Sudharit Pik Vima Yojana : सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय जारी
Sudharit Pik Vima Yojana राज्य सरकारने राज्यभरातील पिक विमा शेतकऱ्यांसाठी सुधारित पिक विमा योजना लागू केली आहे. यासाठीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
Sudharit Pik Vima Yojana या निर्णयानुसार आता पीक विम्यासाठी शेतकरी हिस्सा घेण्यात येणार आहे. चला तर मग आज जाणून घेऊया सुधारित पिक विमा योजनेची संपूर्ण माहिती…
Sudharit Pik Vima Yojana राज्य सरकारने एक रुपयांमध्ये पिक विमा ही योजना 2023 मध्ये सुरू केली. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत होता, मात्र या 1 रुपया पिक विमा चा काही शेतकऱ्यांनी गैरफायदा घेतला आणि त्यामुळे या योजनेमध्ये बदल करण्याचे राज्य सरकारने ठरवले.
Maharashtra Government publish Sudharit Pik Vima Yojana New GR farmer will pay their contribution in scheme Marathi News त्यावर अनेक दिवसापासून निर्णय होणे अपेक्षित होते मात्र काही कारणामुळे त्यावर निर्णय झाले नाहीत. आता त्यावर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे आणि राज्यात सुधारित नवीन पिक विमा योजना लागू केली आहे.
Maharashtra Government publish Sudharit Pik Vima Yojana New GR farmer will pay their contribution in scheme Marathi News या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनाही आता पीक विम्याचा काही प्रमाणात हिस्सा द्यावा लागणार आहे. याचा उद्देश म्हणजे पीक विम्यातील गैरप्रकार रोखणे हा आहे.
Pik Vima Yojana पिक विमा योजनेमधील घोटाळ्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने सुधारित पिक विमा योजना लागू केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णयही झाला आहे.
Pik Vima Yojana या निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता पिक विमा साठी खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5% योगदान आणि नगदी पिकाच्या विमा योजनेसाठी 5 टक्के योगदान द्यावे लागेल. यासंदर्भातला शासन निर्णय 9 मे रोजी जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना 2016 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 2023 पासून 1 रुपयात पिक विमा योजना राज्य सरकारने सुरू केली होती. या योजनेची अंमलबजावणी ही चांगल्या प्रकारे झाली होती.
मात्र मधल्या काळामध्ये या योजनेअंतर्गत अनेक गैरप्रकार समोर आले. त्यानंतर सरकारने या योजनेत बदल करण्याचे ठरवले होते. त्या अनुषंगाने आता सरकारने विचार करून सुधारित पिक विमा योजना जीआर जारी केला आहे
काय म्हटले शासन निर्णयात
Maharashtra Government publish Sudharit Pik Vima Yojana New GR farmer will pay their contribution in scheme Marathi News
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पिक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्याकडून खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बीसाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा शेतकरी हिस्सा घेतला जाईल. तर उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य सरकार मार्फत भरला जाईल.
पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी 29 एप्रिल 2025 रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
2025-26 च्या खरीप हंगामापासून महाराष्ट्रात सर्व समावेशक पिक विमा योजनांमध्ये बदल करून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नुसार पूर्वीप्रमाणे वीज केल्यानुसार खरीपासाठी 2 टक्के रब्बीसाठी, 1.5 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक विमा हप्ता हा केंद्र व राज्य सरकार मार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पिक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नवीन योजनेत याचा समावेश
पिक पेरणी पासून काढणीपर्यंतचा काळात वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक घटनांमुळे शेतीचे नुकसान होणे, नैसर्गिक आग, पूर, शेतजलमे होणे, भूस्खलन होणे, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट या बाबींचा विचार करून सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामासाठी आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
राज्य सरकारने सुरू केलेली सुधारित पिक विमा योजना ही खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी राबविण्यात येणार आहे.