Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana In Marathi : आता 5 लाखाच्या वैद्यकीय सुविधा मिळणार मोफत

Table of Contents

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 Information In marathi : महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 : MJPJAY केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांसाठी सतत विविध योजना राबवत असते. आज आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या कुटुंबांना आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे, या योजनेच्या माध्यमातून 5 लाख पर्यंतचे उपचार मोफत दिले जातात.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 राज्यातील दारिद्र्यरेषेखालील पिवळे शिधापत्रिका धारक आणि दारिद्र्यरेषेवरील केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना MJPJAY सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळत आहेत त्याही मोफत.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक आरोग्य विमा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारी आणि खाजगी रुग्णालयात विविध आजारावर मोफत उपचार करण्यात येतात. महाराष्ट्र राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेसह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतात. 1 एप्रिल 2020 रोजी पासून राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana  आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रित काम करत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडून निधी मिळतो, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी होणाऱ्या खर्चाची विभागणी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये 60 टक्के 40 टक्के याप्रमाणे करण्यात आली आहे. या दोन्ही योजना एकत्र करण्यात आल्या असल्यामुळे आता महाराष्ट्रातील नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार या योजनेच्या माध्यमातून घेता येत आहेत. याबरोबरच महाराष्ट्र सरकारने काही गंभीर आजाराचाही या योजनेत समावेश केला आहे. त्यामुळे हे आजार असणारे व्यक्ती ही या योजनेचा लाभ घेऊन उपचार घेऊ शकतात.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana राज्य सरकार सतत नागरिकांच्या कल्याणासाठी चांगल्या चांगल्या योजना सुरू करत असते. प्रत्येक योजनेच्या पाठीमागे आपल्या राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे हा सरकारचा उद्देश असतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या आरोग्याचा विचार सरकारने केला आहे. अनेकांना पैसे अभावी चांगले उपचार घेता येत नाहीत परिणामी त्यांचा मृत्यू होतो, मात्र महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरिबातील गरीब व्यक्ती ही चांगल्या रुग्णालयात जाऊन चांगले वैद्यकीय उपचार घेऊ शकतो. यासाठी त्याला कुठले पैसे देण्याची आवश्यकता नाही. हे उपचार घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड असणे आवश्यक आहे. याद्वारे तुम्हाला सरकारने निश्चित केलेल्या रुग्णालयामध्ये चांगल्या वैद्यकीय सुविधा दिल्या जातात.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana राज्यातील गरीब नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे. ही महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा (MJPJAY) योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब नागरिकांना गंभीर आजारावरील उपचार त्यावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी निशुल्क उपचार या योजनेच्या माध्यमातून दिले जातात.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे स्वरूप

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना Mahatma Phule Jan Arogya Yojana यापूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जात होती. ही योजना 2 जुलै 2012 पासून प्रथम 8 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती. नंतर महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली होती. त्यानंतर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली.

Mahatma Phule Jan Arogya Yojana महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना आहे. या द्वारे नागरिकांना आरोग्य कवच प्रदान केले जाते. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना तब्बल 5 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण देण्यात येते. या विमा संरक्षणाच्या माध्यमातून गंभीर आजारासाठी प्रतिवर्षी 3 लाख रुपये विमा संरक्षण देण्यात आले आहे. मात्र यात सुधारणा करून राज्य सरकारने आता मंत्रिमंडळाच्या एका बैठकीमध्ये या योजनेअंतर्गत आता 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कुठल्याही गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण या योजनेच्या माध्यमातून दिले जात आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून यापूर्वी नागरिकांना 3 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण देण्यात येत होते आणि या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील पिवळे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांनाच दिला जात होता. मात्र राज्याच्या नवीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता या योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच पिवळी शिधापत्रिका धारक असणे ही अट काढून आता राज्यातील सर्वच नागरिकांना ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे पिवळी असो की केसरी या सर्वांना MJPJAY या योजनेअंतर्गत उपचार घेता येणार आहेत आणि या योजनेचा लाभ घेता येईल.

Mahatma Phule Jan Arogya Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही आरोग्य योजना राज्यातील नागरिकांसाठी वरदान ठरताना दिसत आहे. कारण अनेक नागरिकांना गंभीर आजारावर उपचार घेण्यास या योजनेमुळे फायदा होत आहे आणि ते या योजनेच्या माध्यमातून उपचार घेत आहेत. यापूर्वी ही योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने राज्यात ओळखली जात होती. कालांतराने यामध्ये बदल करून या योजनेचे नाव महात्मा फुले जन आरोग्य योजना ठेवण्यात आले. या योजनेचा लाभ राज्यातील कोट्यावधी नागरिकांना निशुल्क वैद्यकीय सेवा घेण्यात झाला आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojana योजनेमध्ये आणखी भर घातली ती म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाने. केंद्र सरकारच्या आरोग्य विमा यंत्रणे सोबत सलग्नता करून 23 सप्टेंबर 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. आता 1 एप्रिल 2020 पासून महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात एकत्र राबवली जात आहे. यामुळे आता नागरिकांना अनेक गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी या दोन्ही योजनेचा मोठा लाभ होत आहे दोन्हीही योजना मोफत वैद्यकीय उपचार पुरवतात.

Mahatma Phule Arogya Yojana राज्यभरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपचार घेता येत आहेत. काही असे उपचार आहेत ज्याचे उपचार घेण्यासाठी खूप रक्कम लागते. मात्र या योजनेमुळे त्यावरही उपचार घेण्यास नागरिकांना या योजनेमुळे लाभ मिळत आहे. त्यामुळे ही योजना एक जीवनदायी योजना म्हणून महाराष्ट्रात ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून 1,000 पेक्षा अधिक गंभीर आजारावर उपचार करण्यात येतात. महागड्या असणाऱ्या शस्त्रक्रियाही या योजनेच्या माध्यमातून केल्या जात आहेत. नियमित लागणारे उपचार, डायलेसिस याचे देखील पॅकेजेस या योजनेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Mahatma Phule Arogya Yojana सततचा दुष्काळ नैसर्गिक आपत्ती अशा कारणाने राज्यातील शेतकरी आणि नागरिक हैरान असतात. त्यातच कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असते. त्यामध्ये घरातील एखादा व्यक्ती आजारी पडल्यावर त्याला चांगले वैद्यकीय उपचार देण्यासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे नसतो त्यामुळे आजारी व्यक्तीस चांगल्या रुग्णालयामध्ये भरती करण्याची वेळ आली तर अशा परिस्थितीमध्ये लागणारा खर्च त्यांना परवडणारा नसतो. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना अशा परिस्थितीमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच त्यांना उपचारासाठी पैशासाठी इतर व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते किंवा खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन परिणामी उपचार करावे लागतात. अशा सर्व समस्याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने नागरिकांना गंभीर आजारावर उपचारासाठी पैशासाठी तर कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये म्हणून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना Mahatma Phule Arogya Yojana सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत 5 लाख रुपयापर्यंत उपचार दिले जातात. त्यामुळे त्यांना कोणाकडेही पैसे मागण्याची गरज पडत नाही आणि चांगल्या वैद्यकीय सुविधाही त्यांना वेळेवर मिळत आहेत.

महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024 Mahatma Jyotiba Phule Arogya Yojana हे महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शासकीय आणि खाजगी रुग्णालयात निवडक आजारावर सर्व शिधापत्रिकाधारक यांना नसेल का वैद्यकीय सेवा देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबियांना निशुल्क वैद्यकीय उपचार देण्यात येतात.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana

महाराष्ट्र सरकारचा सहभाग

Mahatma Jyotiba Phule Arogya Yojana

महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana  ही हमी तत्त्वावर राबवली जाणारी एक योजना आहे. यामध्ये 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबापैकी सामाजिक आर्थिक व जात निहाय जनगणने नुसार 2011 च्या यादीतील 83.63 लाख कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनी मार्फत एकत्रित योजनेतील गट अ लाभार्थी कुटुंबांना 996 उपचाराकरिता प्रति कुटुंब प्रतिवर्षी रुपये 1.5 लाख रुपये पर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण पुरवले जाते. गट अ लाभार्थी कुटुंबाच्या वतीने राज्य आरोग्य हमी सोसायटी प्रतिक कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष 757 रुपये विमा रक्कम त्रिमासिक हप्त्यामध्ये विमा कंपनी आदा करीत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील MJPJAY गट ब व गट क लाभार्थ्यांना हमी तत्त्वावर पूर्ण देतात त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 आजारांसाठी 1.5 लाखा पुढील ते 5 लाखा रकमेपर्यंतचे केवळ सदर योजनेत अंतर्भूत असलेल्या 213 उपचाराकरिता 5 लाख रुपयाचे आरोग्य विमा संरक्षण सरकारच्या वतीने लाभ दिला जातो.

ठळक मुद्दे :

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024

महात्मा फुले जन आरोग्याचे स्वरूप

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana

महाराष्ट्र सरकारचा सहभाग

Mahatma Jyotiba Phule Arogya Yojana

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची थोडक्यात माहिती

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana In Short

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Purpose

महात्मा फुले आरोग्य योजनेचे वैशिष्ट्ये

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Features

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी

Mahatma Phule Jan Arogya Yojana Beneficiors

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील लाभार्थ्यांची ओळख

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana

महात्मा फुले जन आरोग्य योजना वार्षिक विमा संरक्षण मर्यादा

Mahatma Phule Jan Arogya Yojana

आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजना वार्षिक विमा संरक्षण मर्यादा

Mahatma Phule Jan Arogya Yojana

महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अजरांची यादी

Mahatma Phule Jan Arogya Yojana List of Diseases

महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Benefits

आरोग्य योजनेचे नियम व अटी

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Terms And Conditions

महात्मा फुले आरोग्य योजनेसाठीची कागदपत्रे

Mahatma Phule Jan Arogya Yojana Documents

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

Mahatma Phule Jan Arogya Yojana Online Application

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची थोडक्यात माहिती

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana In Short

योजनेचे नावमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कढी सुरू केली2 जुलै 2012
लाभार्थी कोणराज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक
लाभ5 लाखापर्यंत मोफत आरोग्य सुविधा
उद्देशआर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवने
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाइटhttps://www.jeevandayee.gov.in/
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Purpose

  • महाराष्ट्रातील सर्व शिधापत्रिकाधारक यांना या योजनेच्या माध्यमातून गंभीर आजारावर उपचार शस्त्रक्रिये शिस्त क्रिया मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आरोग्य सुविधा पुरवणे. हा या योजनेचा उद्दिष्ट आहे.
  • गरिबातील गरीब नागरिकालाही चांगले उपचार मिळावेत हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना चांगले उपचार घेण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. तसेच त्यांना आजारावर उपचार घेण्यासाठी पैशाची पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडत नाही.
  • या योजनेच्या मार्फत मोफत उपचार मिळतात.
  • या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील तसेच सर्व रेशन कार्डधारकांना चांगले आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळतात.
  • राज्यातील प्रत्येक नागरिकाला चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

महात्मा फुले आरोग्य योजनेचे वैशिष्ट्ये

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Features

  • राज्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केलेली आहे तिचा राज्यातील जनतेला मोठा लाभ होत आहे.
  • राज्यातील सर्व जाती धर्मातील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून आरोग्य विमा संरक्षण मिळते.
  • राज्यातील गरिबातील गरीब नागरिकालाही त्याच्या आजारावर चांगले उपचार मिळावेत हा या योजनेचे वैशिष्ट्य आहे यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.
  • या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याचे नागरिकांना काम नाही आणि तत्काळ त्यांना ऑनलाईन पद्धतीने महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार केले जातात.
  • नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा जन आरोग्य योजनेचे नोंदणीकृत दवाखान्यामध्ये त्यांचा एक प्रतिनिधी नागरिकांच्या मदतीसाठी बसवलेला आहे. तो नागरिकांची तिथे गेल्यानंतर मदत करतो आणि त्यांना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभ मिळवून देतो.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यास शिधापत्रिका (पिवळी, केसरी, अंत्योदय अन्नपूर्णा) फोटो ओळखपत्राच्या आधारे या योजनेचा लाभ दिला जातो.
  • आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील पांढरी शिधापत्रिका किंवा शेतकऱ्यांना त्यांच्याकडे सातबारा उतारा व ओळखपत्राच्या आधारे योजनेचा लाभ घेता येतो.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार लाभार्थ्यास संपूर्ण आरोग्य सुविधा पुरवते.
  • या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयामध्ये नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात.
  • महात्मा जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग, शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, कॅन्सर, ऑपरेशन, डेंगू, स्वाईन फ्लू, मलेरिया, पीडियाट्रिक सर्जरी, सिकलसेल ऍनिमिया यासारख्या आदी आजारावर या योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात.
  • राज्यातील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळवून देणे हा महात्मा जन आरोग्य योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्व शिधापत्रिका धारकांना दिला जातो.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी

Mahatma Phule Jan Arogya Yojana Beneficiors

  • राज्यातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे आणि त्यांच्याकडे पिवळ्या रेशन कार्ड, अंतोदय रेशन कार्ड तसेच केशरी राशन कार्ड आहे असे सर्व नागरिक या योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार घेऊ शकतात.
  • राज्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थीही या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाही या योजनेतून मोफत उपचार दिले जातात.
  • सरकारी आश्रमातील महिला अनाथ मुले यांनाही या योजनेच्या माध्यमातून लाभ दिले जातात.
  • वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेच्या माध्यमातून उपचार घेता येतात. माहिती व जनसंपर्क मंत्रालयातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ देण्याचा विचार सरकारने केला आहे.
  • राज्यातील बांधकाम कामगार व त्यांच्या मुलांनाही या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो.
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2011 च्या जनगणनेतील ग्रामीण व शहरी भागासाठी निश्चित केलेल्या निकषानुसार कुटुंबियांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • तसेच राज्यातील ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींनाही महात्मा जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार घेता येतात.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील लाभार्थ्यांची ओळख

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana

  • महाराष्ट्रातील आर्थिक, सामाजिक व जात निहाय जनगणना 2011 मध्ये नोंद केलेल्या कुटुंबातील सदस्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत रुग्णालयामध्ये ई कार्ड व ओळखपत्र दाखवून लाभ घेता येतो.
  • महाराष्ट्रात महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रित काम करत असून या माध्यमातून सर्व शिधापत्रिका धारकांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार घेता येतात.

महात्मा फुले जन आरोग्य योजना वार्षिक विमा संरक्षण मर्यादा

Mahatma Phule Jan Arogya Yojana

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाला प्रति वर्ष 1.5 लाख रुपये पर्यंतचे सर्व रुग्णालयीन खर्च मोफत केला जातो. यामध्ये मूत्रपिंड, प्रत्यारोपण साठी हिमर्यादा प्रतिक कुटुंब, प्रति पॉलिसी वर्ष 2.5 लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाला किंवा सर्व सदस्यांना घेता येतो, म्हणजेच एकूण 1.5 लाख किंवा 2.5 लाख रुपये खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात.

आता या योजनेमध्ये रकमेत वाढ करून ती रक्कम 5 लाख रुपये पर्यंत केली आहे. त्याबरोबरच या योजनेत अनेक आजाराचा समावेशही करण्यात आलेला आहे.

आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजना वार्षिक विमा संरक्षण मर्यादा

Mahatma Phule Jan Arogya Yojana

या योजनेच्या माध्यमातून देशातील कोणत्याही नोंदणीकृत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्याला प्रत्येक कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच पुरवण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांना घेता येतो.

या दोन्ही योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचे मोफत उपचार घेता येतात.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख रुपयांचे विमा कवच देण्यात येते. तर 1.5 लाखापुढील 5 लाखापर्यंतचे कवच राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत हमी तत्त्वावर देण्यात येत आहे. पॉलिसीचे वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च यादरम्यान असते.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana

महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अजरांची यादी

Mahatma Phule Jan Arogya Yojana List of Diseases

जळीत

हृदयरोग

हृदयरोग शस्त्रक्रिया व उपचार

अकस्मित उपचार

त्वचारोग

अंतस्त्राव संस्थेचे विकार

कानात व घसा रोग

सर्वसाधारण शस्त्रक्रिया

व्याधीवर उपचार

संसर्गजन्य आजार

इंटरव्हेशनल रेडिओलॉजी

जठर मार्गाचे उपचार

कर्करोग वरील औषध उपचार व शस्त्रक्रिया

नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन

मूत्रपंड विकार

मज्जातंतूचे विकार

मज्जातंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र

स्त्रीरोग शस्त्रक्रिया

अस्थिवंग शस्त्रक्रिया

बालरोग शस्त्रक्रिया

बालरोग कर्करोग शस्त्रक्रिया

प्लास्टिक सर्जरी

आकस्मित वैद्यकीय उपचार

कृत्रिम अवयव उपचार

फुप्फुसाच्या आजारावरील उपचार

किरणोत्सवाद्वारे कर्करोग उपचार

संधिवात संबंधित उपचार

जठर व आत्रविकाराच्या शस्त्रक्रिया

मूत्रवह संस्थेच्या विकारावर शस्त्रक्रिया

मानसिक आजारावर उपचार

जबडा व चेहऱ्याच्या शस्त्रक्रिया

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

कुसुम सोलार पंप योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

अंत्योदय अन्न योजना

स्वामित्व योजना

कन्यादान योजना

बांधकाम कामगार योजना

महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Benefits

  • महाराष्ट्रातील मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येत होता. यापूर्वी केवळ पिवळी, केशरी शिधापत्रेधारकांनाच या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येत होता. मात्र आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येत आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवणे.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचे नागरिकांचे जीवनमान सुधारणे
  • गरीबातील गरीब नागरिकांना उपचार घेण्यासाठी मदत करणे.
  • राज्यातील नागरिकांनी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पैसे अभावी कोणावर अवलंबून राहू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार दिले जातात.
  • या योजनेच्या माध्यमातून किडनी ट्रान्सप्लाटेशन साठी 3 लाख रुपये आणि कुटुंबाच्या उपचारासाठी 2 लाख रुपयांचे आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण दिले जात आहे. आता यामध्ये वाढ करून 5 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण करण्यात आले आहे.
  • महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार घेतल्यानंतर रुग्णालयातून घरी गेल्यानंतर 10 दिवसापर्यंत चालणाऱ्या उपचारा साठी आर्थिक मदत केली जाते.
  • महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारक व्यक्तीला मोफत 5 लाख रुपयापर्यंत उपचार देण्यात येत आहेत.
  • लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेत असताना एक रुपयाही खर्च करण्याची आवश्यकता नाही.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही जात, धर्म, पंथ अशी अट ठेवण्यात आलेली नाही, प्रत्येक शिधापत्रिकाधारक हा मोफत उपचार या योजनेतून घेऊ शकतो.
  • योजनेच्या माध्यमातून करण्यात येणारे वैद्यकीय उपचार, रोगाचे निदान व एखाद्या आजारासाठी आवश्यक उपचार, भोजन, एक वेळचा परतीचा प्रवास खर्चही दिला जातो.
  • या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे आजाराचे निदान मोफत केले जाते आणि त्याच्यावर उपचार केले जातात.

आरोग्य योजनेचे नियम व अटी

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Terms And Conditions

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब आणि सर्व शिधापत्रिकाधारक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.  
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.

महात्मा फुले आरोग्य योजनेसाठीची कागदपत्रे

Mahatma Phule Jan Arogya Yojana Documents

महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा

लाभार्थ्याकडे पिवळे, केशरी, अन्नपूर्णा, अंत्योदय यापैकी एक शिधापत्रिका असणे गरजेचे आहे

लाभार्थ्याच्या आधार कार्ड असावे

पॅन कार्ड

मतदान कार्ड

बँकेचे पासबुक

मोबाईल क्रमांक

उत्पन्नाचे प्रमाणपत्र (उत्पन्न दोन लाखाच्या आत)

पासपोर्ट फोटो

जन्माचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला

अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र

ज्येष्ठ नागरिक असल्यास ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र

लाभार्थी एक्स सर्विस मॅन असल्यास त्याचे ओळखपत्र

राजीव गांधी हेल्थ कार्ड

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

Mahatma Phule Jan Arogya Yojana Online Application

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यावर ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुमच्या समोर महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा

त्यामध्ये तुम्हाला फ्रेश एप्लीकेशन हा पर्याय निवडायचा आहे

हा पर्याय निवडल्यानंतर नाव नोंदणीसाठी आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल

त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा

सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून झाल्यानंतर सेव बटनावर क्लिक करा

अशा पद्धतीने तुम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: महात्मा फुले जन आरोग्य योजना कोणत्या राज्यासाठी सुरू आहे?

उत्तर: महाराष्ट्र राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

प्रश्न: महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी कोण?

उत्तर: या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्रातील दारिद्र्यरेषेखालील नागरिक आणि सर्व शिधापत्रिकाधारक नागरिक.

प्रश्न: महात्मा फुले आरोग्य योजनेचे लाभ काय?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक नागरिक 5 लाख रुपयांचे वैद्यकीय उपचार मोफत घेऊ शकतात.

प्रश्न: महात्मा फुले आरोग्य योजनेचा उद्देश काय?

उत्तर: महाराष्ट्रातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मोफत पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रश्न: महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी अर्ज कसा करावा?

उत्तर: महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA