Madhmashi Kendra Yojana 2024 In Marathi : मधुमक्षिका पालन करण्यासाठी 5 लाखाची कर्ज योजना

Madhmashi Kendra Yojana 2024 Information In Marathi : मधुमक्षिका पालन योजना 2024 मराठी माहिती

Madhmashi Kendra Yojana 2024 केंद्र आणि राज्य सरकार मिळून देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. यातील बहुतांश योजना आजही सुरू आहेत अशाच काही योजना च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत कर्जाच्या रुपात दिली जाते. आता केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अशीच एक योजना सुरू केली आहे मधुमक्षिका पालन योजना 2024 असे या योजनेला नाव देण्यात आले आहे.

Madhmashi Kendra Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून शेतकरी मधुमक्षिका पालन करून आपले उत्पन्न वाढवू शकतात. आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून 500 कोटी रुपयाचे कर्ज वाटपाचे लक्ष सरकारने ठेवले आहे. केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात 50 मधमाशांचे केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास विभागाकडून 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Madhmashi Kendra Yojana

Madhumakshika Palan Yojana चला तर मग आज आपण या लेखाच्या माध्यमातून मधुमक्षिका पालन योजनेची संपूर्ण माहिती पाहू. मधुमक्षिका पालन योजना नक्की काय आहे?, या योजनेचे फायदे काय?, या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड प्रक्रिया कशी आहे?, या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आदि माहिती आपण पाहू

Madhmashi Kendra Yojana 2024 आज देशात मध आणि मेणाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे याची बाजारपेठ ही मोठी आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात मधुमक्षिका पालन करून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवु शकतात. केंद्र सरकारने सुरू केलेल्या मधुमक्षिका पालन योजना 2024 च्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःचा मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

Madhmashi Kendra Yojana हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्याला व्यवसाय खर्चाच्या केवळ 10 टक्के रक्कम गुंतवून आपला व्यवसाय सुरू करता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेसाठी कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची आवश्यकता पडत नाही. मधुमक्षिका पालन योजनेतून Madhumakshika Palan Yojana शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवून देशातील वाढती मधाची मागणी पूर्ण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Madhmashi Kendra Yojana 2024 देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून सरकारने मधुमक्षिका पालन योजना 2024 सुरू केलेली आहे. देशातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने देशभरात विविध योजना राबवत आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना, शेळी पालन योजना, मत्स्य पालन योजना आदी योजना राबवल्या जातात.

Madhmashi Kendra Yojana देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मधुमक्षिका पालन योजना सुरू केली आहे. या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून 500 कोटी रुपयाचे कर्ज वाटपाचे लक्ष सरकारने ठेवले आहे. केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात 50 मधमाशांचे केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास विभागाकडून 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Madhmashi Kendra Yojana सध्या देशातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. याबरोबरच शेती सोबत मधुमक्षिका पालन हा जोड व्यवसाय करत आहेत. जरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला फटका बसला आणि नुकसान झाले तरी मधुमक्षिका पालनातून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता हक्काचा रोजगार निर्माण झाला आहे.

देशभरात मधला मागणी ही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बाजारपेठेमध्ये त्याला भावही चांगला मिळतो. या मधुमक्षिका पालन योजनेतून मिळणाऱ्या मधातून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकतो. मधुमक्षिका पालन योजनेतून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.

Madhmashi Kendra Yojana

ठळक मुद्दे

मधुमक्षिका पालन योजना 2024 मराठी माहिती

Madhmashi Kendra Yojana 2024 Information In Marathi

मधुमक्षिका पालन योजनेची थोडक्यात माहिती

Madhmashi Kendra Yojana In Short

मधुमक्षिका पालन योजनेचे उद्देश

Madhmashi Kendra Yojana Purpose

मधुमक्षिका पालन योजनेची वैशिष्ट्ये

Madhmashi Kendra Yojana Features

मधुमक्षिका पालनासाठी कशी होते लाभार्थ्याची निवड

Madhmashi Kendra Yojana 2024

मधुमक्षिका पालन योजनेचे फायदे

Madhmashi Kendra Yojana Benefits

मधुमक्षिका पालन योजनेचे लाभ

Madhmashi Kendra Yojana 2024 Benefits

मधुमक्षिका पालन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Madhmashi Kendra Yojana Documents

मधुमक्षिका पालन योजनेची अर्ज प्रक्रिया

How to apply for Madhmashi Kendra Yojana 2024

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मधुमक्षिका पालन योजनेची थोडक्यात माहिती

Madhmashi Kendra Yojana In Short

योजनेचे नावमधुमक्षिका पालन योजना  
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
लाभ2 ते 5 लाख रुपयांचे कर्ज
उद्देशमधुमक्षिका पालन योजनेतून शेतकऱ्यांना जोडधंदा निर्माण करण्यासाठी मदत करणे
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
Madhmashi Kendra Yojana

मधुमक्षिका पालन योजनेचे उद्देश

Madhmashi Kendra Yojana Purpose

  • शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन करून आत्मनिर्भर बनवणे.
  • शेतकऱ्यांना हक्काचा रोजगार निर्माण करून देणे.
  • Madhumakshika Palan Yojana या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
  • शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.
  • शेतकऱ्यांना व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम बनवणे.

मधुमक्षिका पालन योजनेची वैशिष्ट्ये

Madhmashi Kendra Yojana Features

  • मधुमक्षिका पालन Madhumakshika Palan Yojana केल्याने शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत आहे.
  • मधुमक्षिका पालन Madhumakshika Palan Yojana व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्याला केवळ 10 टक्के रक्कम गुंतवून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो.
  • मधुमक्षिका पालन केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते आणि आजूबाजूच्या शेतीतील उत्पन्न वाढण्यासही मधुमक्षिका पालनचा फायदा होतो.
  • मधुमक्षिका पालन योजनेच्या Madhumakshika Palan Yojana माध्यमातून शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण दिले जाते तेही मोफत.
  • मोफत प्रशिक्षण घेतल्यानंतर शेतकरी मधुमक्षिका पालन केंद्र सुरू करू शकतात.
  • देशातील मधाची मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून हातभार लागतो.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

मधुमक्षिका पालनासाठी कशी होते लाभार्थ्याची निवड

Madhmashi Kendra Yojana 2024

मधुमक्षिका पालन योजना 2024 Madhmashi Kendra Yojana च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाची माहिती विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात येते. त्यानंतर नाबार्ड नेहरू युवा केंद्र अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक वित्त व विकास मंडळ महिला मंत्रालयाकडे आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येते. मधुमक्षिका पालन योजनेच्या प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती च्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाते. त्यानंतर महिला बेरोजगार युवक आदिवासी दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना प्राधान्य देण्यात येते आणि पात्र असलेल्या अर्जदाराची मधुमक्षिका पालन योजनेच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येते. त्यानंतर निवड झालेल्या व्यक्तींना मधुमक्षिका पालन कसे करावे त्याची काळजी कशी घ्यावी आदी संपूर्ण प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. जेणेकरून प्रशिक्षण घेतल्यानंतर तो व्यक्ती कुठल्याही अडचणी शिवाय आपले स्वतःचे मधुमक्षिका पालन केंद्र सुरू करून चांगल्या पद्धतीने चालू शकेल.

मधुमक्षिका पालन योजनेचे फायदे

Madhmashi Kendra Yojana Benefits

  • शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन हा व्यवसाय आर्थिक उत्पन्नास हातभार लावतो.
  • मधुमक्षिका पालन योजनेच्या माध्यमातून लाभार्थी व्यक्ती कमी वेळात अधिक नफा मिळवु शकतो.
  • मधुमक्षिका पालन केंद्र वैयक्तिक किंवा समूह मध्ये ही सुरू करता येतो.
  • सध्या बाजारामध्ये मध आणि मेणाची मागणी अधिक आहे या व्यवसायाद्वारे प्रशिक्षणार्थी मध, मेन तसेच रॉयल जेल उत्पादन पराग कण मिळवू शकतात.
  • मधुमक्षिका पालन करण्यासाठी कमी उत्पन्न देणाऱ्या शेतातही हे योजना सुरू करू शकता. जिथे मेनाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकते.
  • शेतकरी ज्यावेळेस मधुमक्षिका पालनास करतात त्यावेळेस पर्यावरणावरही याचा सकारात्मक परिणाम होतो आणि आजूबाजूच्या इतर शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
  • केंद्र सरकारने सुरू केलेल्या मधुमक्षिका पालन योजनेच्या माध्यमातून मधुमक्षिका पालनासाठी 2 ते 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • यापैकी एकूण खर्चाच्या 65 टक्के कर्ज सरकारकडून आणि 25% अनुदान खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून दिले जाते.
  • त्यामुळे लाभार्थी व्यक्तीस केवळ 10 टक्के रक्कम या उद्योगासाठी गुंतवावी लागते.
  • या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात 50 मधूमाशांचे केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास विभागाकडून 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

मधुमक्षिका पालन योजनेचे लाभ

Madhmashi Kendra Yojana 2024 Benefits

  • या योजनेचा लाभ देशातील प्रत्येक शेतकऱ्याला घेता येईल.
  • त्यासाठी अर्ज करणारा व्यक्ती 8 वी पास असणे आवश्यक आहे.
  • मधु मक्षिका पालन योजनेचे Madhumakshika Palan Yojana अनुभव असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येते.
  • मधुमक्षिका पालन योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
  • त्यामुळे अर्जदार व्यक्ती आपला स्वतःचा मधुमक्षिका पालन व्यवसाय सहज सुरू करू शकतील.

मधुमक्षिका पालन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Madhmashi Kendra Yojana Documents

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

रेशन कार्ड

मोबाईल क्रमांक

पासपोर्ट साईज आकाराचा फोटो

जागेची कागदपत्रे

नमुना 8 अ

Madhmashi Kendra Yojana

मधुमक्षिका पालन योजनेची अर्ज प्रक्रिया

How to apply for Madhmashi Kendra Yojana 2024

मधुमक्षिका पालन योजनेचा अर्ज तुम्हाला फक्त ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल यासाठी कुठलेही ऑनलाईन पद्धत सध्या उपलब्ध झालेली नाही.

आपण ऑफलाइन अर्ज प्रक्रिया बघूया

मधमाशी पालन योजनेचे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

मधमाशी पालन योजना 2024 या योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागेल

तिथून तुम्हाला खादी व ग्रामोद्योग विभागात जाऊन मधुमक्षिपालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल

त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील

त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसहित तुम्हाला तुमचा अर्ज अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागेल

त्यानंतर अधिकारी तुम्हाला तुमच्या अर्जाची एक पोच पावती देतील ती तुम्हाला सांभाळून ठेवावी लागेल

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही मधुमक्षिका पालन योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: मधुमक्षिका पालन योजना म्हणजे काय?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून लाभार्थीना मोफत प्रशिक्षण देऊन स्वतःचा मधुमक्षिका पालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते.

प्रश्न: मधुमक्षिका पालन केंद्र सुरू करण्यासाठी किती कर्ज मिळते?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 2 ते 5 लाख रुपयांचे कर्ज मिळते.

प्रश्न: व्यवसाय सुरू करण्यासाठी लाभार्थ्याला किती रुपये गुंतवावे लागतात?

उत्तर: मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आणि खादी व ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून 90% पर्यंत गुंतवणूक करण्यात येते केवळ 10 टक्के एकूण खर्चाच्या शेतकऱ्यांना गुंतवावे लागतात.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA