Pradhanmantri Vishwakarma Yojana List 2025 In Marathi : तुम्ही केलाय का पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रशिक्षणासाठी अर्ज
Pradhanmantri Vishwakarma Yojana List 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशभरातील स्किल असलेल्या तरुणांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात आले होते. आता या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण साठी निवड झालेल्या तरुणांची यादी प्रसिद्ध झाली आहे.
Pradhanmantri Vishwakarma Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लघु उद्योग करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 18 पेक्षा अधिक व्यवसायांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून ते आपला व्यवसाय वाढू शकतील. पंतप्रधान विश्वकर्मा योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. याचा लाभ देशभरातील बारा बलुतेदारांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
Pradhanmantri Vishwakarma Yojana प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून छोटे उद्योग करणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्यात येते. 2023 पासून ते आतापर्यंत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेशी लाखो नागरिक जोडल्या गेल्या आहेत. या योजनेसाठी नोंदणी झाल्यानंतर त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी सरकारी लाभ मिळाले आहेत.
अशा व्यक्ती ज्यांनी नुकताच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज केला आहे. त्या सर्वांसाठी एक योजनेची महत्त्वाची लेटेस्ट बातमी समोर आली आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजना ची नवीन यादी बद्दल माहिती देणार आहोत.
Pradhanmantri Vishwakarma Yojana प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून नवीन अर्ज करणाऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर यादी प्रसिद्ध झाली आहे. या ट्रेनिंग सेंटर माध्यमातून ज्या व्यक्तींची नावे यादीत आले आहेत त्या सर्व व्यक्तींना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना च्या माध्यमातून मोफत त्यांच्या स्किलच्या आधारावर ट्रेनिंग देण्यात येणार आहे. त्यामुळे या यादीत तुमचे नाव आहे का हे तुम्ही तपासून घ्या.
PM Vishwakarma Yojana जर तुम्ही ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर या नवीन ट्रेनिंग सेंटर यादीत तुमचे नाव आहे का हे तपासा. ही यादी पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर नवीन ट्रेनिंग लिस्ट मध्ये आपले नाव तुम्ही तपासू शकता.
ठळक मुद्दे
तुम्ही केलाय का पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रशिक्षणासाठी अर्ज
Pradhanmantri Vishwakarma Yojana List 2025 In Marathi
पीएम विश्वकर्मा योजना प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
PM Vishwakarma Yojana Features
प्रशिक्षणादरम्यान किती मिळेल वेतन
PM Vishwakarma Yojana 2025
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची पात्रता
PM Vishwakarma Yojana Eligibility
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सर्टीफिकेट
पीएम विश्वकर्मा प्रशिक्षण यादी कशी चेक करावी
Pradhanmantri Vishwakarma Yojana List
पीएम विश्वकर्मा योजना प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
PM Vishwakarma Yojana Features
- या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत अर्जाच्या आधारावर प्रशिक्षण दिले जाते.
- प्रशिक्षणा दरम्यान उमेदवारांना त्यांच्या स्किलच्या आधारावर कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते.
- या योजनेअंतर्गत महिला आणि पुरुष दोघेही आपल्या स्कीनुसार प्रशिक्षण घेऊ शकतात.
- ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना जेवण, पाणी, राहणे आणि सोबतच चांगले वेतन हे दिले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवार देशाभरामध्ये या स्किलच्या आधारावर कुठेही आपला व्यवसाय सुरू करू शकतात.
प्रशिक्षणादरम्यान किती मिळेल वेतन
PM Vishwakarma Yojana 2025
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना वेतनही दिले जाते त्यामुळे त्यांचा प्रशिक्षण कालावधी ही निश्चित करण्यात आलेला असतो.
- योजनेच्या नियमानुसार ज्या व्यक्तींची या प्रशिक्षणासाठी निवड होते अशा व्यक्तींना प्रतिदिन याप्रमाणे 500 रुपयांपर्यंतचे वेतन देण्यात येते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची पात्रता
PM Vishwakarma Yojana Eligibility
- PM Vishwakarma Yojana प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या नवीन ट्रेनिंग लिस्ट मध्ये या व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ट्रेनिंग लिस्ट मध्ये आर्थिक दृष्ट्या मागास व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.
- असे व्यक्ती जे छोट्या व्यवसाय करत आहेत किंवा आपल्या आवडीच्या व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत अर्ज केला आहे त्यांचे नावे ट्रेनिंग लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
- या ट्रेनिंग लिस्ट मध्ये मुख्य करून असंघटित क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे.
- ज्या व्यक्तींचे अर्ज या योजनेच्या पोर्टलने स्वीकारले होते केवळ अशाच व्यक्तींची या ट्रेनिंग लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सर्टीफिकेट
PM Vishwakarma Yojana पीएम विश्वकर्मा योजना योजनेची सदस्यता घेणाऱ्या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात येते. जे प्रशिक्षण घेतल्या नंतर दिले जाते. तसे पाहिले तर हे प्रमाणपत्र ट्रेनिंग सेंटर मध्ये दिले जाते. याव्यतिरिक्त अधिक सुविधा साठी योजनेच्या प्रमाणपत्र या ऑनलाइन आधारित वेबसाईटच्या माध्यमातूनही डाउनलोड करू शकता.
पीएम विश्वकर्मा प्रशिक्षण यादी कशी चेक करावी
Pradhanmantri Vishwakarma Yojana List
- प्रशिक्षणाची यादी पाहण्यासाठी सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर लेटेस्ट अपडेट यावर क्लिक करा.
- येथून तुम्ही पीएम विश्वकर्मा योजना प्रशिक्षण यादी या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक यादी येईल त्यावर क्लिक करा आणि आपले राज्य, जिल्हा निवडा.
- आता तुमच्यासमोर स्क्रीनवर एक कॅपचा विचारला जाईल तो भरा.
- त्यानंतर सर्च या ऑप्शनवर क्लिक करा.
- अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमच्या जिल्ह्यातील पीएम विश्वकर्मा योजनेची प्रशिक्षण यादी दिसेल. येथून उमेदवार आपले नाव सहज पद्धतीने शोधू शकेल.