Top 10 Govt Schemes For Girls 2024 In Marathi :  मुलींसाठीच्या सरकारच्या टॉप 10 योजना

Top 10 Govt Schemes For Girls 2024 In Marathi : मुलींसाठीच्या सरकारच्या टॉप 10 योजना

Top 10 Govt Schemes For Girls 2024 In Marathi : आज आपण मुलींसाठीच्या काही योजना पाहणार आहोत. केंद्र सरकार व राज्य सरकार नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. महिलांसाठी योजना, मुलींसाठी योजना, विद्यार्थ्यांसाठी योजना, कृषी क्षेत्राशी संबंधित योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना अनेक प्रकारच्या योजना सतत राबवत असते. तर आज आपण मुलींसाठीच्या काही योजनांची माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आज आपण मुलींसाठीच्या सरकारने सुरू केलेल्या टॉप 10 योजना पाहूया. Mulinsathi Sarkari Yojana 2024

मुलींसाठीच्या योजनेची थोडक्यात माहिती

Top 10 Govt Schemes For Girls

योजनेचे नावमुलींसाठीच्या योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार आणि राज्य सरकार
उद्देशमुलींचे भविष्य उज्वल करणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाइन

ठळक मुद्दे

Top 10 Govt Schemes For Girls

लेक लाडकी योजना

Lek Ladki Yojana

माझी कन्या भाग्यश्री योजना

Mazi Kanya Bhagyashree Yojana

सुकन्या समृद्धी योजना

Sukanya Samriddhi Yojana

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना

Beti Bachao Beti Padhao Yojana

सायकल वाटप योजना

Cycle Vatap Yojana

किशोरी शक्ती योजना

Kishori Shakti Yojana

बालिका समृद्धी योजना

Balika Samridhi Yojana

कन्यादान योजना महाराष्ट्र

Kanyadan Yojana Maharashtra

फ्री स्कुटी योजना

Free Scooty Yojana

चंदन कन्या योजना

Chandan Kanya Yojana

Top 10 Govt Schemes For Girls

Top 10 Govt Schemes For Girls 2024

लेक लाडकी योजना 

Lek Ladki Yojana

महाराष्ट्र सरकारच्या वतीने 2023-24 अर्थसंकल्पात लेक लाडकी योजणाची घोषणा करण्यात आली होती. या द्वारे मुलीच्या जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत सरकार कडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. मुलीचे वय आणि ती शिक्षण घेत असलेला वर्ग पाहून ही आर्थिक मदत केली जाते. पुढे वाचा

Mulinsathi Sarkari Yojana 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना

Mazi Kanya Bhagyashree Yojana

माझी कन्या भाग्यश्री योजना राज्यातील प्रत्येक मुलीसाठी आहे, पण ज्या मुलीच्या आई किंवा वडिलांनी मुलगी जन्माला आल्यानंतर एक वर्षाच्या आत नसबंदि करून घेतली आहे. त्या कुटुंबातील मुलीच्या नावावर सरकार पन्नास हजार (50000) रुपये जमा करणार आहे. माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत माता किंवा पित्याने दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर नसबंदी करून घेतली असेल तरच नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावावर सरकार एक मुलीच्या नावे 25000 आणि दुसऱ्या मुलीच्या नावे  25000 रुपये अशी रक्कम बँकेत जमा करणार आहे. जेणेकरून मुली मोठ्या झाल्यावर त्यांच्या शिक्षणाकरिता या पैशांचा उपयोग होईल आणि त्या चांगले शिक्षण घेऊ शकतील. या योजनेअंतर्गत एका व्यक्तीच्या केवळ दोन मुलींनाच या योजनेचा लाभ घेत येईल. पुढे वाचा

सुकन्या समृद्धी योजना

Sukanya Samriddhi Yojana

केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनामध्ये Sukanya Samriddhi Yojana 2024 SSY देण्यात येणाऱ्या व्याजामध्ये वाढ केली आहे. यापूर्वी या योजनेत गुंतवणूक केल्यास ग्राहकांना ८ टक्के वाढ देण्यात येत होती मात्र आता व्याजदरात वाढ केल्यानंतर यात ८.२ टक्के व्याज मिळणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेत Sukanya Samriddhi Yojana खाते २१ व्या वर्षी मॅच्योर होते. मात्र मुलीचे वय १८ वर्ष झाल्यावर खात्यातून शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे काढता येतात. पुढे वाचा

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना

Beti Bachao Beti Padhao Yojana

देशातील मुलींची स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण वाढवणे यासाठी केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू केली आहे.या योजनेचा भाग म्हणूनच बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना Beti Bachao Beti Padhao Yojana केंद्र सरकारने 22 जानेवारी 2015 रोजी सुरू केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली आहे. पुढे वाचा

सायकल वाटप योजना

Cycle Vatap Yojana 

राज्यातील अनेक भागात आजही मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक गावात पाचवी नंतरची किंवा दहावीनंतरची शिक्षण सुविधा नसल्यामुळे अनेक मुलींना परगावी जाऊन शिक्षण घ्यावे लागते, मात्र शाळेपर्यंत जाण्यासाठी मुलींना कुठलीही वाहतूक सुविधा नाही किंवा तुटपुंजा स्वरूपाच्या सुविधा आहेत. त्यामुळे अनेक मुलींचे शिक्षणही बंद केले जाते. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक कुटुंबातील पालक आपल्या मुलींसाठी वाहतूक सुविधा किंवा सायकल खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते त्यामुळे शाळेत मुलींची मोठी गळती होते. ही गळती थांबवण्यासाठी सरकारने मुलींना शाळेपर्यंत जाण्यासाठी मोफत सायकल अनुदान योजना सुरू केली आहे. पुढे वाचा

किशोरी शक्ती योजना

Kishori Shakti Yojana 

किशोरी शक्ती योजनेची सुरुवात 15 मे 2004 रोजी एकात्मिक बालविकास व बालिका मंडळ विभाग यांच्यामार्फत करण्यात आली. शातील मुलींचे भविष्य उज्वल कसे करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने किशोरी शक्ती योजनेची सुरुवात केली. राज्यातील मुलींचे आरोग्य कसे योग्य राहील याचा विचार करून ही योजना सुरू करण्यात आली. किशोरवयीन मुलींना IFA टॅबलेट व Deworming टॅबलेट प्रदान केल्या आहेत. ह्या टॅबलेट किशोरवयीन मुलींना देण्यात याव्यात, या टॅबलेट मुलींना 6 महिन्यातून एकदा देण्यात याव्यात असा महाराष्ट्र शासनाने GR काढला आहे. तसेच किशोरी शक्ती योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांकडून किशोरवयीन मुलींना पौष्टिक अन्न देण्यात येते. पुढे वाचा

बालिका समृद्धी योजना 

Balika Samridhi Yojana

भारत सरकार मार्फत ऑगस्ट 1997 मध्ये मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी सुरू झालेली योजना आहे. या योजनेअंतर्गत मुलीला तिच्या जन्मानंतर आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पैसे काढता येतात. मुलगी जन्मल्यानंतर 500 रुपयांची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत केली जाते. त्या मुलीचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले की तिला वार्षिक एक ठरलेली रक्कम मिळते. यामुळे मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळते. मुलीला तिच्या जन्मावर आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकार मार्फत आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मावर 500 रुपयांची आर्थिक सहाय्य मिळते. देशातील मुलींविषयी सकारत्मकता जागरूक होण्यासाठी ही आर्थिक मदत केली जाते. पुढे वाचा

कन्यादान योजना महाराष्ट्र

Kanyadan Yojana Maharashtra

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने कन्यादान योजना महाराष्ट्र सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे नवविवाहित जोडप्यांना आर्थिक सहाय्य करणे. हा एक सामाजिक कल्याण कार्यक्रम सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्याद्वारे चालवला जातो. या कार्यक्रमामुळे ज्या कुटुंबाचे उत्पन्न आहे कमी आहे, त्या कुटुंबातील नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या गरजेचे भेटवस्तू आणि आर्थिक सहाय्य मिळते. राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम सुरू केला. पुढे वाचा

फ्री स्कुटी योजना

Free Scooty Yojana

फ्री स्कुटी योजना 2024 उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे. या योजनेचा माध्यमातून सरकारी व खाजगी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत स्कुटीचे वाटप केले जाणार आहे. जेणेकरून त्यांना घरापासून ते कॉलेजला जाण्यासाठी स्कुटीचा वापर करता येईल. Free Scooty Yojana सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई योजनेच्या माध्यमातून आता सर्व मुलींना मोफत स्कुटी चे वाटप करण्यात येणार आहे. यूपी सरकार आता केवळ मुलींना लक्ष्मीबाई योजनेच्या माध्यमातून मोफत स्कुटी देणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने फ्री स्कुटी योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील मुलींना मोफत स्कुटी चे वाटप करण्यात येणार आहे. या संदर्भातील घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीरनाम्यात केली होती. पुढे वाचा

चंदन कन्या योजना 

Chandan Kanya Yojana 

शेतीच्या बांधावर 20 चंदनाच्या झाडांची लागवड करून त्या झाडांचा 12 वर्षे सांभाळ केल्यावर मुलीच्या शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नासाठी सरकारमार्फत एकरकमी 15 ते 20 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात मुलगी आहे अशा शेतकऱ्यांना चंदन कन्या योजनेअंतर्गत त्यांच्या शेताच्या बांधावर लागवड करण्यासाठी 20 चंदनाच्या झाडांची मोफत वाटप केले जाणार आहे. त्याचबरोबर चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन सुद्धा दिले जाईल. लागवडीनंतर 1 वर्षाने चंदन झाडांची नोंद सातबारावर घेण्यासाठी मोफत मदत केली जाईल. तसेच चंदन झाडांची वाढ झाल्यानंतर त्याची तोडणी करण्यासाठी व वाहतूक परवाना काढण्यासाठी देखील मोफत मदत केली जाईल. पुढे वाचा

दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीनिकरण मिशन 

दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना

 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना

एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रम

ग्रामीण भंडारण योजना

एकात्मिक बाल विकास सेवा योजना

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 

सुभद्रा योजना

कृषी ड्रोन अनुदान योजना

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 

संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना

प्रशिक्षण योजना 2024 

आयुष्यमान भारत विमा योजना

पीएम पोषण शक्ती निर्माण अभियान

संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना

पीएम श्रमयोगी मानधन योजना

डिजिटल कृषी मिशन 

राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना

सौर कुंपण योजना 

मनोधर्य योजना

स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना 

प्रधानमंत्री आवास योजना 

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना