MahaDBT Farmer Scheme Maharashtra 2024 Information In Marathi : महाडीबीटी शेतकरी योजना2024 मराठी माहिती
MahaDBT Farmer Scheme Maharashtra नमस्कार वाचकहो, आज आपण महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही एक शेतकरी आहात, तुम्हालाही या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा आहे तर तुमच्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत तुम्हालाही नोंदणी करायची असेल तर तुमच्यासाठी हा आजचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
महाडीबीटी शेतकरी पोर्टल Mahadbt Farmer Portal हे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील क्षेत्र सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मदत मिळते.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी व त्यांच्या आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबविला जातात. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांविषयीच्या संपूर्ण योजनांची माहिती दिली जाते. तुम्हाला किती योजनांचा लाभ मिळाला, तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात इत्यादी सर्व बाबींची माहिती महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर दिली जाते.
महाडीबीटी शेतकरी योजना Mahadbt Farmer Portal ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होईल तसेच त्यांना आर्थिक मदत कोणत्या पद्धतीने केल्या जाईल या अनुषंगाने ही महाडीबीटी शेतकरी पोर्टल योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना शेती संबंधित साहित्य दिले जाते, कोणत्याही यंत्राची खरेदी करता वेळी शेतकऱ्यांना त्यावर अनुदान देण्यात येते, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे झालेले नुकसान भरपाई देण्यात येते.
महाडीबीटी शेतकरी पोर्टल योजना महाराष्ट्र या योजनेचा सर्वाधिक लाभ हा अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार असून त्यांना आपत्ती मधून नुकसान झाल्याची भरपाई सरकार मार्फत मिळते. तसेच वेगवेगळे शेती संबंधित साहित्य घेण्यासाठी अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विविध प्रकारची डिजिटल यंत्रणा वापरली जावी यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Mahadbt Farmer Login Portal महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्यासाठीच सरकार शेतकऱ्यांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. काही वर्षांपूर्वी कृषी योजनांचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांना विविध पोर्टलवर जावे लागत होते आणि तिथून त्यांना अर्ज सादर करावा लागत होता. त्या विविध पोर्टलमुळे बऱ्याचशा योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. या सर्व समस्यांचा गोष्टींचा विचार करून राज्य सरकारच्या कृषी विभागाने महाडीबीटी फार्मर लॉगिन Mahadbt Farmer Login Portal सुरू केले आहे.
Mahadbt Yojana Marathi या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजनांची माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध करून देणे. तसेच या योजनांची अर्ज प्रक्रिया, आर्थिक लाभाचे वितरण या सर्व गोष्टी एकाच पोर्टलवर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना कृषी योजनांसाठी विविध पोर्टलवर जाण्याची आवश्यकता नाही.
ठळक मुद्दे
महाडीबीटी शेतकरी योजना मराठी माहिती
MahaDBT Farmer Scheme Maharashtra Information In Marathi
महाडीबीटी शेतकरी योजनेची थोडक्यात माहिती
Mahadbt Yojana Marathi In Short
महाडीबीटी शेतकरी योजनेचे उद्दिष्ट
Mahadbt Farmer Portal Purpose
महाडीबीटी शेतकरी योजनाचे वैशिष्ट्ये
Mahadbt Farmer Login Portal Featurs
महाडीबीटी पोर्टल योजनेचे लाभ
Mahadbt Portal Shetkari Yojana Benefits
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजनेअंतर्गत खालील योजना राबविल्या जातात
MahaDBT Farmer Scheme Maharashtra
महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे
Mahadbt Portal Shetkari Yojana
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजनेची आवश्यक पात्रता व अटी
Mahadbt Portal Shetkari Yojana Eligibility
महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
Mahadbt Portal Shetkari Yojana Documents
महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करण्याचे प्रक्रिया
MahaDBT Farmer Scheme Maharashtra
महाडीबीटी पोर्टल अंतर्गत लॉगिन प्रक्रिया
Mahadbt Farmer Login Portal
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
महाडीबीटी शेतकरी योजनेची थोडक्यात माहिती
Mahadbt Yojana Marathi In Short
योजनेचे नाव | महाडीबीटी शेतकरी योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील अल्पभूधारक शेतकरी |
उद्देश | सर्व योजनांची माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध करून देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
पोर्टल | https://mahadbt.maharashtra.gov.in/ |
महाडीबीटी शेतकरी योजनेचे उद्दिष्ट
Mahadbt Farmer Portal Purpose
- राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांची माहिती एकाच पोर्टलवर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे जेणेकरून त्यांना विविध पोर्टलवर जाण्याचे आवश्यकता नाही. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या सुरू करण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजना आणि त्यांची अर्ज प्रक्रिया एकाच पोर्टलवर शक्य व्हावे ही उद्दिष्ट या योजनेचे आहे.
- शेतकऱ्यांना कृषी योजनांसाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये.
- शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये झालेले पिकांचे नुकसानासाठी त्वरीत आर्थिक मदती देणे.
महाडीबीटी शेतकरी योजनाचे वैशिष्ट्ये
Mahadbt Farmer Login Portal Featurs
- शेतकरी या योजनेमुळे कोणत्याही वेळी कुठूनही आपले सरकार महाडीबीटी फॉर्म वरून नोंदणी करून सरकारच्या कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी त्यांचा वापर आयडी username वापरून कधीही पाहू शकतात.
- पारदर्शकतेसाठी 7/12 प्रमाणपत्र, 8 अ प्रमाणपत्र, आधारशी लिंक असलेले बँक खाते पासबुक प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत इत्यादी अपलोड करू शकतात.
- या योजनेअंतर्गत आपले सरकार डीबीटी च्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना एसएमएस आणि ई-मेल ची सुविधा मिळते.
महाडीबीटी पोर्टल योजनेचे लाभ
Mahadbt Portal Shetkari Yojana Benefits
- राज्यातील शेतकऱ्यांना एकाच पोर्टलवर सर्व कृषी योजनांची माहिती मिळते.
- राज्यातील शेतकरी एकाच पोर्टलवरून सर्व योजनांसाठी अर्ज करू शकतात.
- राज्यातील शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती आणि अर्ज करण्यासाठी विविध पोर्टल वर जाण्याची आवश्यकता नाही.
- अर्जदार ऑनलाइन नोंदणी द्वारे नोंदणी करून युजरनेम पासवर्ड वापरून संबंधित योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- आपले सरकार महाडीबीटी पोर्टल संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करू शकतात.
- शेतकऱ्यांचे पिकांचे झालेले नुकसान भरपाई देणे सोपे होते.
- शेतकरी घर बसल्या मोबाईलच्या सहाय्याने सर्व योजनांची माहिती एकाच पोर्टलवर पाहू शकतात.
- योजनेमुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सरकारच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजनेअंतर्गत खालील योजना राबविल्या जातात
MahaDBT Farmer Scheme Maharashtra
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
- कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान यामध्ये अन्नधान्य, तेलबिया, उस व कापूस
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- राष्ट्रीय कृषी विकास योजना
- राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना
महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे
Mahadbt Portal Shetkari Yojana
सन 2017-18 पासून आधार क्रमांक आवश्यक आहे. आधार नोंदणी न झालेले शेतकरी सुद्धा आपले सरकार डीबीटी पोर्टल वर नोंदणी करून शकतात. आपले सरकार डीबीटी पोर्टल वर कृषी योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेणे. कृषी योजनेसाठी सर्व अटी आणि अर्ज भरण्यासाठीच्या आवश्यक पात्रता ही तपासून घेणे. तुम्ही या पात्रता आणि अटींमध्ये पात्र आहात की नाही याची खात्री करून घेणे ही संपूर्ण जबाबदारी अर्जदाराचीच असेल. तुम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चूक आढळून आली तर तो अर्ज रद्द करण्यात येईल. अर्जदाराने अर्ज जमा करण्यापूर्वी प्रदान केलेले सर्व तपशील योग्य आहेत का तपासून घेणे. कृषी योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. अन्य कोणताही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजनेची पात्रता व अटी
Mahadbt Portal Shetkari Yojana Eligibility
अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.
महाराष्ट्र बाहेरील नागरिक या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र नाही.
या योजनांसाठी कोणताही शेतकरी अर्ज करू शकतो.
महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
Mahadbt Portal Shetkari Yojana Documents
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
जातीचे प्रमाणपत्र
जमिनीचे प्रमाणपत्र
7/12 उत्पन्नाचे प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
पिकाची माहिती
डोमेसाईल प्रमाणपत्र
कौटुंबिक माहिती
महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करण्याची प्रक्रिया
MahaDBT Farmer Scheme Maharashtra
महाडीबीटी फार्मर पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर पोर्टलवर जावे लागेल
या पेजवर नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करा
आता तुमच्यासमोर नवीन नोंदणी अर्ज उघडेल
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा जसे की अर्जदाराचे नाव, पासवर्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, ओटीपी सर्व संपूर्ण अर्ज पूर्ण भरून नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुमच्यासमोर एक पर्याय उघडेल त्यामध्ये तुमच्याजवळ आधार कार्ड आहे का त्यामध्ये तुम्हाला no या पर्यावर क्लिक करायचे आहे
आता तुमच्या समोर एक नवीन नोंदणी अर्ज उघडेल नॉन आधार चा त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरा
त्यानंतर जतन करा या पर्यावर क्लिक करा
अशा प्रकारे तुम्ही तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकाल
महाडीबीटी पोर्टल अंतर्गत लॉगिन प्रक्रिया
Mahadbt Farmer Login Portal
अर्जदाराला होम पेजवर लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल
त्यानंतर वापर करता आयडी म्हणजेच युजरनेम या पर्यावर क्लिक करा
त्यामध्ये तुमचा युजरनेम, पासवर्ड, कॅपच्या टाकून लॉगिन करा या पर्यावर क्लिक करा
अशा प्रकारे तुम्ही लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल
लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अप्लाय या पर्यायावर क्लिक करावे लागेल
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. जसे की तुमची वैयक्तिक माहिती, जागेची माहिती, पिकाची माहिती, उत्पन्न तपशील, बँक खाते तपशील इत्यादी संपूर्ण माहिती भरा
त्यानंतर जतन करा या पर्यावर क्लिक करा
त्यानंतर अर्जदाराला त्याची पत्त्याची माहिती भरावी लागेल ते भरून झाल्यावर जतन करा या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर अर्जदाराला त्याच्या कुटुंबाचा तपशील भरावा लागेल
त्यानंतर जमिनीचा तपशील भरावा लागेल
त्यानंतर पिकाचा तपशील भरावा लागेल
त्यानंतर त्याच्या अंतर पिकाचा तपशील भरावा लागेल
ही संपूर्ण माहिती भरून झाल्यावर जतन करा या पर्यायावर क्लिक करा
अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटी पोर्टल फार्मर पोर्टलवर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: महाडीबीटी शेतकरी पोर्टल चा काय आहे लाभ?
उत्तर: महाडीबीटी शेतकरी पोर्टलचा लाभ म्हणजे शेतकऱ्यांना एकाच पोर्टलवर सर्व कृषी योजनांची माहिती मिळते.
प्रश्न: महाडीबीटी पोर्टल योजनेचा उद्देश काय?
उत्तर: राज्यातील शेतकऱ्यांना सर्व कृषी योजनांचा लाभ देणे आहे या योजनेचा उद्देश आहे.
प्रश्न: महाडीबीटी शेतकरी योजना म्हणजे काय?
उत्तर: महाडीबीटी शेतकरी पोर्टल राज्यातील शेतकऱ्यांना सर्व कृषी योजनांचा एकाच पोर्टलवर लाभ घेण्यासाठी सुरू करण्यात आलेले पोर्टल आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA