online registration on digipravesh app for entry into mantralaya In Marathi : ऑनलाइन नोंदणी केल्यावरच मंत्रालयात मिळणार प्रवेश

online registration on digipravesh app for entry into mantralaya Information In Marathi : कशी आहे मंत्रालय सुरक्षा

online registration on digipravesh app for entry into mantralaya In Marathi : मंत्रालयात येणाऱ्या हजारो वाहनांना प्रवेश देण्याच्या संदर्भात सरकारने मंत्रालय सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. विविध कामांसाठी मंत्रालयात हजारो लोक ये -जा करतात.

येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे राज्य सरकारच्या एका ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यानंतरच मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. त्या ॲपचे नाव आहे Digi Pravesh डीजी प्रवेश.

DigiPravesh डीजी प्रवेश या ॲपवर नोंदणी करून मिळणाऱ्या कयूआर कोड आधारित मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काहीतरी कामाचे निमित्त करून मंत्रालयात येणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांनाही यापुढे परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही.

मंत्रालयाची सुरक्षा आणि दररोज येणारे हजारो नागरिक व वाहने मंत्रालयात प्रवेश देण्यासंदर्भात सरकारने मंत्रालय सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पा अंतर्गत चेहरा पडताळणीच्या आधारे लोकांना मंत्रालयात प्रवेश देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

Mantralaya News In Marathi या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात क्षेत्रीय अधिकारी आणि अभ्यागतांना ॲप आधारित व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी डीजीप्रवेश DigiPravesh हे एक नवीन ॲप विकसित करण्यात आले आहे. मंत्रालयात येणाऱ्या इतर सर्व साधारण अभ्यासताना दुपारी 2 वाजल्यानंतर प्रवेश देण्यात येईल.

Mantralaya News In Marathi अशा प्रवेशासाठी त्यांना ॲपवर प्रवेश पास घेऊन मंत्रालयात प्रवेश घेता येईल. त्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड असे सरकार मान्य ओळखपत्र सादर करावे लागेल. अभ्यागतांना मंत्रालयाच्या ज्या विभागात प्रवेश आवश्यक आहे केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश मिळेल. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास कारवाई केली जाईल. Mantralaya News In Marathi

अत्यंत महत्त्वाचे

Mantralaya News 2025 In Marathi

  • राज्यभरातील क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामासाठी मंत्रालयात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना डीजी प्रवेश या ऑनलाइन आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश दिला जाईल.
  • यासाठी ॲपद्वारे नोंदणी करावी लागेल त्यानंतर मिळालेल्या क्यूआर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशासाठी आरएफआयडी कार्ड वितरित करण्यात येईल. या कार्ड च्या आधारे सुरक्षाविषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश मिळेल.
  • अभ्यागतांना मिळालेले प्रवेश ओळखपत्र परिधान करणे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक असेल.
  • विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कामानिमित्त मंत्रालयात प्रवेश हवा असल्यास त्यांनाही ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्या विभागांमध्ये कामानिमित्त भेट द्यायची आहे त्या विभागाच्या संमतीने मंत्रालयात सकाळी 10 वाजल्यापासून प्रवेश मिळेल.
  • क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांना बैठकीसाठी मंत्रालयात आमंत्रित केले असल्यास बैठक पत्र सूचना बैठकीच्या किमान एक दिवस अगोदर अॅपवर अपलोड करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बैठकीसाठी संबंधित विभागांनी जास्तीत जास्त 2 अधिकाऱ्यांना पाठवावे.
  • बैठक किंवा सुनावणीसाठी अधिकारी लोकांना किंवा वकिलांना न बोलवता ऑनलाइन सुनावणी घ्यावी असे गृह विभागाच्या आदेशात नमूद केले आहे.