Ladki bahin yojana news update 2025 In Marathi : अधिवेशनात आदिती तटकरे काय म्हणाल्या
Ladki bahin yojana news update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना सुरू होऊन 8 महिने लोटले आहेत. आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होत आहे.
Ladki bahin yojana news update निवडणुकीपूर्वी सांगण्यात आले होते की, 1500 रुपयांवरून 2100 रुपये हप्ता करण्यात येणार आहे. निवडणूक होऊन अनेक महिने लोटले आहेत, परंतु अजूनही 2100 रुपये देण्याचा कुठेही नामोनिशान दिसत नाही.
Ladki bahin yojana news update लाडक्या बहिणींना आशा लागली आहे की 2100 रुपये कधी मिळणार आहेत? यावर आदिती तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात भाषण केले त्यावेळी त्या काय म्हणाल्या हे आपण आज पाहू. राज्यात पुन्हा सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मार्च महिन्यात 2100 रुपये मिळतील अशी घोषणाच आम्ही केली नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
Ladki bahin yojana यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेद्वारे 2100 रुपये देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या. अधिवेशनात आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. येत्या अर्थसंकल्पात किंवा अधिवेशनाच्या काळात 2100 रुपये देऊ असं कोणतेही व्यक्तव्य आम्ही केलेले नव्हते.
Ladki bahin yojana सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो आम्ही महिलांना 100 टक्के 2100 रुपये देणार आहोत परंतु या अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात एक विभाग म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव सरकार जवळ ठेवला आहे. अशी माहिती आदिती तटकरे यांनी भाषण करताना दिली.
Mukhyamantri Ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिल्या महिन्यात पावणेदोन कोटी महिलांना लाभ मिळाला. तर निवडणुकीनंतर 2 कोटी 45 लाख महिलांना लाभ मिळाला. आता 2 कोटी 52 लाख महिलांना लाभ देणार आहोत असे आदिती तटकरे म्हणाल्या.