Mukhyamantri Rajshri Yojana 2024 Information In Marathi : मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती
Mukhyamantri Rajshri Yojana : नमस्कार वाचकहो, आज आपण मुख्यमंत्री राजश्री योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. मुख्यमंत्री राजश्री योजना ही राजस्थान सरकारची योजना आहे. ही योजना लवकरच महाराष्ट्रात देखील लागू होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या शैक्षणिक दर्जात सुधार करण्यासाठी आणि मुलींचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मुख्यमंत्री राजश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे.
Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra मुख्यमंत्री राजश्री योजनेचा लाभ राज्यातील सर्व मुलींना होणार आहे. मुख्यमंत्री राजश्री योजनेचा लाभ हा ज्या मुलींचा जन्म 1 जून 2016 नंतर झाला आहे अशा मुलींना घेता येईल. या योजनेमध्ये मुलींना त्यांच्या जन्मापासून तर बारावी पास होईपर्यंत 50 हजार रुपयांची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत केली जाणार आहे.
Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra चला तर मग मुख्यमंत्री राजश्री योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू. मुख्यमंत्री राजश्री योजनेची काय आहेत वैशिष्ट्ये, उद्देश, पात्रता?, या योजनेची काय आहेत कागदपत्रे?, या योजनेचा कुणाला घेता येईल लाभ?, या योजनेची काय आहे अर्ज प्रक्रिया? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू.
Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. त्यासाठी राजस्थान सरकारने मुख्यमंत्री राजश्री योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ 1 जून 2016 नंतर जन्मलेल्या सर्व मुलींना घेतात येईल. ही योजना मुख्यमंत्री शुभलक्ष्मी योजनेच्या जागी नव्याने लागू करण्यात आली आहे.
Mukhyamantri Rajshri Yojana 2024 मुख्यमंत्री राजश्री योजनेअंतर्गत मुलींना 50000 रुपयांचे आर्थिक मदत केली जाणार आहे. ही आर्थिक मदत 6 हप्त्यांमध्ये मुलीला किंवा तिच्या पालकांना तिच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी दिली जाईल. यामुळे मुलींचा सर्वांगीण विकास होईल. समाजात सकारात्मकतेची भावना निर्माण होईल. तसेच मुलींना त्यांचे शिक्षण घेता येईल. या उद्देशाने मुख्यमंत्री राजश्री योजना सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती
Mukhyamantri Rajshri Yojana 2024 Information In Marathi
मुख्यमंत्री राजश्री योजनेची थोडक्यात माहिती
Mukhyamantri Rajshri Yojana 2024 In Short
मुख्यमंत्री राजश्री योजनेचे उद्देश
Mukhyamantri Rajshri Yojana Purpose
मुख्यमंत्र्या राजश्री योजनाचा आर्थिक लाभ
Mukhyamantri Rajshri Yojana Benefits
मुख्यमंत्री राजश्री योजनेची वैशिष्ट्ये
Mukhyamantri Rajshri Yojana Features
मुख्यमंत्री राजश्री योजनेची पात्रता
Mukhyamantri Rajshri Yojana Eligibility
मुख्यमंत्री राजश्री योजनेची कागदपत्रे
Mukhyamantri Rajshri Yojana Documents
मुख्यमंत्री राजश्री योजनेचे अर्ज प्रक्रिया
Mukhyamantri Rajshri Yojana Apply Online 2024
मुख्यमंत्री राजश्री योजनेची थोडक्यात माहिती
Mukhyamantri Rajshri Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | मुख्यमंत्री राजश्री योजना |
कोणी सुरू केली | राजस्थान सरकार |
उद्देश | मुलींचा विकास करणे |
लाभार्थी | राज्यातील मुली |
लाभ | 50 हजार रुपये आर्थिक मदत |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | www.evaluation.rajasthan.gov.in |
मुख्यमंत्री राजश्री योजनेचे उद्देश
Mukhyamantri Rajshri Yojana Purpose
- मुलींचा शैक्षणिक स्तर उंचावण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ करणे, तसेच मुलींचे पालन पोषण व्यवस्थित व्हावे या उद्देशाने मुख्यमंत्री राजश्री योजना सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्य मुलींच्या होणाऱ्या गर्भपाताला आळा बसण्यास भ्रूणहत्या थांबवण्यास मदत होईल.
मुख्यमंत्र्या राजश्री योजनाचा आर्थिक लाभ
Mukhyamantri Rajshri Yojana Benefits
ज्या मुलींचा जन्म राज्यातील कुठल्याही ग्रामीण आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालय किंवा राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालय जेथे योजना लागू आहे अशा ठिकाणी झाला असेल तर या योजनेचा लाभ घेण्यास पालक पात्र आहेत.
या योजनेअंतर्गत 1 जून 2016 नंतर राज्यातील सरकारी दवाखान्यात किंवा जननी सुरक्षा योजना अंतर्गत रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या आईला 2500 रुपयाचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जाईल.
मुख्यमंत्री राजश्री योजना अंतर्गत लाभार्थी महिलेला आर्थिक मदत 6 हत्यांच्या स्वरूपात दिली जाईल.
पहिला हप्ता 2500 रुपये :- मुलीच्या जन्माच्या वेळी
दुसरा हप्ता 2500 रुपये :- मुख्यमंत्री राजश्री योजनेअंतर्गत मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला एक वर्षाच्या आत लागणाऱ्या सर्व लसी दिल्यावर दिले जातील
तिसरा हप्ता 4000 रुपये :- मुलगी पहिली वर्गात गेल्यानंतर
चौथा हप्ता 5000 रुपये :- मुलीने सहावी वर्गात प्रवेश घेतल्यानंतर
पाचवा हप्ता 11000 रुपये :- मुलीने दहावी वर्गात प्रवेश घेतल्या नंतर
सहावा हप्ता 25 हजार रुपये :- मुलगी महाविद्यालयात बारावीला प्रवेश घेईल त्या वेळेला तिला या योजनेअंतर्गत ही रक्कम देण्यात येईल
मुख्यमंत्री राजश्री योजनेची वैशिष्ट्ये
Mukhyamantri Rajshri Yojana Features
- या योजनेअंतर्गत सरकारमार्फत मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे
- मुलीला या योजनेअंतर्गत सरकार जन्मापासून ते बारावीपर्यंत शिक्षणासाठी सहा हप्त्यांमध्ये 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे
- या योजनेमुळे मुलीच्या जन्मदरात वाढ होईल
- या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी मुलीच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाईल
- या योजनेअंतर्गत रुग्णालयात होणाऱ्या प्रस्तुतीला चालना मिळेल
- या योजनेमुळे भ्रूणहत्या थांबेल
मुख्यमंत्री राजश्री योजनेची पात्रता
Mukhyamantri Rajshri Yojana Eligibility
- अर्जदार राजस्थान राज्याची मूळ रहिवासी असावी
- मुलीचा जन्म 1 जून 2016 नंतर झालेला असावा
- मुलीच्या पालकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
- मुलीचा जन्म राज्याच्या सरकारी रुग्णालयात किंवा सरकारी योजना मान्यताप्राप्त असलेल्या खाजगी रुग्णालयात झालेला असावा
- मुलीचे शिक्षण राज्य सरकारच्या शाळेत असणे आवश्यक आहे
मुख्यमंत्री राजश्री योजनेची कागदपत्रे
Mukhyamantri Rajshri Yojana Documents
आई-वडिलांचे आधार कार्ड
प्रसूती दरम्यान आईचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र
मुलीचे आधार कार्ड
भामाशाह कार्ड
जन्म प्रमाणपत्र
ममता कार्ड
आरोग्य कार्ड
दोन अपत्य असल्यास स्वयंघोषणापत्र
शाळा प्रवेशाचा दाखला
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
मुख्यमंत्री राजश्री योजनेचे अर्ज प्रक्रिया
Mukhyamantri Rajshri Yojana Apply Online 2024
Mukhyamantri Rajshri Yojana Apply Online 2024 मुख्यमंत्री राजश्री योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
यासाठी तुम्हाला सरकारी रुग्णालयात जावे लागेल.
तिथून मुख्यमंत्री राजश्री योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.
त्यानंतर संबंधित कार्यालयात अर्ज जमा करावा लागेल.
अर्जाची पडताळणी झाल्यानंतर अर्जदार लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना
वस्त्रोद्योग विणकर बक्षीस योजना
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना