Rajshree Shahu Maharaj Scholarship 2024 In Marathi : राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेतून घ्या उच्च शिक्षण

Table of Contents

Rajshree Shahu Maharaj Scholarship 2024 In Marathi : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024 मराठी माहिती

Rajshree Shahu Maharaj Scholarship 2024 In Marathi : महाराष्ट्र सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचे शुल्क पूर्ण किंवा अंशतः परत मिळते. यामुळे त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुलभ होत आहे आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होत आहे.

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship  छत्रपती राजर्षी उच्चशिक्षण संचालनालय महाराष्ट्र सरकार यांनी पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 2024 सुरू केलेली आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिक दृष्ट्या कुमकुवत वर्ग EWS वर्गातील अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन आणि चाचणी खर्चाची 100% रक्कम परतफेड केली जाते.

Rajshree Shahu Maharaj Scholarship

महाराष्ट्र सरकार राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. या योजनेचा भाग म्हणूनच राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Scholarship सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना होत आहे.

आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण Rajshree Shahu Maharaj Scholarship राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना म्हणजे काय?, या योजनेचा कोणाला लाभ होतो?, या योजनेसाठी कोण पात्र आहे? या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना म्हणजे काय

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Details

महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हा राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti राजर्षी शाहू योजनेच्या माध्यमातून शालेय परीक्षेत 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दरमहा 300 रुपये प्रमाणे या योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. (10 महिने- प्रत्येकी 11 वी आणि 12 वी साठी) ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती आणि फेलोशिप व्यतिरिक्त देण्यात येते.

Rajarshi Shahu Maharaj Shishyavrutti महाराष्ट्र सरकारचे उच्च शिक्षण विभाग राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती देत आहे. यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊन उच्च शिक्षण घेऊ शकतील. विद्यार्थ्यांना ते घेत असलेल्या उच्च शिक्षणासाठी लागणारी संपूर्ण रक्कम 100% या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप साठी अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र, मागील वर्षाच्या आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीची अंतिम मुदत यावर्षीची 31 मार्च 2024 होती.

Rajshree Shahu Maharaj Scholarship

ठळक मुद्दे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024 मराठी माहिती

Rajshree Shahu Maharaj Scholarship 2024 In Marathi

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना म्हणजे काय

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Details

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेची थोडक्यात माहिती

Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana In Short

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचा उद्देश

Rajshree Shahu Maharaj Scholarship Purpose

राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचे फायदे

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Benefits

छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचे वैशिष्ट्ये

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Features

शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती

Rajshree Shahu Maharaj Scholarship

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठीची पात्रता

Rajarshi Shahu Maharaj Shishyavrutti Eligibility

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेसाठी चे नियम आणि अटी

Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti Terms And Conditions

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Rajshree Shahu Maharaj Scholarship Documents

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

Rajshree Shahu Maharaj Scholarship Online Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेची थोडक्यात माहिती

Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana In Short

योजनेचे नावराजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
उद्देशविद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे
लाभप्रति महिना 300 रुपये
लाभार्थीअकरावी बारावी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://mahadbt.maharashtra.gov.in/
Rajshree Shahu Maharaj Scholarship

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचा उद्देश

Rajshree Shahu Maharaj Scholarship Purpose

  • Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांची शिक्षणाबद्दलची आवड वाढवणे.
  • उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे.
  • राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे.
  • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी इतर कोणावर अवलंबून राहू राहावे लागू नये म्हणून ही योजना सरकारने सुरू केलेली आहे.
  • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे हा राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना चा उद्देश आहे.
  • पैसा अभावी कुठल्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचे फायदे

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Benefits

  • या योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण शुल्काची 50 ते 100% परत मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबावरील आर्थिक भार कमी करण्यास मदत होते त्यांना अधिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करता येते.
  • या योजनेच्या माध्यमातून मदत होत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत होत आहे.
  • ही शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थी शिक्षण शुल्काची चिंता न करता शिक्षण पूर्ण करू शकतात.
  • Chhatrapati Shahu Maharaj Scholarship योजनेच्या माध्यमातून राज्यात समानता निर्माण करणे हा सरकारचा उद्देश आहे.
  • समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे समान संधी उपलब्ध करून देणे साठी सरकार प्रयत्न करत आहे.
  • Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेच्या माध्यमातून मदत करून मागासवर्गीय आणि गरीब घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वतःचा उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभा राहून आत्मनिर्भर होऊ शकतो.
  • राज्यातील शिक्षणातील गळती कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरताना दिसत आहे.
  • या योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची आवड निर्माण होईल. याबरोबरच राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यासाठी ही मदत होईल.
  • या योजनेमुळे विद्यार्थ्यांचा सामाजिक आर्थिक विकास होण्यास मदत होईल

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचे वैशिष्ट्ये

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Features

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना Rajshree Shahu Maharaj Scholarship महाराष्ट्र सरकारचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप च्या मदतीने या योजनेच्या साठी अर्ज करू शकतो. त्यामुळे त्याला त्याचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.
  • Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी शिष्यवृत्ती थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने जमा होईल.
  • मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि शिक्षणासाठी कोणाकडूनही व्याजाने पैसे घेण्याची गरज राहणार नाही.
  • Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे हा सरकारचा ही योजना सुरू करण्यामागील उद्देश आहे.
  • त्याचा लाभ राज्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होत आहे आणि ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. त्यामुळे राज्यातील साक्षरतेचे प्रमाणही वाढण्यास मदत होत आहे.
Rajshree Shahu Maharaj Scholarship

शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती

Rajshree Shahu Maharaj Scholarship

वार्षिक उत्पन्नसरकारीखाजगीअंशतःअनुदानित/विनाअनुदानितकायम विनाअनुदानित
2,50,000100%100%50%50%
2,50,000 ते 8 लाख50%50%50%50%
8,00,000100%100%100%100%

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठीची पात्रता

Rajarshi Shahu Maharaj Shishyavrutti Eligibility

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.  
  • विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.  
  • .अर्जदार विद्यार्थी अकरावी किंवा बारावी वर्गात शिक्षण घेत असलेला असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्याला शालेय परीक्षेत 75 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन तो उत्तीर्ण झालेला असावा.

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेसाठी चे नियम आणि अटी

Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti Terms And Conditions

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • तथापि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सीमा भागातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • राज्यातील केवळ अनुसूचित जातीतील विद्यार्थी गुणवत्तेच्या आधारे या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • एका कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • Chhatrapati Shahu Maharaj Scholarship योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची वर्गातील हजेरी 50% असणे गरजेचे आहे. तरच त्याला या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारचा इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेचा लाभ अर्जदार विद्यार्थ्यांना विद्यार्थी अर्धवेळ किंवा पार्ट टाइम शाळेत प्रवेश घेत असेल तर त्याला मिळणार नाही.
  • सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना पैकी केवळ एका योजनेचा लाभ मिळाल्यास संबंधित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असू शकतो.
  • लाभार्थी शिक्षण घेत असलेले संस्था शासनात विद्यापीठ शिक्षण मंडळ यांची पूर्व मान्यता व संलग्नता असे संबंधित असले पाहिजे.
  • अर्जदार विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र व वर्षाची परीक्षा देणे आवश्यक आहे.
  • मागील वर्षी शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
  • जर एखाद्या विद्यार्थ्यास अजारपणामुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे परीक्षा देणे शक्य नसल्यास तसे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थेने शिफारस केल्यानंतर संबंधित प्रशासकीय विभागातील उपसंचालक, सहसंचालक व सक्षम अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा करिता प्रवेश घेतल्यानंतर एखाद्या सेमिस्टर ची परीक्षा दिली नसल्यास किंवा एखाद्या शैक्षणिक वर्षात अनूउत्तीर्ण झाल्याने त्या वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास पुढील वर्षाकरिता या योजनेअंतर्गत सदर विद्यार्थी लाभ मिळण्यास अपात्र राहील. तथापि पुनश्च त्या वर्षात परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अथवा अंशतः उत्तीर्ण झाल्याने ATKT घेतल्यास त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाल्यास सदर योजनेतील लाभासाठी पुन्हा पात्र ठरेल. परंतु असे पात्र लाभार्थी अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या एकूण कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळ पूर्णतः उत्तीर्ण झाल्यामुळे त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास संबंधित विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या उर्वरित कालावधीसाठी सदर योजनेअंतर्गत लाभाकरता कायमस्वरूपी अपात्र ठरेल.
  • अर्जदार विद्यार्थी चुकीच्या वर्तनामुळे शैक्षणिक प्रगती करत नसल्याबाबत किंवा संबंधित प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय अनियमित असणे अथवा गैरहजर राहणे इत्यादी स्वरूपाचे गैरवर्तन करत असल्याचे संबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांनी निदर्शनास आणले तर अशा विद्यार्थ्यांची शुल्क शिष्यवृत्ती थांबवली किंवा रद्द केली जाऊ शकते.
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित शिष्यवृत्ती प्रदान केल्या नंतर अभ्यासक्रम संबंधित विद्यार्थ्यांनी मध्ये सोडला तर अशा विद्यार्थ्यास प्रदान केलेली शिष्यवृत्तीची रक्कम राज्य सरकारी योग्य वाटल्यास त्याच्याकडून वसूल करते.
  • लाभार्थी विद्यार्थी व संबंधित शिक्षण संस्था यांनी सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सादर केलेला अर्जदार चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती निदर्शनास आल्यास उर्वरित अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी लाभ देण्यात येणार नाही. त्या विद्यार्थ्याला संस्थेला त्यांनी सादर केल्या चुकीच्या माहितीच्या आधारे मिळालेल्या लाभाची संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल. व कोणत्याही अन्य योजना अंतर्गत संबंधित विद्यार्थ्यास लाभ मिळण्यास प्रतिबंध करण्यात येईल.
  • Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेसाठी विद्यार्थी सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शकतो.
  • विद्यार्थ्याकडे स्वतःच्या बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबातील व्यक्तीचे बँक खाते मान्य केले जाणार नाही. याबरोबरच अर्जदार विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे ही गरजेचे आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Rajshree Shahu Maharaj Scholarship Documents

अर्जदाराचे आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

दहावी उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पासबुक फोटो

जातीचे प्रमाणपत्र

शाळा सोडल्याचा दाखला

अकरावीत प्रवेश घेतल्याची पावती

Rajshree Shahu Maharaj Scholarship

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

Rajshree Shahu Maharaj Scholarship Online Apply

टप्पा पहिला-

Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम विद्यार्थ्याने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.

त्यानंतर त्याच्यासमोर योजनेचे होमपेज उघडेल त्यावर असलेला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी

संपूर्ण माहिती भरून झाल्यावर एकदा तपासून घ्यावी माहिती तपासून घेतल्यानंतर रजिस्टर या पर्याय वर क्लिक करावे

अशा सोप्या पद्धतीने नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल

टप्पा दुसरा-

अर्जदाराला आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून पुन्हा लॉगिन करावे लागेल

टप्पा तिसरा-

अर्जदाराला होमपेज वर जाऊन पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती या पर्यायावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर social justice and special assistance Department  या पर्यावर क्लिक करावे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज मिरीट स्कॉलरशिप हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे

आता तुमच्यासमोर या शिष्यवृत्तीची संपूर्ण माहिती उघडेल ती वाचून खाली Apply For This Scheme या पर्यावर क्लिक करावे

यानंतर तुमच्यासमोर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज उघडेल

अर्ज उघडल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी

माहिती भरून झाल्यावर विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करून रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावे

अशा प्रकारे तुमची या शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कसा करावा?

उत्तर: Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

प्रश्न: या योजनेची अधिक माहिती कुठे मिळेल?

उत्तर: सरकारच्या महाडीबीटी पोर्टल ला भेट दिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल किंवा उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधूनही तुम्ही या योजनेची माहिती घेऊ शकता.

प्रश्न: राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती योजनेची स्थिती कशी कळेल?

उत्तर: विद्यार्थी महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात.

प्रश्न: अर्ज करताना काही अडचणी येत असल्यास काय करावे?

उत्तर: विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वरील हेल्प डेट शी संपर्क साधून किंवा उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना मदत मिळेल.

प्रश्न: ही योजना कोणत्या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे?

उत्तर: या योजनेसाठी केंद्रीय कृत प्रवेश प्रक्रिये द्वारे निवडक व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.

प्रश्न: राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप अंतर्गत किती रुपयाची आर्थिक मदत केली जाते?

उत्तर: या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% शिष्यवृत्ती दिली जाते.

प्रश्न: राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश काय?

उत्तर: मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रश्न: राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे?

उत्तर: या योजनेचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना घेता येतो.

प्रश्न: राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजने अंतर्गत किती रुपये शिष्यवृत्ती देते?

उत्तर: अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दरमहा तीनशे रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA