहेत किंवा त्यांच्या मुली आहेत त्यांना सरकार मार्फत आर्थिक मदत केली जाते.

Devdasi Kalyan Yojana 2024 या देवदासीच्या मुलींची पदवी झालेली नसेल तर अशा मुलींना लग्नासाठी 25 हजार रुपये आर्थिक मदत या योजनेअंतर्गत केली जाते जर मुलगी पदवीधर असेल तर त्यांच्या लग्नासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
Devdasi Kalyan Yojana 2024 या योजनेअंतर्गत मुली आर्थिक दृष्ट्या सक्षम होतात व अशा मुलींना कुणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. देवदासी कल्याण योजना ही महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना आहे.
Devdasi Kalyan Yojana या योजनेद्वारे मिळणारी आर्थिक मदत ही अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे. देवदासींसाठी विविध योजना सरकार राबवत असते.
Devdasi Kalyan Yojana त्यामुळे मुलींचे शिक्षण चालू असेल तर त्यांना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत दरवर्षी 1600 रुपये व मुलींना 1750 रुपये आर्थिक मदत या योजनेअंतर्गत केली जाते. जेणेकरून विद्यार्थी आपल्या वर्षाचा खर्च भागवू शकतील व पुस्तके, शाळेचा गणवेश या सर्व गोष्टींना हातभार लागेल.
Devdasi Kalyan Yojana 2024 In Marathi देवदासी कल्याण योजना बद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहून पाहणार आहोत. देवदासी कल्याण योजनेची काय आहे पात्रता?, या योजनेचे काय आहेत फायदे?, या योजनेसाठी कसा करावा लागेल ऑनलाईन अर्ज? याची सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पाहू.
ठळक मुद्दे
देवदासी कल्याण योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती
Devdasi Kalyan Yojana 2024 Information In Marathi
देवदासी कल्याण योजनेची थोडक्यात माहिती
Devdasi Kalyan Yojana 2024 In Short
देवदासी कल्याण योजनेची वैशिष्ट्ये
Devdasi Kalyan Yojana 2024 Features
देवदासी कल्याण योजनेची उद्दिष्ट्ये
Devdasi Kalyan Yojana 2024 Purpose
देवदासी कल्याण योजनेचे लाभार्थी
Devdasi Kalyan Yojana 2024 Benefisiors
देवदासी कल्याण योजनेचे लाभ
Devdasi Kalyan Yojana 2024 Benefits
देवदासी कल्याण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत
Devdasi Kalyan Yojana 2024 In Marathi
देवदासी कल्याण योजनेची पात्रता
Devdasi Kalyan Yojana 2024 Eligibility
देवदासी कल्याण योजनेचे नियम व अटी
Devdasi Kalyan Yojana 2024 Terms And Conditions
देवदासी कल्याण योजनेची आवश्यक कागदपत्रे
Devdasi Kalyan Yojana 2024 Documents
देवदासी कल्याण योजनेचे अर्ज प्रक्रिया
Devdasi Kalyan Yojana 2024 Apply
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
देवदासी कल्याण योजनेची थोडक्यात माहिती
Devdasi Kalyan Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | देवदासी कल्याण योजना |
कोणी सुरू केली | राज्य सरकार |
विभाग | महिला व बालविकास विभाग |
लाभार्थी | देशातील देवदासी महिला |
लाभ | 50 हजाराची आर्थिक मदत |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |

देवदासी कल्याण योजनेची वैशिष्ट्ये
Devdasi Kalyan Yojana 2024 Features
- देवदासीला व त्यांच्या मुलींना एक चांगले जीवन देण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत केला जातो.
- राज्यातील देवदासी व त्यांच्या मुलींचे जीवनमान सुधारले.
- राज्यातील देवदासी व त्यांच्या मुली आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनते.
- त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- महिला व त्यांच्या मुली सशक्त व निर्भर बनतील.
देवदासी कल्याण योजनेची उद्दिष्ट्ये
Devdasi Kalyan Yojana 2024 Purpose
- महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही योजना राबवण्यात येते.
- देवदासी कल्याण योजने अंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते.
- देवदासी कल्याण योजनेचे अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवण्यात आली आहे त्यामुळे कुठल्याही अडचणींचा सामना या योजनेचा अर्ज करण्यासाठी करावा लागणार नाही.
देवदासी कल्याण योजनेचे लाभार्थी
Devdasi Kalyan Yojana 2024 Benefisiors
देवदासी कल्याण योजनेचा लाभ हा देवदास व त्यांच्या मुली देवदासी या योजनेसाठी पात्र आहेत.
देवदासी कल्याण योजनेचे लाभ
Devdasi Kalyan Yojana 2024 Benefits
निर्वाह अनुदान:- देवदासींना दर महिन्याला निर्वाह खर्चासाठी 6000 रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.
विवाह अनुदान:- देवदासीच्या मुलींना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी 50 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.
शिक्षण अनुदान:- या मुलांना शिक्षणासाठी 10 हजार रुपये प्रति वर्ष अनुदान दिले जाते.
वस्तीगृह सुविधा:- देवदासीच्या मुलींसाठी वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
स्वयंरोजगार प्रशिक्षण:- देवदासींना स्वयंरोजगार मिळवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
घरकुल योजना:- देवदासींना घर बांधण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.
देवदासी कल्याण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत
Devdasi Kalyan Yojana 2024 In Marathi
देवदासींच्या मुलींना त्यांच्या लग्नासाठी विवाह सोहळ्याच्या खर्चा करिता मुलगी पदवीधर नसेल तर 25 हजार रुपये आणि जर मुलगी पदवीधर असेल तर 50 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते.
देवदासी कल्याण योजनेची पात्रता
Devdasi Kalyan Yojana 2024 Eligibility
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
देवदासी कल्याण योजनेचे नियम व अटी
Devdasi Kalyan Yojana 2024 Terms And Conditions
- देवदासी कल्याण योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील देवदासी तसेच त्यांच्या मुलींना घेता येईल.
- अर्जदार देवदासी १९९६ पूर्वीचे मान्यता प्राप्त देवदासी असावी.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील देवदासी तसेच त्यांच्या मुलींना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
- देवदासीचे महाराष्ट्रात 10 वर्षांचे वास्तव्य असावे.
- देवदासी किंवा तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने वेळोवेळी ठरवून दिलेल्या आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबाच्या मर्यादेत असावे.
- देवदासी किंवा तिच्या मुलीचे वय विवाहासाठी 18 वर्षे पूर्ण तर वराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्र सहित विवाहपूर्वी किंवा विवाह नंतर 90 दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
देवदासी कल्याण योजनेची आवश्यक कागदपत्रे
Devdasi Kalyan Yojana 2024 Documents
- विहित नमुन्यातील अर्ज
- देवदासी असल्याबाबतचा दाखला
- वधूचा वयाचा दाखला
- वरचा वयाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र
- प्रथम विवाह असल्याचे हमीपत्र
- पदवीधर असल्यास पदवी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- जातीचे प्रमाणपत्र

देवदासी कल्याण योजनेचे अर्ज प्रक्रिया
Devdasi Kalyan Yojana 2024 Apply
- देवदासी कल्याण योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल
- यासाठी आपल्या जवळील क्षेत्रात जिल्हा कार्यालयात जावे लागेल
- तेथील महिला व बालकल्याण विकास विभागाकडे जाऊन देवदासी कल्याण योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
- अर्जात विचारलेले संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील
- जर हा अर्ज देवदासी विवाहपूर्वी केलेला असेल तर लगेच विवाहप्रसंगी 25 हजार रुपये दिले जातात जर वधु पदवीधर असेल तर 50 हजार रुपयांचा धनादेश दिला जातो
- हा अर्ज विवाहानंतर आलेला असेल तर अर्जाला मंजुरी देऊन ही रक्कम त्या अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही देवदासी कल्याण योजनेचा लाभ घेऊ शकता
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न:- देवदासी कल्याण योजनेचा अर्ज कसा करावा?
उत्तर:- देवदासी कल्याण योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
प्रश्न:- देवदासी कल्याण योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
उत्तर:- देवदासी कल्याण योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्यात आलेली आहे.
प्रश्न:- देवदासी कल्याण योजनेचे लाभार्थी कोण?
उत्तर:- राज्यातील देवदासी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रश्न:- देवदासी कल्याण योजनेअंतर्गत कसा मिळतो लाभ?
उत्तर:- देवदासी विवाह करू इच्छित असेल तर तिचे शिक्षण पदवी झालेली असेल तर विवाहप्रसंगी 50 हजार रुपये धनादेश दिला जातो व जर पदवी झालेली नसेल तर 25 हजार रुपये सरकारमार्फत केली जाते.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
कन्या वन समृद्धी योजना महाराष्ट्र
महाराष्ट्र सरकारचे निर्णय 2024
डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना