Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 In Marathi : शेतकऱ्यांच्या विकासासाठी आर्थिक मदत

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 Information In Marathi : राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024 मराठी माहिती

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 In Marathi : केंद्र सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024 सुरू केली आहे. कृषी क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आहे.

Rashtriya Krishi Vikas Yojana

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 In Marathi या योजनेच्या माध्यमातून कृषी व्यवसायाला आर्थिक मदत करून शेतकऱ्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत केली जाते. राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007 मध्ये सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. कृषी क्षेत्राचा विकास करणे हा उद्देश या योजनेचा आहे. कृषी आणि कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने यासाठी अतिरिक्त योगदान देण्यात दिले आहे..

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 In Marathi आज आपण या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे काय?, या योजनेसाठी अर्ज कसा करावा?, या योजनेसाठी कोण पात्र आहेत?, याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 कृषी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विकास निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना एक छत्री योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेने मोठा पल्ला गाठला आहे आणि दोन योजना कालावधीत अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये सार्वजनिक गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते.

Rashtriya Krishi Vikas Yojana मंत्रिमंडळाने 1 नोव्हेंबर 2017 पासून सुरू केलेल्या केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY), राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी आणि सलग्न क्षेत्रासाठी महत्त्वाची म्हणून RKVY योजना चालू ठेवण्यास मान्यता दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन वर्षासाठी म्हणजेच 2017 -18 ते 2019 -20 या वर्षात कालावधीत 15 हजार 722 कोटीची आर्थिक वाटप करण्यात आले होते. या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळकट करून त्यांची जोखीम कमी करणे आणि कृषी व्यवसाय उद्योजकाला चालना देऊन शेती फायदेशीर करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

Rashtriya Krishi Vikas Yojana केंद्र सरकारची राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY ही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची एक महत्त्वाची योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रांचा पायाभूत विकास करणे हा आहे.

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून कृषी व्यवसाय आणि कृषी व्यवसायाला आर्थिक मदत तसेच पोषण प्रदान करून व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाते. इकोसिस्टीम सुधारित योजना RKVY-RAFTAAR माध्यमातून एक नवीन घटक 2018-19 मध्ये 2% प्रशासकीय खर्च वार्षिक पर्तव्यासह 10 टक्के सुरू करण्यात आला आहे.

RKVY-RAFTAAR कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून कृषी व्यवसाय वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये देशातील सहभागी शैक्षणिक तांत्रिक व्यवसाय कहाणी RD  संस्थाकडे आधीच उपलब्ध असलेल्या इनक्युबेशन सुविधा आणि कौशल्याचा उपयोग वैयक्तिक आणि सामूहिक आधारावर समन्वय साधण्यासाठी केला जातो. सध्याच्या संस्थात्मक कृषी व्यवसाय इनक्युबेशनला अनुदान देऊन गरजेच्या आधारावर बळकट केले जाते.  

ठळक मुद्दे

राष्ट्रीय कृषी विकास योजना 2024 मराठी माहिती

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 Information In Marathi

राष्ट्रीय कृषी विकास योजना ची थोडक्यात माहिती

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 In Short

राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे उद्दिष्ट

Rashtriya Krishi Vikas Yojana Purpose

राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे वैशिष्ट्ये

Rashtriya Krishi Vikas Yojana Features

राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेले घटक

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 In Marathi

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची पात्रता

Rashtriya Krishi Vikas Yojana Eligibility

राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठीची कागदपत्रे

Rashtriya Krishi Vikas Yojana Documents

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची अर्ज प्रक्रिया

Rashtriya Krishi Vikas Yojana Online Apply

राष्ट्रीय कृषी विकास योजना ची थोडक्यात माहिती

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 In Short

योजनेचे नावराष्ट्रीय कृषी विकास योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकारने
कधी सुरू केली2007
लाभार्थीदेशातील सर्व शेतकरी
विभागकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
उद्देशकृषी क्षेत्राचा विकास करणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://rkvy.nic.in
Rashtriya Krishi Vikas Yojana

राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे उद्दिष्ट

Rashtriya Krishi Vikas Yojana Purpose

  • कृषी आणि कृषी शी संबंधित क्षेत्राचा विकास करणे.
  • कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे.  
  • कृषी व्यवसाय चालना देणे.
  • सर्व राज्यांना त्यांच्या स्थानिक गरजा नुसार नियोजन करताना लवचिकता केंद्र सरकारकडून पुरवली जाते.
  • देशातील शेतकऱ्यांच्या गरजेनुसार राज्य व जिल्हा स्तरावर योजना तयार करून शेतकऱ्यांना मदत केली जाते.
  • शेती संबंधित व्यवसाय करण्यास शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवणे.
  • कौशल्य विकास नवकल्पना व शेती व्यवसाय करण्यासाठी तरुणांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे.
  • राज्यातील महत्त्वाच्या पिकांमधील उत्पादन वाढवणे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे वैशिष्ट्ये

Rashtriya Krishi Vikas Yojana Features

  • राष्ट्रीय कृषी विकास योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे.
  • मागील 3 वर्षाच्या सरासरी खर्चाच्या आधारे पायाभूत खर्चाची गणना करण्यात येते.
  • या योजनेच्या माध्यमातून संबंधित क्षेत्रातला संयुक्तपणे एकत्र करण्याचे काम केले जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून आर्थिक वाटप करण्यात येते जेणेकरून शेतकऱ्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत होईल.
  • राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे जिल्हा आणि राज्यस्तरावर कृषी आराखडे तयार करणे अनिवार्य आहे.
  • या योजना निश्चित ठरवलेल्या कालावधी प्रकल्पांना मान्यता देणे.
  • केंद्र सरकारची ही योजना राज्य सरकारकडून राज्यभरात राबवली जाते.
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना निश्चित कालावधी असलेल्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे काम करते.
  • राज्य सरकारने RKVY-RAFTAAR योजनेच्या निकषाचे पालन करून शेतीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे त्यांनी RKVY या योजनेतून बाहेर पडले तरीही अंमलबजावणी सुरूच ठेवली पाहिजे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेले घटक

Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 In Marathi

  • फलोत्पादन
  • दुग्ध व्यवसाय
  • मत्स्य व्यवसाय
  • पीक संवर्धन
  • कृषी संशोधन आणि शिक्षण
  • कृषी वित्तीय संस्था
  • मृद आणि जलसंधारण
  • अन्न साठवणूक आणि गोदाम
  • वृक्षरोपण आणि कृषी विपणन
  • वनीकरण आणि वन्यजीव
  • इतर कृषी कार्यक्रम आणि सहकार्य

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची पात्रता

Rashtriya Krishi Vikas Yojana Eligibility

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देशाची नागरिक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी तुमच्याकडे शेती असणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पात्र आहेत.
  • राज्य कृषी आराखडे (SAP) आणि जिल्हा कृषी राकडे (DAP) तयार करणे.
  • केंद्र सरकारने निधी वाटप केल्यानंतर राज्य सरकारची रक्कम थेट शेतकरी किंवा कृषी क्षेत्राशी संबंधित समूहाला व्यतिरिक्त करते.
  • अर्जदार शेतकरी कृषी किंवा कृषी संबंधित क्षेत्रात काम करणारा असावा.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठीची कागदपत्रे

Rashtriya Krishi Vikas Yojana Documents

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

वयाचा पुरावा

पासपोर्ट आकाराचा फोटो

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

RKVY प्रकल्पांतर्गत निधी प्राप्तीसाठी राज्यांना सादर करावयाच्या कागदपत्राची यादी

प्रेमासिक आधारावर कार्य प्रदर्शन अहवाल (भौतिक आणि आर्थिक उपलब्धता) आणि दिलेल्या कालावधीत परिणाम निर्देशित स्वरूपात देणे आवश्यक आहे

मागील आर्थिक वर्षापर्यंत वाटप केल्या निधीसाठी 100% उपयोगिता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे

Rashtriya Krishi Vikas Yojana

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची अर्ज प्रक्रिया

Rashtriya Krishi Vikas Yojana Online Apply

राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचे होम पेज उघडेल.  

त्यानंतर तुम्हाला होम पेजवर Apply Now हा पर्याय दिसेल.

त्यावर क्लिक करा यानंतर तुमच्या समोर स्क्रीनवर एक अर्ज उघडेल.

या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा.

त्यानंतर तिथे विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.

कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर एकदा अर्ज तपासून घ्या.

अर्ज तपासून झाल्यानंतर तुमच्या समोर सबमिट बटन असा ऑप्शन असेल.

त्यावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

फ्री शौचालय योजना

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना

कडबा कुट्टी मशीन योजना

स्त्री शक्ति योजना

फ्री लॅपटॉप योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

प्रधानमंत्री जनमन योजना

अस्मिता योजना

उद्योगिनी कर्ज योजना

किशोरी शक्ति योजना

रोजगार हमी योजना 

बाल संगोपन योजना

निर्धुर चूल योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

श्रावण बाळ योजना

बालिका समृद्धी योजना

वन नेशन वन रेशन कार्ड योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना