women farmer certificate portal in marathi : महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Women Farmer Certificate Maharashtra 2026 : प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

women farmer certificate portal in marathi : महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ योजना. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यातील पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देणार आहे. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून महिलांना सरकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हीही अजून या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा व याची अधिक माहितीसाठी तुम्ही ही माहिती वाचा… यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करावा? अर्ज कुठे करावा? यामध्ये कोणती महिला पात्र आहे? या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आज दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती… 

शेती किंवा शेतीशी निगडित काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला जमीन कोणाच्याही नावावर असो, अधिकृत महिला शेतकरी ओळख आणि प्रमाणपत्र देण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र हे महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कायदा करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आता जमिनीचा सातबारा नव्हे तर शेतातील प्रत्यक्ष कष्ट हाच आता महिला शेतकरी या ओळखीचा निकष महाराष्ट्र सरकारने ठरवला आहे.

महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना सरकारी योजनासह कृषी कर्ज, विमा योजना, कृषी निविष्ठा आणि विस्तार सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यात 22 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 लागू करण्यात आला आहे. याद्वारे “जी महिला शेतात राबते तिला शेतकरी म्हणून ओळख देण्यात येणार आहे” शेती किंवा शेतीशी निगडित काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला– जमीन कोणाच्याही नावावर असो– अधिकृत महिला शेतकरी ओळख आणि प्रमाणपत्र देणारा हा नवा कायदा लागू करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील महिलांना मोठ्या संधी उपलब्ध झाले आहेत.

महिला शेतकरी प्रमाणापत्राचे पोर्टल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुरू केले आहे. याद्वारे महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता, प्रमाणपत्र वितरण आणि त्यांचा अधिकृत डेटाबेस निर्मिती याद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने पोर्टल सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या संकेतस्थळावरून प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज महिलांना करता येणार आहे.

ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या किंवा शेती व्यवसायात कार्यरत असलेल्या महिला प्रमाणपत्रासाठी पात्र असणार आहेत. त्या अर्ज करून आपले प्रमाणपत्र मिळवू शकता. संबंधित महिलाने अर्ज ऑनलाईन केल्यानंतर पुढील नियमित ग्रामसभा मध्ये याची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा ठराव केला जाईल. अर्ज नाकारल्यास कारणे लेखी स्वरूपात द्यावी लागतील. ग्रामसभेने महिला शेतकरी म्हणून मान्यता दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून 15 दिवसाच्या आत प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नगरपंचायत क्षेत्रात अर्ज संबंधित सर्वसाधारण सभेमध्ये ठेवून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या सेवा संकल्प अभियानात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत अधिनियमाची अंमलबजावणी पात्र महिला शेतकऱ्यांची ओळख, ऑनलाईन अर्जासाठी प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि जनजागृती वर सरकारकडून भर दिला जात आहे. जेणेकरून प्रत्येक महिन्याला प्रमाणपत्र मिळेल.

या कायद्यानुसार शेती म्हणजे काय

राज्य सरकारच्या या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी जमिनीची मालकी ही अट नाही तर पीक लागवड, बियाणे उत्पादन, कृषी पालन, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, जलचर पालन, दूध व्यवसाय, फुलशेती, चारा लागवड, मधमाशीपालन- उत्पादन, कुक्कुटपालन, रेशीम शेती, गांडूळ खत निर्मिती- विक्री, शेतमालावर प्रक्रिया व मूल्यवर्धन भाड्याने, वाट्याने किंवा स्थलांतरित स्वरूपात केलेली शेती अथवा शेतमजुरी विचारात घेण्यात आली आहे. त्यामुळे या संबंधित असलेल्या सर्व महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. तुम्हीही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ही कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेसाठी अर्ज करून प्रमाणपत्र मिळवू शकता.

शेतीमध्ये महिलांचे योगदान खूप मोलाचे आहे. या योगदानाला अधिकृत ओळख देण्यासाठी आणि सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांना सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे. 
–कृषी मंत्री दत्तात्रय भरणे महाराष्ट्र शासन

तुम्ही पात्र आहात का?

वय वर्ष 18 किंवा त्याहून अधिक.
महाराष्ट्रात किमान एका हंगामात शेती किंवा शेतीशी निगडित काम.
जमीन मालकीची गरज नाही फक्त तुमची प्रत्यक्ष काम हाच निकष.

प्रमाणपत्र कसे मिळते?

ऑनलाइन अर्ज करा – 
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी शेती किंवा शेतीशी निगडित काम करणारी कोणतीही महिला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकते.
ग्रामसभेची पडताळणी –
पुढच्या ग्रामसभेत किंवा नगरपंचायतीच्या बैठकीत अर्जावर विचार होतो.
ठराव मंजुरी –
ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर किंवा नाकारला जाऊ शकतो नाकारण्याचे कारण सात दिवसात कळवले जातात.
प्रमाणपत्र मिळते –
ठराव मंजूर झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
अपील (आवश्यक असल्यास)
120 दिवसात अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागता येते.  30 दिवसात निर्णय घेणे आवश्यक आहे.

प्रमाणपत्रामुळे उपलब्ध होणाऱ्या संधी

पीक कर्ज व संस्थात्मक कर्ज सुविधा.
कौशल्य प्रशिक्षण व आधुनिक कृषी तंत्रज्ञान मार्गदर्शन.
बाजारपेठ साठवणूक व वाहतूक सुविधा.
पिक विमा व अनुदान योजना.
बि-बियाणे, खते व शेती साहित्य योजना.
विधवा घटस्फोटीत व एकल महिला शेतकऱ्यांसाठी विशेष मदत.

कोण अर्ज करू शकतो?

अर्ज करण्यापूर्वी पात्रता- निकष काळजीपूर्वक वाचा. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. पात्रता खालील प्रमाणे- 
महिला शेतकरी : अर्जदार महिला असावी व ती जमीन मालक वैध कुळ वाटेकरी, भाडेकरू, शेतमजूर किंवा बटाईदार म्हणून शेतीमध्ये सक्रिय असावी.
महाराष्ट्राची रहिवासी : तुम्ही महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असावे आणि वैध आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र असावे 
वैध आधार कार्ड : सक्रिय मोबाईल नंबरची लिंक असलेले वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे. सर्व लाभ आधार लिंक बँक खात्यात जमा होतात.
समाविष्ट कामाचा प्रकार : तुम्ही करत असलेले शेत काम या योजनेत समाविष्ट केलेल्या प्रकारापैकी एक असणे आवश्यक आहे. (पीक शेती फलोत्पादन पशुपालन मत्स्यव्यवसाय इत्यादी.)
वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक : अर्जदार महिलेचे वय अर्ज करण्याच्या तारखेच्या वेळी 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

तुमच्याकडे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा वीज बीज व रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या महिला शेतकरी पोर्टलच्या या https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service/ वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

FAQs

प्रमाणपत्रासाठी जमीन स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे का?
नाही.. जमीन कोणाच्या नावावर आहे हे महत्त्वाचे नाही. तुम्ही करत असलेले प्रत्यक्ष काम हाच निकष आहे.
यामुळे पुरुष शेतकऱ्यांच्या हक्क किंवा लाभ कमी होतील का?
नाही.. पुरुष शेतकऱ्याचे सध्याचे हक्क व लाभ जशास तसे राहतील.
ग्रामसभेने अर्ज नाकारला तर काय करावे?
120 दिवसाच्या आत अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागावी. 30 दिवसात निर्णय दिला जातो.
प्रमाणपत्रामुळे सर्व योजनांचा लाभ आपोआप मिळतो का?
नाही.. हे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही महिला शेतकरी असल्याचा अधिकृत पुरावा आहे. प्रत्यक्ष लाभ त्या त्या योजनेच्या अटीनुसार तुम्हाला मिळेल.
मी स्वतः अर्ज केला नसेल तरी प्रमाणपत्र मिळू शकते का?
होय.. पात्र महिलेला ग्रामसभा स्वतःहून मान्यता व प्रमाणपत्र देऊ शकते.