Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशी 2024 ची माहिती व जाणून घ्या शुभ मुहूर्त
Narak Chaturdashi 2024 नरक चतुर्थीच्या दिवसालाच दिवाळीच पहिलं पाणी असे म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यांग स्नान करावे. अभ्यंगस्नान करण्यामागचे एक शास्त्रीय कारण आहे तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृती विशेष महत्त्व आहे.
Narak Chaturdashi 2024 आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण नरक चतुर्दशी संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊ. नरक चतुर्दशी ची कहाणी काय आहे. हे जाणून घेऊ. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Narak Chaturdashi नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केलं जातं. दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशा वेळी या दिवशी अभंग स्नान केल्यामुळे त्वचा मृदू होते. शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळे दिवाळीत अभ्यंगस्नान करावे.
Narak Chaturdashi या दिवशी अभ्यंगस्नाना नंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषक घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे. संपूर्ण शरीरास तेलाची मॉलिश करून आपल्यातील नरक रूपी वासनांचा अहंकार करायचा तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंकार चा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संदेश आहे. नरक चतुर्दशीलाच छोटी दिवाळी म्हणून ओळखले जाते.
नरक चतुर्दशी आणि ग्रामीण संस्कृती
Narak Chaturdashi And Rituals
नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजातील अहंकारी, अत्याचारी, वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी अभंग स्नान केले जाते. या दिवशी घराची साफसफाई, परिसराची सफाई केली जाते. घर सारवले जाते, दारोदारी रांगोळ्या काढल्या जातात, घराला तोरण बांधले जाते.
Narak Chaturdashi And Rituals या दिवशी सूर्याचे पहिले किरण आपल्या घरात पडावे सूर्य प्रकाश प्रमाणे घर सदगुणांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात गायीच्या शेणाने सडासारवण केले जाते. गाईगुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्याही संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून गोमातेची प्रार्थना केली जाते.
शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवसाच्या दिवशी धान्याची पूजा करतात. सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा प्रज्वलित केला जातो.
नरक चतुर्दशीची कहाणी
Narak Chaturdashi And Rituals
नरक चतुर्दशी Narak Chaturdashi 2024 साजरी का केली जाते याची एक कहानी आहे. असुरांचा राजा नरकासुर हा नेपाळच्या दक्षिण प्रांतात राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता आदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्यांनी हिसकावून घेतली. तसेच देव आणि संतांच्या 16000 कन्यांना आपल्या अंतपुरात कैद करून ठेवले होते.
अश्विन कृष्ण चतुर्दशीला नारकासुराचा वध करून श्रीकृष्णांनी या सर्व स्त्रियांची मुक्तता केली. आधी तिची मूल्यवान कर्णकुंडला परत मिळवली. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला सुचिर्भूत करून घेतले म्हणून ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर विजयाचे प्रतीक आहे. या मुलींना समाजात प्रतिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी भगवान कृष्णाने या सोळा हजार कन्येशी विवाह केला. त्यामुळे त्या 16000 मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली. या दिवशी शुभ संकल्प करण्याची रीत आहे.
Narak Chaturdashi नरकासुराने मृत्यूपूर्वी श्री कृष्णाकडे एक वर मागितला की या तिथीला पहाटे जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभंग स्नान करावे. लोकांनी दुःख, अन्याय, वेदना, अज्ञान, अंधार यांच्यापासून मुक्तता मिळावी म्हणून हा दिवस दिवे लावून आनंदाने साजरा केला जातो.
आपल्या सध्याच्या काळात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुंडगिरी, अस्वच्छता इत्यादी नरकासुर घालीत आहेत याचा नायनाट करण्यासाठी पौराणिक काळात भगवान श्रीकृष्ण आले होते मात्र आता आपल्यालाच श्रीकृष्ण बनवून वाईट यांचा नाश करायचा आहे. यंदाच्या नरकदर्शपुरदर्शीला असं ठरवून त्याचा वापर रोजच्या जीवनात करूया तर खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळेल.
काय करावे नरक चतुर्दशीच्या दिवशी
Narak Chaturdashi And Rituals
Narak Chaturdashi नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आंघोळ स्नान करावे यमाच्या नावाने दिवा लावावा कारण यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीसी होते. संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करून नंतर आंघोळ करावी. असे म्हणतात की चतुर्दशीला तेलात लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी घराच्या वेगवेगळ्या भागात 14 दिवे लावले जातात.
काय करू नये नरक चतुर्दशीच्या दिवशी
Narak Chaturdashi And Rituals
या दिवशी मृत्यूची देवता यमाची पूजा केली जाते त्यामुळे कोणत्याही जीवाला इजा करू नये. या दिवशी घरात दक्षिणेकडील भाग अस्वच्छ ठेवू नये. या दिवशी तेल दान करणे हे देखील निसिद्ध आहे कारण देवी लक्ष्मीला क्रोधीत करते. या दिवशी मांसाहार करणे टाळावे. या दिवशी उशिरा झोपू नये कारण देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरात गरिबीला आमंत्रण देते.