Newly Launched Govt Schemes 2024 In Marathi : मोदी सरकारने 2024 मध्ये सुरू केलेल्या योजना

Newly Launched Govt Schemes 2024 : 2024 मध्ये सुरू झालेल्या योजनांची यादी

Newly Launched Govt Schemes 2024 केंद्र सरकारने 2024 मध्ये महिलांसाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अशा अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. मोदी सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यांचा लाभही अनेकांना घेता आला आहे आणि अनेक जण अजूनही या सर्व योजनांचा लाभ घेत आहे. या नवीन योजनांमुळे भारताचे भविष्य बदलले आहे. Kendra Sarkar Yojana List 2024 In Marathi

Newly Launched Govt Schemes 2024 आज आपण या लेखाच्या माध्यमातून मोदी सरकारने 2024 मध्ये कोणकोणत्या योजना सुरू केल्या आहेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. 2024 मध्ये सरकारने आणलेल्या महिलांसाठीच्या, तरुणांसाठीच्या, शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या योजनेची माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सरकार जनतेच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे अनेक योजना सरकार सतत राबवत असते. चला तर मग जाणून घेऊयात 2024 मध्ये कोणत्या नवीन योजना सुरू झाल्या आहेत.

खाली आपण 2024 योजनेची यादी पाहणार आहोत. त्याचबरोबर त्याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे ती पाहणार आहोत.

केंद्र सरकारच्या योजना 2024

Kendra Sarkar Yojana List 2024 In Marathi

  • विमा सखी योजना
  • वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजना
  • पॅन 2.0 योजना
  • पीएम विद्यालक्ष्मी योजना
  • पीएम एंट्रनशिप योजना
  • पीएम ई-ड्राइव्ह योजना
  • पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषोन्नती योजना
  • पीएम सूर्य घर योजना
  • आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

विमा सखी योजना

LIC Bima Sakhi Yojana

Newly Launched Govt Schemes 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी पानिपत हरियाणा येथून LIC विमा सखी योजनेचा शुभारंभ केला आहे. महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी संभाव्य विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्र ही देतील.

LIC Bima Sakhi Yojana या योजनेअंतर्गत देशभरातील 1 लाख महिलांचा विमा एजंट म्हणून समावेश करण्यात येणार आहे. विमा सखी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पण 35 हजार महिलांना विमा सखी बनवण्यात येणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीतून विमा सखी योजना राबवण्यात येत आहे.

LIC Bima Sakhi Yojana विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7000 रुपये मिळतील. दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6000 तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये रक्कम महिलांना मिळेल. महिलांनी टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशन देखील मिळेल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा योजना म्हणून रोजगाराची संधी मिळेल. त्यानंतरच्या टप्प्यात आणखी 50 हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना

One Nation One Subscription Scheme

Kendra Sarkar Yojana List 2024 In Marathi  वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना ONOSतरुणांना समोर ठेवून या योजनेला मोदी सरकारने सुरू केली आहे. वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेसाठी केंद्र सरकारने 6000 कोटींची तरतूद केली आहे. हे पैसे तीन वर्षांसाठी 2025, 2026 आणि 2027 या काळात खर्च केले जाणार आहेत. ONOSया योजनेअंतर्गत 30 आंतरराष्ट्रीय प्रकाशकांची जवळपास 13000 जनरल उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही सुविधा देशभरातील 6300 शिक्षण संस्थांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही योजना इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्कच्या माध्यमातून लागू केली जाणार आहे. One Nation One Subscription Scheme

पॅन 2.0 योजना

PAN Card 2.0

Kendra Sarkar Yojana List 2024 In Marathiदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्ष खालील आर्थिक व्यवहार विषयक समितीने आयकर विभागासाठी 2.0 PAN Card 2.0प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत याची घोषणा करण्यात आली आहे. हे नवीन पॅन कार्ड सध्याच्या पॅन 1.0 चे अपडेटेड व्हर्जन असणार आहे.प्रत्येक आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. आपल्या पॅन कार्डवर 10 अंकी क्रमांक असतो. या क्रमांकामध्ये वापरकर्ते ची संपूर्ण माहिती समाविष्ट करण्यात आलेली असते. या अंकामधील माहिती आयकर विभागाकडून ट्रॅक करण्यात येते. आयकर विभाग आपण करत असलेल्या सर्व आर्थिक व्यवहारावर या पॅन नंबर वरून लक्ष ठेवते. करदात्यांच्या नोंदणी सेवांच्या व्यावसायिक प्रक्रियेची माहिती ठेवण्यासाठी हा एक गव्हर्नन्स उपक्रम असणार आहे.

PAN Card New Update 2024 करदात्यांची नोंदणी सेवा वाढवण्याच्या उद्देशाने आता या योजनेसाठी सरकार 1,435 कोटी रुपये खर्च करणार आहे. केंद्र सरकार आणणाऱ्या नवीन पॅन कार्ड मध्ये क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे ते कार्ड संपूर्ण ऑनलाइन व्यवहारासाठी सक्षम ठरणार आहे. याबरोबरच संपूर्णपणे डिजिटल सुरक्षित आणि प्रभावी आर्थिक प्रणालीच्या दिशेने हे केंद्र सरकारने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल. याचा फायदा देशातील कर्जात्यांनाच नाही तर प्राप्तिकर विभागालाही होणार असल्याची सांगितले आहे. केंद्र सरकारच्या या क्यू आर कोड आणि डिजिटल पॅन कार्ड मुळे आयकर विभागाचे कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येणार आहे.

Kendra Sarkar Yojana List 2024 केंद्र सरकारने आणलेल्या पॅन कार्ड 2.0 PAN Card 2.0 चा मुख्य उद्देश म्हणजे करदात्यांना डिजिटल अनुभवांमध्ये सुलभता आणि तत्काळ सेवा प्रदान करणे हा आहे.याचा सर्वाधिक फायदा करदात्यांना होणार आहे. कारण त्यांना अनेक सेवा सोप्या आणि सहज मिळणार आहेत. नवीन पॅन 2.0 योजनेमुळे डेटा मध्ये नियंत्रण सेवांची तत्काळ डिलिव्हरी, डेटा सुरक्षा, डिजिटलेशन अशा विविध सेवा सुविधा मिळणार आहेत.

Kendra Sarkar Yojana List 2024 केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत पेपरलेस सिस्टीम आणि ती फायदेशीर पायाभूत सुविधांचा वापर करून पर्यावरणास आणि कुलदृष्टिकोन या हेतूने हा पॅन कार्ड 2.0 महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व डिजिटल प्रणालीमध्ये त्यांचा मुख्य ओळख करता म्हणून वापर करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.

पीएम ई-ड्राईव्ह योजना

PM E-Drive Yojana

PM E-Drive Yojanaसरकारने ही योजना 1 ऑक्टोंबर 2024 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू केली आहे. 10 हजार 900 कोटी रुपयांच्या खर्चासह पीएम योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्युत वाहनांना जलद अवलंब करणे, चार्जिंग पायाभूत सुविधांची स्थापना आणि भारतातही उत्पादन परिसंस्थेचा विकास करणे हे आहे. PM E-Drive Yojana पीएम ई-ड्राईव्ह योजने अंतर्गत बॅटरी पॉवरच्या आधारावर इलेक्ट्रिक दुचाकींसाठी प्रति किलोवॅट तास अनुदान 5000 रुपये निश्चित करण्यात आले आहे, तर योजनेच्या दुसऱ्या वर्षात हे प्रति किलो केले जाईल आणि एकूण लाभ 5000 रुपयांपेक्षा जास्त नसेल.

पीएम विद्यालक्ष्मी योजना

PM Vidya Laxmi Yojana 2024

PM Vidya Laxmi Yojana 2024 in Marathi : नवी दिल्लीमध्ये बुधवारी झालेल्या मोदी यांच्या कॅबिनेट बैठकीमध्ये प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ला मंजुरी देण्यात आली आहे.  प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दर्जेदार उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

pm vidya Lakshmi yojana 10-lakh education loan : त्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च बँक किंवा अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून हमीदाराशिवाय खर्च घेऊ शकतो, त्याला कुठलीही गॅरेंटरची आवश्यकता नाही. ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. जेणेकरून कोणताही विद्यार्थी पैशाच्या कारणामुळे उच्च शिक्षण मिळवण्यापासून वंचित राहू नये.

PM Vidya Lakshmi : यामध्ये हायर एज्युकेशनसाठी म्हणजेच उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपयापर्यंत कर्जावर केंद्र सरकार 75 टक्के क्रेडिट गॅरंटी देणार आहे. PM Vidya Lakshmi Yojana 2024 : 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज अनुदान देण्यात येणार आहे. तर 7.5 लाख रुपयेपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वीपासूनच पूर्ण व्याज अनुदान देण्यात येत आहे.

पीएम इंटर्नशिप योजना

PM Internship Scheme 2024 In Marathi

PM Internship Scheme 2024 In Marathi देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव इंटर्नशिप योजना असे ठेवण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 -25 चा अर्थसंकल्प सादर करत असताना इंटर्नशिप योजना सुरू करत असल्याची घोषणा केली होती.

PM Internship Scheme या योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात एक कोटी तरुणांना देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांना 12 महिने चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. याद्वारे निवड झालेल्या तरुणांना दरमहा 5 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर सहभागी झाल्यानंतर त्यांना एक रक्कमी 6 हजार रुपये देखील दिले जातील. या योजनेची अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे.

PM Internship Scheme केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी सरकार इंटर्नशिप प्रदान करण्यासाठी एक नवीन योजना सुरू करत असण्याची घोषणा केली होती. तसेच पुढील 5 वर्षात एक कोटी तरुणांना देशातील टॉप 500 कंपनीमध्ये इंटर्नशिपची संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते. या योजनेच्या माध्यमातून तरुणा व्यवसायाचे वातावरण हा विविध व्यावसायिक क्षेत्रात बारा महिने काम करण्याच्या संधी देण्यात येणार आहे त्यामुळे बेरोजगार तरुणांना लवकरच संधी उपलब्ध होईल.

पीएम राष्ट्रीय कृषि विकास योजना और कृषोन्नति योजना

Krishi Unnati Yojana 2024 In Marathi

Krishi Unnati Yojana कृषी क्षेत्रातील विकासासाठी महाराष्ट्र सरकारने 12 फेब्रुवारी 2023 रोजी कृषी उन्नती योजना सुरू केली आहे. कृषी उन्नती योजना सुरक्षित आणि शाश्वत शेतीसाठी प्रोत्साहन देते. Krishi Unnati Yojana 2024 In Marathi या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनाला चालना देण्यात साठी आर्थिक मदत केली जाते. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत संसाधने देखील प्रदान केली जातात.

Krishi Unnati Yojana 2024 In Marathi कृषी उन्नती योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. कृषी उन्नती योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय शेतकरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्राला येते कृषी शेती करण्यासाठी शेतकरी प्रोत्साहित होतात. शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि उपकरणे दिली जातील. कृषी उन्नती योजनेअंतर्गत पिकांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी अधिक भागात सिंचनाची सोय केली जाते. Krishi Unnati Yojana

पीएम सूर्य घर योजना

PM Surya Ghar Muft Bijli Yojana

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना PM Surya Ghar Muft Bijli Yojana ही एक सरकारी योजना आहे. तिचा उद्देश देशातील घरांना मोफत वीज पुरवणे हा आहे. ही योजना 15 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. PM Surya Ghar Yojana या योजनेअंतर्गत कुटुंबांना आपल्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देण्यात येणार आहेत. सबसिडी सौर पॅनल च्या लागलेल्या खर्चावर 40 टक्के पर्यंत दिली जाईल या योजनेमुळे देशातील एक कोटी कुटुंबीयांना लाभ होण्याची शक्यता आहे.

PM Surya Ghar Yojana या योजनेमुळे सरकारची मोठी बचत होणार आहे. या योजनेसाठी प्रति वर्ष 75 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशात सोलर ऊर्जा क्षमता वाढवण्याची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेद्वारे देशात राहणाऱ्या लाभार्थ्यांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. PM Surya Ghar Muft Bijli Yojana पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून देशात राहणाऱ्या एक कोटी घरांना सौर विजेचा प्रकाश देण्यात येणार आहे.

आयुष्यमान भारत विमा योजना

Ayushman Card Yojana

Ayushman Card केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता देशातील 70 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रत्येक सीनियर सिटीजनला आयुष्यमान भारत योजनेचे आरोग्य विमा चा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ayushman Card आता देशातील 70 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व वृद्धांना PM-JAY प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव केला जाणार नाही. विशेष म्हणजे आता या योजनेमध्ये प्रत्येकाला लाभ दिला जाणार आहे. PM-JAY या माध्यमातून देशातील 70 वर्षावरील अधिक वय असलेले वृद्धांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचाराची सुविधा असलेले आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

70 वर्षापेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज असणार आहे. आता आयुष्यमान भारत योजनेचा फायदा केवळ 12.3 कोटी कुटुंबाला मिळत आहे. मात्र वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेली सुविधेचा लाभ जवळपास 4.5 कोटी कुटुंबांना म्हणजेच 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.