Ladki Bahin Yojana July installment of ₹1,500 credited : लाडक्या बहिणीचा जुलै महिन्याचा ₹1500 हप्ता जमा

Ladki Bahin Yojana July installment : तुमच्या खात्यात पैसे आले का?

गेल्या अनेक दिवसापासून जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करत होत्या. आता ही प्रतीक्षा संपली आहे. मंगळवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

अनेक महिन्यांच्या खात्यामध्ये काल आणि आज लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झाला आहे तर अनेक बहिणीच्या खात्यात अजून हत्या जमा झालेली नाही पण त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये त्यांच्याही खात्यामध्ये लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत.

लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आली समोर आली आहे. त्यांना रक्षाबंधनाचे गिफ्ट सरकारकडून मिळाले आहे. रक्षाबंधनापूर्वीच राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले आहेत. यामुळे त्यांना रक्षाबंधनाचे गिफ्ट रक्षाबंधनापूर्वीच मिळाले आहे.

यासाठी राज्य सरकारने 344.74 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविभागाकडे वर्ग केला होता. त्यातून जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता अजून जमा झाला नाही त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता आला होता, त्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा ही हप्ता जमा होणार आहे.

1 कोटी 65 लाख लाडक्या बहिणींना लाभ

लाडक्या बहिणींची पडताळणी झाल्यानंतर 1 कोटी 65 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणीचा जुलै महिन्याचा हप्ता जमा होतो आहे. मात्र या व्यतिरिक्त ज्या अपात्र महिला ठरल्या आहेत त्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही. यामध्ये अनेक महिलांनी ई- केवायसी केलेली नाही, कोणाचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे.

त्यामुळे त्यांचा लाडक्या बहिणीतून नाव रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे. पण एक कोटी 65 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वीच जुलै महिन्याचे दीड हजार रुपये जमा होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. ज्यांच्या खात्यामध्ये अजून रक्कम आली नाही त्यांच्याही खात्यात आज आणि उद्या ती रक्कम जमा होणार आहे  त्यामुळे त्यांचे रक्षाबंधन गोड होणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेच्या निधीसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाच्या तरतुदीवर अवलंबून राहावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वीही या दोन विभागाचा हजारो कोटीचा निधी या योजनेसाठी वर्ग केल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत.

यापूर्वी फेब्रुवारी 2026 जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. ऑगस्ट ते आक्टोंबर 2025 जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्यासाठी प्रत्येकी 410 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. तसेच जून 2025 मध्ये ही एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्यासाठी 410 कोटी रुपये या विभागातून वर्ग करण्यात आले होते.

राज्य सरकारने वारंवार हा निधी वळवल्यामुळे सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या इतर कल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणीवर आणि अर्थसंकल्पीय बजेटवर याचा परिणाम जाणू लागल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे इथून पुढे तरी राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी वेगळी तरतूद करावी अशी मागणी प्रशासकीय स्तरावर होत आहे जेणेकरून इतर योजनांवर त्याचा परिणाम होणार नाही.