Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 Information In Marathi : शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 मराठी माहिती
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. या योजनेचा भाग म्हणूनच महाराष्ट्र सरकारने शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेळी पालन, कुक्कुटपक्षी, गाय म्हशी पालनासाठी शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 केंद्र आणि राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवत असते. या योजनेचा भाग म्हणूनच शरद पवार यांच्या जन्म तारखेच्या दिवशी 12 डिसेंबर 2020 रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना गाई म्हशींना गोठा बांधण्यासाठी तसेच शेळ्यांना शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 राज्यातील शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोड व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करणे त्याबरोबर शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून केली जाते सर्वात महत्त्वाचे म्हणजे पशुपालन चे ऊन, वारा, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेड बांधणे आवश्यक असते. हे शेड बांधण्यासाठी मोठा खर्च येतो मात्र सरकारने ही समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांना शेड बांधण्यासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत अनुदान स्वरूपात केली जाते. जेणेकरून शेतकरी आपल्या जनावरासाठी आणि पशुपक्ष्यांसाठी सुरक्षित शेड निर्माण करू शकतील.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र शरद पवार ग्राम समृद्धी योजना म्हणजे काय?, या योजनेसाठी अर्ज कसा करावा?, यासाठी काय पात्रता आहे?, याचा लाभ कोणाला मिळणार? या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पहा.
ठळक मुद्दे
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 मराठी माहिती
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 Information In Marathi
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची थोडक्यात माहिती
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 In Short
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे उद्दिष्ट
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 Purpose
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचे फायदे
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 Benefits
शरद पवार ग्राम समृद्धी द्वारे यांना दिले जाते अनुदान
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 In Marathi
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची पात्रता
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana Eligibility
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 Documents
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची अर्ज प्रक्रिया
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 Apply
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची थोडक्यात माहिती
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | शरद पवार ग्राम समृद्धी योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
उद्देश | राज्यातील शेतकऱ्यांचा व खेड्यांचा विकास करणे |
लाभार्थी | राज्यातील सर्व नागरिक |
लाभ | व्यवसायासाठी अनुदान |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे उद्दिष्ट
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 Purpose
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक विकास करणे. त्यांचे जीवनमान सुधारणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शेड बांधून त्यांच्या जनावरांचा थंडी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करू शकतील.
- Sharad Pawar Gram Samriddhi Yojana या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती बरोबरच शेतीला जोड असा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
- शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- यासाठी शेतकऱ्यांचा आर्थिक सामाजिक विकास केला जातो.
- शेती बरोबरच जोडधंदा म्हणून पशुपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते.
- शेतकऱ्यांना पशुपालनासाठी अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांना गोठा बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. जेणेकरून ते शेड बांधून आपल्या जनावरांना सुरक्षित ठेवू शकते.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचे फायदे
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 Benefits
- राज्यातील सर्व शेतकरी शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्यासाठी मोठा गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
- शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक मदत हे अनुदानाच्या स्वरूपात केली जाते. या योजनेद्वारे दिली जाणारी मदत डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
- या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून शेतकऱ्याची स्थिती सुधारण्यास मदत होते.
- शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
शरद पवार ग्राम समृद्धी द्वारे यांना दिले जाते अनुदान
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 In Marathi
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे, शेळीपालनासाठी शेड बांधणे, कुकूटपालनासाठी शेड बांधणे व भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते कोणत्या कामासाठी किती अनुदान दिले जाते ते पाहू.
- गाय व म्हशी साठी पक्का गोंठा बांधण्यासाठी अनुदान
शेतकऱ्यांना 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधता येतो. त्यासाठी 77,188 रुपये अनुदान देण्यात येते. 6 पेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट स्वरूपात अनुदान दिले जाते.
- शेळी पालन शेड बांधण्यासाठीचे अनुदान
शेतकऱ्यांना 10 शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान देण्यात येते. तर 20 शेळ्यांसाठी दुप्पट तर तीस करिता तिप्पट अनुदान या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. मात्र यासाठी अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर किमान 2 शेळ्या असणे आवश्यक आहेत. असं शासन निर्णयात म्हटले आहे.
- कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी अनुदान
100 पक्षांसाठी शेड बांधण्यासाठी 49760 रुपये अनुदान देण्यात येते तर 150 पेक्षा अधिक पक्षी असल्यास दुप्पट निधी दिला जातो. मात्र समजा एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारासह शेडची मागणी करावी लागेल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यातील बहुतांश शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात करतात मात्र पक्षांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांचा ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याकडे पाहिजे तसा निवारण व्यवस्था नसते यात अडचणी लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना शेड बांधण्यासाठी अनुदान योजना सुरू केली आहे यासाठी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये इतका खर्च आवश्यक आहे.
- भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठी अनुदान
शेतातील कचरा एकत्र करून नाडे पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10537 रुपयांचे अनुदान देण्यात येते.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची पात्रता
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana Eligibility
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- महाराष्ट्र बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जात नाही
- अर्जदार व्यक्ती ग्रामीण भागात राहणारा आणि त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असणे आवश्यक आहे
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- ग्रामपंचायतचे शिफारस पत्र
- यापूर्वी सरकारच्या कोणत्याही पशुपालन योजनेचा लाभ न घेतलेल्या बाबतची घोषणापत्र
- लघुधारक प्रमाणपत्र
- लाभार्थी अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र असणे आवश्यक आहे
- शेड साठी लागणारे बजेट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची अर्ज प्रक्रिया
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024 Apply
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांना सर्वात प्रथम आपल्या ग्रामपंचायत मध्ये जायचे आहे
ग्रामपंचायत मधून शेतकऱ्यांनी या योजनेचा अर्ज घ्यावा
अर्ज घेतल्यानंतर अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी
तसेच त्यासोबत लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स प्रतिजोडाव्यात
त्यानंतर अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा
त्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये तो अर्ज जमा केला जातो
अर्जदाराला अर्ज जमा केल्याची पावतीही देण्यात येते.
अशा सोप्या पद्धतीने शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना